गर्दीत हरवून ही
का मनास रिते रिते वाटे
हसु चेहऱ्यावरी तरी
का डोळ्यात पाणी साचे..
ऐकता नाव कधी तिचे
का धुंद मनात बासरी वाजे....
सुप्त झाल्या आठवणी साऱ्या
तरी का मनास बोचे काटे
ना चारोळीत दिसे ती आता
ना कवितेत ती साजे..
ऐकता नाव कधी तिचे
का धुंद मनात बासरी वाजे....
पापण्या मिटता आता ही
का तिचाच चेहरा दिसे
गुंतते नजर नजरेत अजुन ही
जरी तुटले मैत्रीचे धागे..
ऐकता नाव कधी तिचे
का धुंद मनात बासरी वाजे....
मी लिहलेल्या प्रत्येक शब्दांना
तिच्या ओठांचा स्पर्श असे
बासरी....
मनमंदिरी वाजू लागली बासरी
मनमोहना लागली तुझीच आस
रत्नजडितं मुगुट त्यावर खोचलेले मोरपिसं
घननीळा लागला तुझाच ध्यास
कुंजवनी घुमू लागला पावा
कृष्णा करिते तुझाच रे धावा
हंबरती धेनू ऐकून तुझी वेणू
वेड लावलेस या राधेला जणू
शामल मूर्ती कमरेस खोचली मुरली
पाहून आता ना जीवनाची आस उरली
राजेंद्र देवी
गाढ झोपेत असलेल्या त्याच्या चेहऱ्यावर मानवी भावनांची जणू जत्राच भरली होती. मध्येच त्यावर एखादी स्मित लकेर उमटून जाई, मधेच त्याचा चेहरा पूर्ण जगाचे दुःख पचवल्यासारखा करुण होऊन पिचून निघे. स्वप्न बघत होता हो तो. हास्याचा भाग म्हणजे त्याचे पितृतुल्य गुरुजी, घरून पळून आलेल्या बासरीवेड्या पोराला त्यांनी दिलेला थारा. त्याच्या चेहऱ्यावर अगोदर आलेलं स्मित त्याला आठवण देत होतं, पहिल्या दिवशी गुरुजींनी जेव्हा त्याला पोकळ वेळूच्या भोके पाडलेल्या काठीत भावना रित्या करणे शिकवणे सुरू केले होते तेव्हा तो जागेपणी असाच स्मित करत होता.
ये पुन्हा, भेदून ये त्या काल-पटलाला, इथे
ये जरा, ऐकू पुन्हा, तव शब्दविरहित भाषिते
ये जरा स्पर्शून किंचित अद्भुताची ती मिती
जी कधी स्वप्नात दिसते जागृतीच्या शेवटी
ये इथे, ऐकू पुन्हा, घननीळ वाजवी बासरी
मग पुन्हा बरसून येऊ तप्त मरूभूमीवरी
सख्या रंग तुझा सावळा
श्रावणी बरसे घन-नीळा
जीव आसुसला हरी-दर्शना
पावा वाजव रे कान्हा
केशर उधळीत आला भास्कर
सात अश्वान्च्या रथी स्वार
सोनसळी मोहरली वसुंधरा
कमल पुष्प मुक्त करी भ्रमरा
वाट पाहते यमुनातीरी
कधी येणार श्रीहरी
उन्हं आली डोईवरी
गोपी निघाल्या बाज़ारी
अशी जायची नाही मी घरी
घट झाला जड कटेवरी
करू नको उशीर आतातरी
पावा वाजव रे श्रीहरी
चुगल्या क़री पैन्जण
मौन धरे ना कांकण
जमल्या सख्या गौळण
पूसे, कुठे तुझा साजण
आल्या सावल्या दाटून
आला ग चंद्रमा नभी
थकली असेल वाट पाहून
आई दारातच उभी
निजले ग रान-फूल
घरी परतल्या गाई
सख्या घालीतो चांद-हूल
काल खूप दिवसांनी गुरुजींकडे (पं. राजेंद्र कुलकर्णी यांच्याकडे) रियाजाला गेलो होतो. गुरुजींनी 'जनसंमोहिनी' हा राग निवडला होता. वादनानंतर मनात आलेले विचार अनावरपणे लिहिले गेले तेच इथे देतोय.
पीव्हीसी पाईपपासून बासरी तयार करण्याचे उद्योग सुरू झाले तेव्हापासून हा लेख लिहायचं मनात होतं. स्वतः बांबूपासून बासरी तयार करायला सुरुवात केली आणि लेख लिहिण्याची इच्छा खूप तीव्र झाली.
काल हापिसात कमी काम असल्याने हा लेख पूर्ण झाला.
(पण हापिसात मायबोली उघडत नसल्याने इतरत्र प्रकाशित केला.)
नमस्कार,
भिडे काकांच्या 'पहिले चुंबन' या कवितेला चाल लावायचा प्रयत्न केलाय.
माझ्या दिव्य (!) आवाजात त्याचं पहिलं कडवं गाऊन बाकी बासरीवर वाजवून रेकॉर्ड केलंय.
इथे हा प्रयत्न ऐकता येईल.
ऐकून तुमची स्पष्ट मतं कळवावीत ही विनंती.
चाल चांगली वाटली आणि ती गाण्यास कुणी उत्सुक असेल तर आनंदच होईल.
- चैतन्य.
साधारण माझ्या बारवीच्या परीक्षेच्या आधी काही महिने मी शास्त्रीय संगीत ऐकायला सुरुवात केली. त्या-आधी क्वचित रेडिओवर ऐकलं असेल तरच, अन्यथा कॅसेट आणून ऐकलं नव्हतं कधी. पण ऐकायला 'व्होकल क्लासिकल'ने सुरुवात झाली आणि मग 'इंस्ट्रुमेंटल' ! वाद्यांमध्ये बासरी अग्रगण्य. पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. रघुनाथ सेठ, पं. विजय राघव राव यांच्या कॅसेट्स तुडुंब ऐकल्या आणि आपोआपच मनात ठरलं की 'जर एखादं वाद्य शिकलो, तर बासरीच शिकायची'. शिक्षण पूर्ण होईपर्यंत काही योग नाही आला पण नोकरीनिमित्ताने चेन्नईला आलो आणि सुदैवाने फार चांगले (आणि हिंदी बोलू शकणारे) गुरू मिळाले.