कान्हा नॅशनल पार्क

Submitted by आशुतोष०७११ on 30 May, 2012 - 12:15

ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याच्या 'फोलिएज' ह्या संस्थेच्या कॄपेने मध्य प्रदेशातल्या कान्हा नॅशनल पार्कात भटकंती झाली. कान्हा नॅशनल पार्क जबलपूरहून १६० किमी अंतरावर आहे, ह्या नॅशनल पार्कचं प्रमुख आकर्षण अर्थातच वाघ आहे. पण त्याचबरोबर चितळ,सांबर, हार्ड ग्राऊंड बारशिंगा, अस्वल, कोल्हा असे विविध प्राणी आणि अगणित पक्षीही दिसतात.

भारतात ज्या काही जंगलांची व्यवस्थित निगा राखली जाते, काळजी घेतली जाते, अशा जंगलांमध्ये कान्हाचा क्रमांक अर्थातच पहिला लागतो. याचे श्रेय ईथल्या वन खात्याच्या कर्मचार्‍यांबरोबरच आसपासच्या गावातल्या लोकांनाही द्यावंच लागेल. ईथल्या जंगलात साल वॄक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. खर्‍या अर्थाने जर जंगल अनुभवायचे असल्यास कान्हाला पर्याय नाही.

प्राण्यांच्या बाबतीत म्हणाल तर आपण त्यांच्या क्षेत्रात त्यांना पहायला जातो, त्यामुळे नशीबाची साथ हवी. वाघ हा तर जंगलचा राजा, तो त्याच्या मर्जीप्रमाणेच जंगलात फिरणार. तेव्हा जंगल सफारीसाठी अनुभवी गाईड असणं महत्वाचं. 'कॉल' ऐकून वाघाचा जंगलात माग काढणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. वाघाच्या हालचाली बाकीच्या बेसावध प्राण्यांपर्यंत पोचवण्याचं काम चितळ, लंगूर आणि सांबर करत असतात. ह्या त्यांच्या सावध करण्याला 'कॉल' म्हणतात. तीन दिवसांच्या सफारीमध्ये असे कित्येल कॉल जंगलात ऐकले पण 'राजां'नी दर्शन मात्र एकदाच दिलं. ह्या वेळच्या जंगल सफारीत मात्र पहिल्यांदाच अस्वलांचं दर्शन झालं.

ह्या सफारीत जे काही प्राणी आणि पक्षी दिसले ते कॅमेर्‍यात बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला, त्याची ही चित्रमय झलक.

१) शिकरा
IMG_2076_Sushrut copy_RS.jpg

२) लेसर व्हिस्परिंग डक्स
IMG_2086_Sushrut copy_RS.jpg

३) युरेशियन थिक क्नी
IMG_2042 copy_RS.jpg

४) घुबड
IMG_2003_Sushrut copy_RS.jpg

५) सर्पंट ईगल
IMG_1925_Sushrut copy_RS.jpg

६) व्हाईट ब्रेस्टेड ईगल
IMG_2140_Sushrut copy_RS.jpg

७) मोर
IMG_2144_Sushrut copy_RS.jpg

८) बुलबुल
IMG_2328_Sushrut copy.jpg

९) बी ईटर
IMG_2330_Sushrut copy.jpg

१०) किंगफिशर
IMG_2352_Sushrut copy.jpg

११) ब्लॅक आयबीस
IMG_2368_Sushrut copy_RS.jpg

१२) वाघ
IMG_2032_Ashutosh copy_RS.jpg

१३) ईंडियन गौर
IMG_1917 copy_RS.jpgIMG_1921 copy_RS.jpg

१४) हार्ड ग्राऊंड बारशिंगा
IMG_1933 copy_RS.jpgIMG_1939 copy_RS.jpgIMG_1941 copy_RS.jpgIMG_1944 copy_RS.jpgIMG_1959 copy_RS.jpgIMG_2017_Sushrut copy_RS.jpgIMG_2313_Sushrut copy_RS.jpg

१५) अस्वल - स्लॉथ बेअर
IMG_2293 copy_RS.jpgIMG_2295 copy_RS.jpg

१६) चितळ - स्पॉटेड डियर
IMG_1992 copy_RS.jpgIMG_2130 copy_RS.jpgIMG_2134 copy_RS.jpgIMG_2135 copy_RS.jpg

१७) कोल्हा
IMG_2103_Sushrut copy+RS.jpg

१८) सांबर
IMG_2007_Sushrut copy_RS.jpgIMG_2117 copy_RS.jpgIMG_2129_Sushrut copy_RS.jpg

१९) बार्किंग डियर
IMG_2062_Sushrut copy_RS.jpg

२०) लंगूर
IMG_2109 copy_RS.jpgIMG_2281 copy_RS.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अप्रतिम प्रचि. धन्यवाद.
वाघाचं वेड घेऊनच लोक कान्हाला जातात त्यामुळे ह्या इतर दुर्मिळ वन्यदर्शनाला मुकतात.
<< भारतात ज्या काही जंगलांची व्यवस्थित निगा राखली जाते, काळजी घेतली जाते, अशा जंगलांमध्ये कान्हाचा क्रमांक अर्थातच पहिला लागतो.>> खरंच असावं . कान्हाला भेट देणं हा अविस्मरणीय अनुभव आहे.
[सहज कुतूहल म्हणून - इतकं सारं नेमकं, छान टिपायला किती दिवसांचा मुक्काम करावा लागला कान्हात ?]

कान्हा इज सो सो क्लोज टू माय हार्ट...
वाघ ,शिकार करताना पाहिलास कि नाही?
पूर्वी एका झाडाला म्हैस बांधून ठेवायचे.. तिथेच जवळच्या उंच झाडावर बांधलेल्या मचाणावर टूरिस्ट्स ना वाघाला शिकार करताना पाहण्याची सोय व्हावी म्हणून..
पण कधी कधी रात्रभर वाघ यायचा नाही ..मात्र म्हशीचं भेदरलेल्या आवाजात हंबरणं ऐकवायचं नाही..तिच्या डोळ्यात तर साक्षात मृत्यू ची भीती दाटून आलेली दिसायची.. Sad
बाकी बायसन पाहतानाही फेफे उडायची..
हत्तीणी वरच्या हौद्यात बसून जंगलात टूर घेतलास कि नाही??
खूप मस्त आलेत फोटोज.. Happy

भारी !
खंडोबा,वाघोबा, हरणांची टक्कर, गवा, कोल्हा अन चक्का अस्वलही ! वा एकदम सगळं जंगल मिळालं की तुला Happy मस्त रे ! फोटो भारी आलेत.

सुंदर फोटो! सगळेच आवडले पण मोराचा डौल काही औरच आहे आणि तो फोटोतही दिसतोय!

कान्हाला नक्की जाणार!

धन्यवाद आशुतोष!

भारी आहेत फोटु. Happy
बाकि वाघ तुला बघुन घाबरुन पळुन गेला म्हणे. Wink
बघ की वाघ तुला पाठ दाखौन पळुन जातानाचा फटु हाय हिथं.

Pages