कान्हा

बाधा

Submitted by बिपिनसांगळे on 2 August, 2020 - 10:36

बाधा
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संध्याकाळची वेळ . गोकुळात तरुण आणि अवखळ गोपींचा खेळ रंगात आला होता . त्या झोके खेळत होत्या . फेर धरत होत्या आणि गाणीही म्हणत होत्या . मनभावन श्रावणऋतु होता ना .
राधा मात्र सख्यांची नजर चुकवून पळाली . तिला आता यमुनाकाठ गाठायचा होता .

विषय: 
शब्दखुणा: 

आस

Submitted by मन्या ऽ on 26 May, 2020 - 09:36

आस

अशाच या कातरवेळी
निशब्द असावा
आसमंत सारा
त्यासमयी रवि तु
क्षितिजाच्या कुशीत निजावा

रवि तुज निजवताना
वारा ही गाई झुळझुळ गाणे
ती लुकलुकणारी कोर ही
बघ तुज कथा सांगे

अशाच एका कातरवेळी
बघ. कोण पणती
त्या तुळशीसमोर लावे
मंद अश्या त्या प्रकाशात
माझा ऊर भरुन वाहे

तेव्हा दुरवर कोठेतरी
मज ऐकु येते ती किणकिणारी घंटा
'आस' लागे मनास कान्हा
तसाच ऐकु येईल का रे मज
एक दिन तुझा मधुर पावा..

-दिप्ती भगत
(९मे, २०२०)

भावभक्ती लोणी

Submitted by पुरंदरे शशांक on 28 August, 2019 - 01:16

भावभक्ती लोणी

घर शोधूनी पहाती
कृष्ण गोप सखे सारे
नाही कुणीच घरात
शिरताती चोर सारे

शिंकाळ्यात ठेवलेले
लोणी नेमके शोधले
हात पुरेना कोणाचे
उंच होते टांगलेले

कान्हा सांगतसे युक्ती
करा कोंडाळे छोटेसे
चढूनिया त्यावरी मी
लोणी काढेन जरासे

सवंगडी लगोलग
धरताती एकमेका
कान्हा खांद्यावरी त्यांच्या
चढे अलगद देखा

हात घालिता मटकी
कडी वाजली दाराची
सवंगडी कान्हयाचे
पळ काढती त्वरेची

कान्हा उभा थारोळ्यात
तक्र लोणी भुईवरी
तुकडे ते खपरेली
विखुरले दूरवरी

कान्हाचे नंदनवन की नंदनवनातला कान्हा ?

Submitted by माधव on 12 December, 2018 - 01:37

हे आहेत कान्हाच्या अभयारण्यातील काही यजमान. खूप अगत्याने स्वागत झाले आमचे. राजांना काही जरुरीच्या कामाकरता जायचे असल्यामुळे ते फक्त Hi म्हणून गेले. त्यांचा फोटो नाही मिळू शकला.

(पक्षांची नावे मायबोलीकर 'इंद्रधनुष्य' यांच्या सौजन्याने)

विषय: 
शब्दखुणा: 

सख्या रंग तुझा सावळा

Submitted by स्वप्नाली on 26 August, 2016 - 15:34

सख्या रंग तुझा सावळा
श्रावणी बरसे घन-नीळा
जीव आसुसला हरी-दर्शना
पावा वाजव रे कान्हा

केशर उधळीत आला भास्कर
सात अश्वान्च्या रथी स्वार
सोनसळी मोहरली वसुंधरा
कमल पुष्प मुक्त करी भ्रमरा

वाट पाहते यमुनातीरी
कधी येणार श्रीहरी
उन्हं आली डोईवरी
गोपी निघाल्या बाज़ारी

अशी जायची नाही मी घरी
घट झाला जड कटेवरी
करू नको उशीर आतातरी
पावा वाजव रे श्रीहरी

चुगल्या क़री पैन्जण
मौन धरे ना कांकण
जमल्या सख्या गौळण
पूसे, कुठे तुझा साजण

आल्या सावल्या दाटून
आला ग चंद्रमा नभी
थकली असेल वाट पाहून
आई दारातच उभी

निजले ग रान-फूल
घरी परतल्या गाई
सख्या घालीतो चांद-हूल

कान्हा नॅशनल पार्क

Submitted by आशुतोष०७११ on 30 May, 2012 - 12:15

ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याच्या 'फोलिएज' ह्या संस्थेच्या कॄपेने मध्य प्रदेशातल्या कान्हा नॅशनल पार्कात भटकंती झाली. कान्हा नॅशनल पार्क जबलपूरहून १६० किमी अंतरावर आहे, ह्या नॅशनल पार्कचं प्रमुख आकर्षण अर्थातच वाघ आहे. पण त्याचबरोबर चितळ,सांबर, हार्ड ग्राऊंड बारशिंगा, अस्वल, कोल्हा असे विविध प्राणी आणि अगणित पक्षीही दिसतात.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कान्हा, कान्हा आन पडी मै तेरे द्वार

Submitted by स्वप्ना_राज on 18 August, 2011 - 01:41

"आजी ग, तुझ्या घरातला तो कृष्णाचा फ़ोटो कुठे आहे? ह्या घरात लावला नाहीयेस का?" आजोबा गेल्यानंतर आजी मुंबईला स्थायिक झाली त्यालाही १-२ वर्षं झाली होती. तिच्या घरात मी आणि आई गप्पा मारत बसलो होतो.
"कुठला ग?"
"नाही का मधल्या खोलीतून किचनकडे जाणार्‍या दरवाजाच्या वर लावला होता तो?"
"तो होय. अग सामानाच्या हलवाहलवीत कुठे गेला काय माहित. इथे मुंबईत आल्यावर सापडला नाही."
"शुअर आहेस तू? सगळं सामान पाहिलंस?" मी पुन्हा खोदून विचारलं.
"हो, पाहिलं ना. नाहीये कुठेच. पण तू का विचारतेयस?" आजीने थोडंसं आश्चर्याने विचारलं.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्राणसखा..

Submitted by मी कल्याणी on 25 March, 2011 - 00:41

पाचूच्या रानात पुन्हा बासरी घुमली
सागरनिळाई ओल्या दिठीत सजली
हरपली राधा मनी मोरपंखी साज
मेघियात दाटू आले कान्हाचे आभास

सोनसळी हूरहूर अंतरी दाटली
हसुनिया पळभर सांज रेंगाळली
निमिषात पानोपानी कान्हा उमलला
आभासछबीत कान्हा राधेस भेटला

वा-यावर लहरली जणू रूणझूण
मेघातून दाटू आले निळे-श्याम क्षण
पाखरांच्या चाहूलीचा करुनी बहाणा
वेध घेई राधा.. म्हणे आला यदुराणा..

प्राण आसावला तरी चाहूल देईना..
निजू पाहे सांज तरी श्रीरंग येईना
यमुनेचे नीर नयनात भरू आले
मोरपीसावरी दोन मोती विसावले

वा-यावर अनामिक घुमली लकेर
मनाचा हिंदोळा गेला दूर नभपार
शहारली राधा, मनी श्रावण अवघा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कान्हा तुझ्या बासुरीने वेड लाविले

Submitted by कल्पी on 18 March, 2011 - 23:38

कान्हा तुझ्या बासुरीने वेड लाविले
वेड लाविले
हातातले काम विसरुन ध्यान लागले
कान्हा तुझ्या बासुरीने वेड लाविले

रासलिला खेळताना रंग सांडले
रंग
भिजलेल्या काया माझी जग विसरले
कान्हा तुझ्या बासुरीने वेड लाविले
वेड लाविले

नको ना तु छळु असा छुनछुन वाजले
नादात मी पावलाच्या ताल लावले
कान्हा तुझ्या बासुरीने वेड लावीले
माझ्या मध्ये राहुनी तु मी तुझी जाहले

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खोटारडा तू...

Submitted by तुंगा on 22 December, 2010 - 12:04

खोटारडा तू आहेस कान्हा
सदा ठकवितोसी आम्हा गोपीकांना !! धृ!!

सवंगड्यास घेऊनी घरामध्ये येतो
दही, दूध, लोणी खाऊन जातो
किती शोधू याला, कुठे सापडेना !! १ !!

यमुनेच्या पाण्या जाता अडवितो वाट
खडे मारूनी हा फोडीतसे माठ
काय सांगू बाई सासुसासर्‍यांना !! २ !!

स्नान करायासी गेलो यमुनेच्या डोही
कसा कोठोनि हा आला कळालेच नाही,
घेऊनिया वसने म्हणतो, जोडा करांना !! ३ !!

कुणा हसवितोसी, कुणा रडवितोसी,
कुणा तारीतोसी, कुणा मारीतोसी
हरी तुझी लीला, कुणाला कळेना !! ४ !!

तुंगा...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कान्हा