साडी

साडी

Submitted by आर्त on 15 June, 2020 - 03:16

ती ओरडत असते,
तिच्या आत्मेच्या देठापासून,
तिच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला,
दाहिदिशी पसरलेल्या दमट अंधारात,
कुणा तारकाचे लक्ष वेधायला.

तो अंधार काही ह्या जगातला नाही,
रात्र संपल्यावर पळणारा,
सूर्य अस्तित्वात नसलेला अंधार तो,
कालही तितकाच अनंत,
उद्याही तितकाच असणारा.

पण मला ऐकू येतंय ना,
फक्त मलाच.

साडीतच आली ती ह्या जगात,
भरजरी, मोररंगी प्रेतवस्त्रात,
त्याच्या चिवट विळख्यात तिला जन्मताच डांबले,
हात-पाय मारून श्वास आणखी तिचेच खोळंबले,

साडी मनातली २

Submitted by salgaonkar.anup on 17 March, 2014 - 11:26

होळीच्या शुभेच्छा ....!!!!!!
मी घरीच design केलेली दोन रंगी साडी.
कापड प्रकार:- सिल्क


20140317_184250.jpg

20140317_184346.jpg

20140317_183924-1.jpg
धन्यवाद
--

शब्दखुणा: 

साडी मनातली

Submitted by salgaonkar.anup on 29 May, 2013 - 02:54

मी काही घरीच design केलेल्या साड्या विकायच्या आहेत. मुंबई स्थित इच्छुक ग्राहकांनी जरूर संपर्क साधावा.
तपशील :- अनुप अनिल साळगावकर.
दादर पश्चिम, मुंबई -४ ० ० ० २ ८
मो. ९ ८ ६ ९ ४ ० ४ ९ ५ ३.
१. Rs. १५००/-
IMG_20130528_171104.jpgIMG_20130528_171104.jpgIMG_20130528_114241.jpg

२. Rs. ८००/-

शब्दखुणा: 

या आजच्या पोरींना साड्यांचे कौतुक बाकी फार...

Submitted by अंड्या on 25 October, 2012 - 01:44

काल दसरा होता. पण आमचे दुकान नेहमीसारखे उघडेच होते. सकाळी एक्स्ट्रा पूजाअर्चा काय झाली तीच. अर्थात, ते खाते वडीलांकडेच. मी गेलो सावकाश घरचे आवरून.. नेहमीसारखाच.. त्यातल्यात्यात सणासुदीचे नवीन कपडे आणि व्यवस्थित भांग पाडून.. थोडावेळ मंगल वातावरण वाटले, पण त्यानंतर नेहमीचे काम होतेच ते चालू झाले. अधूनमधून नवीन शर्ट असल्याने आरश्यात बघणे काय ते होत होते, पण त्याचा कामावर काही फरक नाही की दुपारी दुकान लवकर बंद करून घरी पळायची सोय नव्हती.

विषय: 
शब्दखुणा: 

पुस्तकात नामोल्लेख!

Submitted by नीधप on 24 June, 2012 - 01:50

दिल्लीस्थायिक रिता कपूर या गेली अनेक वर्ष भारतीय साड्यांच्या संदर्भात संशोधन, दस्ताऐवजीकरण याचे काम करत आहेत.

'सारीज ऑफ इंडीया' या नावाने हे सर्व काम त्यांनी दोन खंडांमधे प्रकाशित केले आहे. दुसरा खंड नुकताच प्रकाशित झाला. या दुसर्‍या खंडा महाराष्ट्रातील साड्यांबद्दल विवेचन आहे.
मराठी साड्यांच्या विविध प्रकारच्या नेसण पद्धतींबद्दल विवेचन असलेल्या भागामधे माझा उल्लेख आहे.

विषय: 

साडी हवी

Submitted by फकिर बेचारा on 26 April, 2012 - 08:31

साडी हवी...भावूकही बनशील तू
घेतोस का आत्ता?.. असे पुसशील तू

आहेत माहीती तुझी मज नाटके
नाही म्हणालो मी तशी रुसशील तू

ती मोरपंखी सांग आवडली तुला?
साडीत निळ्या? शी..कशी दिसशील तू

घे रंग पाहूनच तसा मउ पोतही
त्या झगमगीने फ़ालतू फ़सशील तू

साडी असे ना कोणती बस एवढे
डोळ्यात माझ्या तूच ती असशील तू

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

साडीखरेदीला येताय नं?

Submitted by पाषाणभेद on 18 July, 2011 - 00:15

कालच मी साडी खरेदीसाठी गेले होते. आताशा पावसाळा चालू आहे. पावसाळ्यात कपडे, साड्या, चपला, कुकर आदींवर फ्लॅट डिस्कांउंट सेल निरनिराळ्या दुकांनात चालू होतात. कधी ५० टक्यांपर्यंत तर कधीकधी काही ठिकाणी पुर्ण ५०% डिस्कांउंट सेल लागतात. रस्त्याने जातांना मला तसल्या दुकानांवरील पाट्या पाहून ड्रायव्हरला 'गाडी तेथल्यातेथे उभी कर', असे सांगावे लागते. नाहीतरी आमच्या ह्यांना माझे 'सेल खरेदीचे' वेड माहीतच आहे. नविनच लग्न झाले त्यावेळी सुरूवातीला ते माझ्या बरोबर खरेदीला येत. पण नंतर नंतर त्यांचे माझ्याबरोबर येणे कमी झाले अन आमच्या भिशी क्लबातल्या एखाद्या मेंबरचे येणे माझ्याबरोबर वाढले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - साडी