एका सासूबाईची करुण कहाणी.
लहान माझी भावली
मोठी तिची सावली.
नकटे नाक उडवीते
घारे डोळे फिरवीते.
भात केला कच्चा झाला
वरण केले पात्तळ झाले.
आडाचे पाणी काढायला गेली
धुपकन पडली आडात.
सासू बाई शेजारच्या लहान मुलीला गाणे “शिकवत” होत्या.
सून स्वयंपाक गृहात काम करत होती. मनात म्हणाली. “मला शिव्या देताहेत. ऐकतेय मी सगळे. तुम्ही काही म्हणा मी आडात जाऊन जीव देणाऱ्यातली नाही. सज्जड हुंडा देऊन आले आहे. तेव्हा न लाजता मुलाची किंमत खण खण वाजवून घेऊन त्याला विकला न तुम्ही?”
साबा आणि साबू दोघेही व्हाट’स अप अंकल आणि आंटी.
सारखी किच कीच चाललेली. पदर सांभाळ. केस किती आखूड कापलेस? आता वेणी कशी घालणार? खुर्चीवर सावरून बसावे स्त्रियांच्या जातीने. कुंकू लावलेस का? मला मेलीला आताशा दिसत नाही म्हणून विचारले हो.
चाहत साखर कमी पडलीय. साखर संपली असेल तर नवऱ्याला सांगायचे. तो काय तुझ्या मुठीतच(मिठीत?).मला अजून डायबेटीस नाही हो.
पोळ्या किती जाड लाटल्या आहेस? मुद्दामहून ना? का नाजूक हात दुखताहेत. आमच्या काळी मी एकटी दहा जणांच्या पोळ्या... आता काय राजा राणीचा संसार. इन मीन तीन.
भाजीत किती मीठ पडलय.
अजून बरच काही. कधी म्हणून कधी समाधान नाही.
एकदा मात्र कहर झाला.
“सुनबाई साधी मेथीची भाजी करता येत नाही. तुझ्या आईने माहेरी काय शिकवले?”
“अहो सासूबाई, ते माझे माहेर होते. केटरिंग कॉलेज नव्हते.”
मग एके दिवशी दारात टॅक्सी उभी राहिली.
सुनेने साबा आणि साबू च्या दोन बॅगा भरल्या, टॅक्सीत नेऊन ठेवल्या.
“सुनबाई कुठे बाहेर जायची तयारी आहे का?”
“हो तुम्हा दोघांची व्यवस्था त्या नदी काठच्या वृद्धाश्रमात केली आहे. तिथ खरपूस भाजलेल्या पातळ पोळ्या, घट्ट वरण, शिजलेला भात, दोन वेळ चवदार चहा मिळेल. तिकडे देऊळ आहे. तिथं भजन प्रवचन कीर्तन चालते. टीवी आहे. आस्था चानल बघायाल मिळेल. जय मा देवी असे पिक्चर बघायला मिळतील.”
सगळ्यात म्हणजे इतर सास्वान्च्या जोडीने सुनांच्या नावाने बोटं मोडायला मिळेल.
आमच्या बाब्या म्हणजे सुनेच्या ओंजळीने पाणी पिणारा. शामळू. ऑफिसमध्ये काय रुबाब. घरात मात्र कबाब. गोगल गाय.
पैशाची काळजी करू नका. आल एक्सपेन्सेस प्रिपेड!
आम्ही दोघं येऊ मधुन मधून भेटायला.
टॅक्सी सुरु झाली आणि भुर्कन निघून गेली.
व्हाट ए मेसी एंड!
जुनीच कथा आहे. एकदा केव्हा
जुनीच कथा आहे. एकदा केव्हा तरी लिहिली होती. आज आठवली. शोधुन काढली.
सासू, सून खटकेबाज संवाद....
सासू, सून खटकेबाज संवाद....
सासूची आई कधी होईल आणि सुनेची मुलगी कधी होईल?
हल्ली बरंच बदललं असावं.
किचन पॉलिटिक्स.
किचन पॉलिटिक्स.
माझ्या साबा दोन महिन्यांपूर्वी गेल्या. दोन महिने बेड रिडन होत्या. माझ्या लग्नाला २४ वर्षे होतील आता. पण शेवटपर्यंत चहा करायला घेतला की 'अर्धं दूध, अर्धं पाणी घे गं' ही सुचना काही चुकवली नाही त्यांनी. शेवटी शेवटी मोठ्याने बोलवत नव्हतं तर सोबतीला ठेवलेल्या नर्स मावशीकडे निरोप पाठवायच्या.
आता मजा वाटते आठवून.
मस्त . शेवट आवडला
मस्त . शेवट आवडला
कथा चांगली आहे पण
कथा चांगली आहे पण
केशव कुल हे काय मध्येच...
सासूची आई कधी होईल आणि सुनेची मुलगी कधी होईल? >>>> पण कश्याला म्हणून ओढून ताणून करायचे. आई एक आधीपासून असेल तर सासू या नात्याचा आनंद घ्यायचा
>>>पण कश्याला म्हणून ओढून
>>>पण कश्याला म्हणून ओढून ताणून करायचे. आई एक आधीपासून असेल तर सासू या नात्याचा आनंद घ्यायचा>>माझ्या शेजारी एक कुटुंब असं होतं. खूप सुंदर ट्यूनिंग दोघींचही. एकापेक्षा जास्त आई असेल तर माया दुप्पट होईल की, तेच मुलीच्या बाबत. खूप मोठी चर्चा होईल.