गद्यलेखन

मायबोली गणेशोत्सव २००८ स्पर्धा निकाल

Submitted by संयोजक on 28 September, 2008 - 23:05

नमस्कार मंडळी,
गणेशोत्सवातल्या स्पर्धांना भरघोस दाद तसेच प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्व मायबोलीकरांचे संयोजकांतर्फे मनःपूर्वक आभार!

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे सेम नसतं...४

Submitted by मेधा on 13 September, 2008 - 05:37

आनंद अन कांचन बॅगेज क्लेमपाशी पोचायच्या आधीच अस्मिता तिथे उभी होती. तिला पाहिल्याबरोबर कांचन जवळजवळ धावतच तिच्यापाशी पोचली होती.

कथालेखनस्पर्धा (सुरुवात आमची, कथा तुमची ) - सुरुवात क्र.३

Submitted by संयोजक on 11 September, 2008 - 03:12

मनगट खूपच दुखल्याने भरपूर रडून झाल्यावर सानिया ( आपली मिर्झा हो !) खोली बाहेर पडली..

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे सेम नसतं ....३

Submitted by मेधा on 11 September, 2008 - 03:01

शाळेच्या, कॉलेजच्या आयुष्यात जितक्या प्रेमी जणांच्या जोड्या जुळतात ना त्यात सगळ्यात जास्त अकरावीच्या वर्षात जुळत असाव्यात.

ऑक्टोबर एण्ड

Submitted by मंजूडी on 21 July, 2008 - 00:33

परवाच्या रविवारी दुपारी छान पुस्तक वाचायला मिळाले अनंत सामंत ह्यांचे ऑक्टोबर एण्ड. पहिल्याच पानावर जहांगिर आर्ट गॅलरी, भणंग चित्रकार, सामोवार वगैरे वर्णन वाचून हे पुस्तक भयंकर बोअर करणार असं वाटलं होतं....

मीना प्रभु

Submitted by सायो on 21 July, 2008 - 00:32

मीना प्रभूंचं 'माझं लंडन', ऍमेझॉनवरचं पुस्तक(नाव लक्षात नाही), ग्रिकांजली, तुर्कनामा, इजिप्तायन वाचून संपवलं आहे. बाकी कशाही पेक्षा मला त्या सगळीकडे एकट्याने फिरतात ह्याचचं कौतुक जास्त वाटतं. बाकी ऐतिहासिक़ उल्लेख नी माहितीचा ओवरडोस असतो त्यांच्या प्रवासवर्णनात(निदान माझ्याकरता तरी.शाळेत इतिहासाच्या तासाला बसल्यासारखं वाटतं). पण तरीही विकत घेऊन आवर्जून वाचते नेहमी.

गाथा इराणी

Submitted by दिनेश. on 20 July, 2008 - 00:00

मीना प्रभुंचे " गाथा इराणी " हे नवे कोरे पुस्तक ( मौज प्रकाशन, किंमत ३०० रुपये, पृष्ठे ३७६ ) नुकतेच वाचून संपवले.
खरे तर आम्ही त्यांचे चाहते, रोमराज्यची, गेली दोन वर्षे वाट बघत आहोत, पण हा त्यानी आम्हाला दिलेला सुखद धक्काच आहे.
आर्यनाम क्षेत्रम, असे मूळ नाव असणारा हा देश आणि या पुस्तकाच्या शीर्षकातील, गाथा हा शब्ददेखील, मूळ पारसीच.

मुंबईचा अन्नदाता

Submitted by अरूण on 17 July, 2008 - 15:57

कालच एका पुस्तक प्रदर्शनातून शोभा बोंद्रे यांनी लिहिलेल मुंबईचा अन्नदाता हे पुस्तक विकत घेतलं.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन