जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम

Submitted by पाषाणभेद on 9 October, 2010 - 00:11

जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम

(आज सकाळी नाशिकचे आमदार डॉक्टर वसंत पवार यांची अंत्ययात्रा बघीतली. त्यांच्या नविन पंडीत कॉलनीच्या हॉस्पीटलाच्या शेजारच्या बिल्डींगमध्येच माझ्या कंपनीचे ऑफीस आहे. मी नाईट शिफ्ट करत होतो. ऑफीसमधल्या काचेमधून त्यांच्या अंत्ययात्रेचा सोहळा पाहत होतो. त्याचवेळी खालील कवीता सुचली. डॉ. पवारांना श्रद्धांजली. )

जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम
जेव्हा जातो जीव, तेव्हा बोला रामनाम ||धृ||

जिवंत असता पुण्य कमवावे
पाप दुराचारा सोडूनी द्यावे
आठवेल जग केवळ तुमचे काम ||१||

काळ आला असता नसे जवळी कोणी
उचलोनी नेती सारे, सरे सारी घेणी
पुढे चालती सारे, मागे उरे सामसूम ||२||

जगामध्ये माणूस एकटाच येतो
माणसात जगूनी एकटाच जातो
कमवतो काय येथे? जातो सारे ठेवून ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०९/१०/२०१०

गुलमोहर: 
शब्दखुणा: