जिवनाचे चक्रव्यूव्ह

Submitted by Rudraa on 30 March, 2021 - 07:06

चालता बोलता,
नकळत गुंतत राहिला.....
सुटता सुटेना गाठी ,
आयुष्याचा प्रत्येक क्षण गुत्यांत गुंतवला .....

पुर्ण झाले जाळे,
उमगले चकव्यूव्ह ......
निसटता घेता पाय ,
अंत काही सापडेना......

शोधता शोधता वाटा,
पुन्हा त्यात अडकला .....
अंताचा शेवट नाही ,
पण पुन्हा सुरुवातीस येऊन पोहचला .......

संपली जीवनयात्रा ,
थकला हा देह ........
नाही सापडली सुरुवात ,
नाही समजला त्यास त्याचा अंत......

रुद्रा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संपली जीवनयात्रा ,
थकला हा देह ........
नाही सापडली सुरुवात ,
नाही समजला त्यास त्याचा अंत......

असे असते काव्य!
छान