जगात भारी भारतीय नारी च्याच् धर्तीवर जगात भारी भारतीय सारी (साडी) असे म्हणावेसे वाटते. सकाळी घाईघाईने कपाट उघडावे आणि अंगावर साड्यांचा पाऊस पडावा, असे कायम च् घडत असते. घरातील सगळ्यांच्या कपाटात हक्काने एक एक खण आपल्या साड्यांसाठी आधीच आरक्षित करून ठेवल्या मुळे नवीन साड्या ठेवण्यासाठी छान सोय झालीय असे कितीही वाटत असले तरिही नवीन खरेदी झाल्यावर या साड्या कुठे बर ठेवाव्यात हा कायमच अनुत्तरित राहणारा प्रश्न.
अलीकडेच माझ्या साडी संग्रहात नव्यानेच् दोन
साड्यांची भर पडली आणि घरात जणू काही माणसे जास्त आणि जागा कमी असावी अशा त्राग्याने हट्ट बाई म्हणून चिडचिड करून झाली. त्यावर उपाय म्हणून एखादे नवे कपाटच का विकत घेऊ नये असाही विचार मनात तरळून गेला, पण... तो पती राजांकडे मांडला तर त्यावर “ अगं त्यापेक्षा जरा तुझ्या साड्या कमी कर” असे उत्तर येऊ शकते अशी शक्यता नाकरता येत नाही, असा विचार येऊन, त्यापेक्षा यावर काही न् बोलता मी बिचारी गप्पच राहाणे पसंत करते. कारण नोकरी निमित्याने भ्रमंतीवर असलेल्या पती राजांना ना पुढील वेळी “ तूम्ही गेला आहे ना तिकडे सिल्क खूप छान् मिळते, माझ्यासाठी एक साडी घेऊन याल, असे विनंती वजा फरमान हक्काने काढता येते. सिल्क ची जागा कधी कॉटन तर कधी बनारसी, जामदानी अशी बदलत जाते, मात्र मागणी कायम एकच् असते ती म्हणजे, माझ्यासाठी साsss असं मी म्हणणार आणि पलीकडून मsss म म्हटलं जावं. त्या नंतर ही कधीतरी चुकून वाढदिवसानिमित्त वगैरे अहोंनी ' अग तुझ्यासाठी काय आणू एवढे विचारण्याचा धोखा पत्करलाच तर परत माझा साssss तय्यार, माझ्यासाठी ना एक ..
तर असे नावरोजिंकडून कधी हक्काने, कधी भांडून, तर कधी भावनिक साद घालून साडी ची हौस पूर्ण करून घेऊन समाधान मानावे हे किमान साडी या एका बाबतीत तरी मुळीच लागू होत नाही. कारण स्वत; दुकानात जाउन साडी खरेदी करण्याचा आनंद काय वर्णावा, बहिणीला फोन करून “ अग चिटणविस सेंटर ला सिल्क एक्सपो लागले आहे जायच का ’ असा सवाल टाकण्याची च देर की बहिणी बहिणी मिळून एकदा तरी चक्कर मारून येऊ म्हणत परत येताना दोन्ही हातात दोन तीन बॅगा भरून साडी खरेदी होतेच.
याशिवाय बहिणी सोबत महालक्ष्मी साठी साडी घ्यायला दुकानात गेल्यावर अग ही तुझ्या महालक्ष्मी साठी माझ्याकडून घेते आहे बर का म्हणून दोन साड्या पदरात पडून घेताना, चला या वर्षी ची महालक्ष्मी साठी साडी खरेदी झाली अस म्हणत त्या आधीच महालक्ष्मीसाठी म्हणून खरेदी केलेली ऑनलाइन साडी खरेदी चक्क विसरल्या जाते.
माझी मैत्रीण साड्यांचा व्यवसाय करते, छान कलेक्शन आहे तिच्या कडचे, पण आजकाल ना कुणी जास्त साडी घालत्त नाही म्हणून किमान आपण तरी तिच्या कडून विकत घेऊया तेवढीच तिला मदत असा उदात्त विचार मनात आणून देखील साडी खरेदी केली जाते.
त्याशिवाय प्रतिवर्षी नित्यानेमाणे आणि वृत्त पत्रांमधील जाहिरातींमधून ठळकपणे खुणावणारा साडी सेल तर समस्त स्त्री वर्गा मध्ये भारीच प्रिय. ५० टक्के ६० टक्के discount हमखास मिळतो, १००० ची साडी ६०० ला मिळते अशा विविध आमिषाला बळी पडत आम्ही बायका साडी सेल मधून साडी खरेदी करणे हा आमच्या समस्त स्त्री वर्गाचा अधिकारच आहे, असेच मानतो. मला कायमच वाटत आले आहे की प्रत्येक प्रकार ची एक तरी साडी कपाटात हवीच हवी. तर अशी ही परम प्रिय साडी खरेदी करून आल्यावर ती साडी उलगडून बघणे, वारंवार हाताळणे आणि आरशासमोर उभे राहून लावून बघणे, घरच्या लोकांना दाखवून त्यांच्या कडून दाद मिळविणे हा एक आनंददायी सोहोळाच असतो. असे मला कायमच वाटत आले आहे. तर अशी कधी कारणाने तर कधी कारणाशिवाय केलेली साडी खरेदी म्हणजे आ#नंदाची जणू पर्वणीच.
#सुरपाखरू #३०दिवसांत३० #प्रयोग
माझे साडी प्रेम
Submitted by शिवानी बलकुंदी on 24 February, 2025 - 04:32
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान लिहिलं आहे
छान लिहिलं आहे
>>> #सुरपाखरू
>>> #सुरपाखरू
हा सुरपाखरू काय प्रकार आहे, आ़णखी एकदोन ठिकाणी वाचलं इतक्यात.
लेख छान आहे!
लेख छान आहे!
एक छोटा बदल सुचवु का?
' साडी घालणे ' हे बदलुन 'साडी नेसणे' केले तर....
प्रतिक्रिया देण्यासाठी
प्रतिक्रिया देण्यासाठी धन्यवाद. साडी नेसणे उत्तम सूचना. सुरपाखरू या नावाने आम्ही सात जण फेस बूक वर लेखन प्रयोग करतोय, त्यामधील काही लेख इथे पोस्ट केले. पण मूळ लेखन सुरपाखरू या उपक्रम मधील असल्यामुळे आमची ओळख आम्ही तीच राहू दिलीय.
छान लेख.
छान लेख.
छान लिहिलंय .साडी म्हणजे
छान लिहिलंय .साडी म्हणजे बायकांचा वीक पॉईंट.लहानपणी खूप हौस होती साड्या नेसायची, आईच्या साड्या गुंडाळून बसायचे .आता वर्षातून एकदा नेसण्यासाठी कशाला साड्या घ्यायच्या असं वाटतं . वडिलांच्या मते महागड्या साड्या म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट कारण ते म्हणतात 'एकतर तुम्ही सारख्या नेसत नाही वर कपाटात जागा जाते ती वेगळीच' .तरी दर दिवाळीला का होईना माझ्यासाठी नवीन साडी विकत घेतलीच जाते.मातोश्री कृपेने . घ्यायच्या नसल्या तरी सेलमध्ये जाऊन साड्या बघायला आवडतात आणि एव्हडं आलोय ,आवडलीय तर एखादी घेऊया म्हणून तिथेही विकत घेतली जाते.
छान लेख
छान लेख
सुरपाखरू कल्पना छान
वडिलांच्या मते महागड्या साड्या म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट
>>>>>>
मी सुद्धा वेळोवेळी हेच मत मांडून दरवर्षी एखादी घेतली जाणारी पण एकदाच वापरली जाणारी महागडी साडी बायकोपासून हिरावून घेतली.
अर्थात तिलाही तशी आवड उरली नव्हती, फक्त एक सवय म्हणा किंवा सगळे घेतात म्हणून आपणही घ्या म्हणून म्हणा घेतली जायची. नाहीतर तिने माझ्या मताला काही किंमत दिली नसती.
@ सिमरन, @ ऋन्मेष
@ सिमरन, @ ऋन्मेष महाविद्यालयात काम करीत असल्यामुळे रोज साडी नेसाविच लागते. रोज रोज नेसल्यामुळे मला आता त्याचे काही वाटत नाही त्यामुळे नवनवीन साड्या बघायला आणि नेसायला पण आवडू लागले आहे. त्याशिवाय हातमाग च्या साड्या घेताना आपल्या कडून विणकरांना तेवढीच मदत होईल असा उदात्त (?) हेतु मनात असतोच. हातमाग वरच्या साड्या जास्त आवडतात म्हणून ही असेल. असो. आपली आपली आवड. तुमच्या प्रतिक्रियांसाठी मनापासून धन्यवाद.
@ स्वाती अंबोळे, @ मनीम्याउ @
@ स्वाती अंबोळे, @ मनीम्याउ @ रांनभुली @ सुमेधा सगळ्यांना धन्यवाद.
छान लेख.
छान लेख.
) मी नेहमीच साडी नेसते. त्यामुळे माझी साडी खरेदी वर्षभर सुरूच असते. मी जेव्हा माझ्यासाठी साडी खरेदी करते तेव्हा जास्त महाग घेत नाही पण माझा नवरा जेव्हा माझ्यासाठी साड्या आणतो (साड्याच कारण तो कधीच एक साडी आणत नाही) त्या मात्र महागातल्या असतात. तेव्हा त्याला मी नेहमी सांगत असते की एक साडी कितीवेळा नेसणार त्यापेक्षा यात मला ३-४ साड्या आल्या असत्या.
साडी म्हंजे माझा विक पॉइंट. मला साडी नेसायला प्रचंड आवडते. लग्नाआधीही मी प्रत्येक सणाला साडी नेसायचे. लग्नानंतर तर वर्षभर मी रोजच साडी नेसायचे, ऑफिसला पण साडी नेसून. अजूनही प्रत्येक सणाला, आईकडे गणपतीत दहा दिवस, नवरात्रीत नऊ रंगाच्या नऊ साड्या, माझ्याकडे माघी गणपतीत दोन दिवस, महिन्याच्या संकष्टीला (एकंदर साडी नेसण्यासाठी बहाणाच समजा ना
वडिलांच्या मते महागड्या साड्या म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट>>>>>> मलाही हे पटते पण साड्या बघितल्या की विसरते
काय योगायोग , ह्याच आठवड्यात
काय योगायोग , ह्याच आठवड्यात कपाट लावून मोकळे झाले एकदा.
आणि कशाला घेते मी इतक्या साड्या असं वाटलं. कित्येकांची घडीच मोडली नाहीये. कोरोनानंतर कमीच झालं साडी नेसणं कारण कोण ती धुवाधुवी करणार( परकर, ब्लॉउज मग साडी वार्यावर ठेवणं हे एक काम वाटू लागलय).
पण, तरीही वर्षातून १-२ साड्या घेतल्या जातातच. आता चांगल्या स्थितीतल्या साड्या काही हौशींना देवून, काहींच्या गोधड्या शिवून सध्याला ११५ साड्या आहेत. त्याचे कारण प्रत्येक राज्यातली साडी प्रकार.
बंगाली साड्यांचा ( जामदानी, तस्सर, गमछा, बेंगाल कॉटन, स्वर्णचारी, बालुचारी, कांथा) खप आहे एकदम. मग लिनन, गडवाल, पैठणी, इरकल, खण, असामची मोणीपुरी, गुजराती बांधणी, पटोला, राजस्थानी लेहरिया, एम्पीची महेश्वारी, चंदेरी, कांजीवरम ६ आहेत. सॉफ्ट सिल्क , भूजोडी घेतली.
बर्याच साड्या प्रत्येक राज्यात खास वीवरकडूनच घेतलीत. फक्त हातमाग.
अलीकडेच महागड्या ब्रांड कडून घेतल्यात पण पछतावले. पॉवरलूम बुट्टी असते आणि साडी मात्र तिप्पट किंमतीने विकल्यात. मुंबईचा म वाला म्हणा की पुण्याचा प्र वाला. हा.. हा तेच ते ब्रांड. घेवु नका कुणी.
हे आता आठवतय नीट कारण कपाट आताच लावलं आणि काही वर्षे तरी साडी घेणार नाही ठरवलय.
जुन्या सुल्क साड्यांची गोधडी
जुन्या सिल्क साड्यांची गोधडी एकदम फॅशन स्टेटमेंट आहे आमच्याकडे. बर्याच मैत्रीणींना आवडले ते सेट.
शिवानी तुम्ही रोज साडी नेसतात
शिवानी तुम्ही रोज साडी नेसतात मग ते महागडेचे गणित बदलते.. ते आमच्यासारखे मुळातच साडी ओकेजनली नेसणाऱ्याना लागू असे वाटते
सगळ्या प्रतिक्रिया वाचून
सगळ्या प्रतिक्रिया वाचून समजले की साडी हा तसा सगळ्यांचा वीक पॉइंट आहे फक्त रोज घालणे जरा अवघड आहे त्यामुळे उगाच का पैसे खर्च करा. @ झंपी एवढ्या साड्यांचे प्रकार डोळ्यासामोरून गेले आणि त्यामधील माझ्याकडे कोणती नाही हा विचार मनात येऊन गेला.
खरंच आहे मी जरी रोज घालत असले तरी काही साड्यांचा नंबर वर्षातून एकदा पण लागत नाही. बाकी साडीची गोधडी ही उत्तम कल्पना आहे.
@निल्सन @झंपी @ ऋन्मेष धन्यवाद
मला उंची असती तर नेहमी मस्त
मला उंची असती तर नेहमी मस्त साडीच नेसले असते. साडी एक ग्रेसफुल पेहेराव आहे.
परवाच एका हळदीकुंकूमधे गेले
परवाच एका हळदीकुंकूमधे गेले असताना बाय डिफॉल्ट साड्यांचा विषय चालूच होता. एकीने साड्यांची लायब्ररी करू असं सुचवलं. अमेरिकेत काही एवढ्या ऊठसूट साड्या नेसल्या जात नाहीत किंवा फार स्टॉक नसेल तर त्याच त्याच होतात नेसणं. लायब्ररी झाली की जरा व्हरायटी मिळेल सगळ्ञांना अशी चिवचिव झाली. पण आयत्या वेळी बायकांच्या हातातून खरंच साडी सुटेल का दुसरीला द्यायला? माहित नाही
>>>>>>पण आयत्या वेळी
>>>>>>पण आयत्या वेळी बायकांच्या हातातून खरंच साडी सुटेल का दुसरीला द्यायला? माहित नाही Lol
हाहाहा
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
रिलेट नाही केलं कारण मला साडी नेसायचा कंटाळा आहे, म्हणून मी घेत नाही. बघायला आवडतात, दुसऱ्यांनी नेसलेली बघायलाही आवडते.
कोलकाता , कन्याकुमारी, मदुरै
कोलकाता , कन्याकुमारी, मदुरै येथून साड्या आणू नका. त्या भिवंडी किंवा सूरतच्या असतात. कांचीपूरमच्या देवळांजवळाजवळच्या दुकानांत घेण्याऐवजी बाजारातल्या घ्या. एवढंच सांगेन.
@ सामो धन्यवाद खरंच
@ सामो धन्यवाद खरंच दुसऱ्यांना द्यायला जीव नाही होत हे अगदी खरे आहे. @ Srd ही माहिती माझ्यासाठी नविच आहे. धन्यवाद. @ अंजु थॅंक यू @ अंजली १२ भारतात कुठेतरी साड्यांची लायब्ररी सुरू झालीय असं मी एकले फक्त.
प्रतिक्रियांसाठी सगळ्यांना खूप धन्यवाद.