आवडता पक्षी

पक्षीनिरिक्षण - Hummingbirds & Bushtits

Submitted by वर्षा on 11 July, 2026 - 18:19

जूनमध्ये कॅलिफोर्नियाचा निरोप घेतला. आतापर्यंत अनेक वेळा अपार्टमेंट्स बदलली आहेत, त्यामुळे त्यात नवीन असे काही नव्हते. पण इथे मात्र वाईट वाटले फार सोडून जाताना! कारण अर्थातच पक्षी! इथे मी चार वर्षे सलग राहिले. त्यामुळे मला पक्ष्यांची आणि पक्ष्यांना माझी ओळख व सवय झाली असणार, नव्हे झाली होतीच. बर्ड बाथ साफ करण्याच्या वेळेस अगदी पाच मिनिटेही तो बर्ड बाथ नजरेस पडला नाही तर बाजूच्याच फांद्यांवर चिवचिवाट करत थांबून राहताना, बर्ड बाथच्या रिकाम्या जागेवर अधीर चकरा मारताना, शोधाशोध करताना पक्ष्यांना पाहिलेय.

शब्दखुणा: 

पक्षीनिरिक्षण - निळे पक्षी! (बर्ड्ज इन ब्ल्यू!)

Submitted by वर्षा on 19 May, 2026 - 22:13

पक्ष्यांमध्ये निळ्या रंगाच्या पक्ष्यांचे आकर्षण मला जास्तच आहे. कारण नक्की सांगता येणार नाही कदाचित पण मुंबईसारख्या शहरात रंगीबेरंगी म्हणण्यापेक्षा बोल्ड कलर्स ल्यालेले पक्षी तसे कमी दिसत. अगदीच नाहीत असं नाही अर्थात कारण, सोनसळी रंगाचा हळद्या, पिवळे-लालभडक पॅच असलेला तांबट किंवा हिरवेगार पोपटही घरबसल्या दिसत आणि नेत्रसुखद वाटत. त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी पाहिले गेलेले मोर, किंगफिशरही परिचयाचे, पण ते सोडल्यास निळ्या रंगाचे पक्षी झाडावर बसलेत, असं काही कधी मी पाहिले नव्हते. त्यामुळे त्यांचं मला आजतागायत विशेष सुप्त कौतुक आहे.

शब्दखुणा: 

पक्षीनिरिक्षण - अमेरिकन वुडकॉक

Submitted by वर्षा on 23 April, 2026 - 23:44

अमेरिकन वुडकॉक या पक्ष्याकडे एरवी लक्ष जाण्याचं काही कारण नव्हतं. हौशी पक्षीनिरीक्षक असले तरी अजून चिक्कार पक्षी हे माझ्या 'कधीही न पाहिलेल्या' (लाईफर) यादीत आहेत. त्यात हा असणारच होता आणि आजपर्यंत कधीही त्याच्याविषयी ना कुठे स्पेशल फोटो बघण्यात आले की कुठे काही वाचले. यंदाचा मार्च येईपर्यंत या परिस्थितीत काही बदल नव्हता. पण अचानक मार्च अखेरीस इथल्या बातम्यांमधे हा पक्षी खूपच झळकू लागला. मला वाटतं, याची सुरुवात न्यूयॉर्क सिटीतल्या ब्रायंट पार्कच्या इन्स्टाग्रॅम हॅन्डलने केली असा माझा अंदाज आहे.

शब्दखुणा: 

पक्षीनिरीक्षण - Hermit Thrush आणि अमेरिकन रॉबिन

Submitted by वर्षा on 21 October, 2025 - 22:44

Hermit Thrush

हा पक्षी माझा अजून एक लाडका पक्षी. Hermit Thrush. स्केचिंगसाठी हा योग्य होताच पण तरीही याच्याबद्दल आधी लिहावे आणि मग स्केच काढावे असे ठरवले होते. पण उलट झाले आणि माझे स्केच आधी काढून झाले आणि आत्ता त्याच्याबद्दल लिहायला घेतलेय. त्यामुळे या लेखात त्याचे स्केच आणि फोटो दोन्ही असतील.

शब्दखुणा: 

पक्षीनिरीक्षण - फिंच!

Submitted by वर्षा on 8 October, 2025 - 19:47

फिंच म्हटल्यावर डार्विन आणि त्याच्या theory of evolution by natural selection मधल्या फिंच पक्ष्यांच्या चोचींच्या आकृत्या डोळ्यासमोर यायच्या. भारतात कधीही हा पक्षी मी पाहिला नव्हता. आणि इथे आल्यापासून रोज दर्शन होतेय! गंमत म्हणजे यांना पाहिल्यावर मला हमखास आपल्याकडच्या चिमणीची आठवण येते पण मी असलेल्या सध्याच्या या भागात मला प्रत्यक्ष चिमणी मात्र फारशी दिसल्याचं आठवत नाही. आपल्याकडील चिमणा नाही, पण चिमणीताई मात्र इथल्या सौ. हाऊसफिंचसारख्या पुष्कळच दिसतात. तसाच करडा रंग, आकार आणि हो तशीच चोच!

शब्दखुणा: 

कुमार

Submitted by निरंजन on 28 March, 2012 - 00:29

नुकतच मला कोणीतरी विचारल की तुझा आवड्ता पक्षी कोणता मी म्हणालो, "माझा आवड्ता पक्षी कावळा". ऎकणार्‍याच तोंड जरा वेडवाकड झाल.

तुम्हाला सुद्धा विचित्रच वाटत न !

या कावळ्याची व माझी गट्टी झाली तीच मुळी "एक घास काऊचा, एक घास चिऊचा" पासुन.

"कावळ्याच घरट शेणाच व चिमणीच मेणाच" या गोष्टीत, घर वाहुन गेलेल्या त्या कावळ्याला ती चिमणी किती त्रास देते. बिचारा कावळा, मला त्या लबाड चिमणीच केलेल कौतुक कधीच आवडत नव्हत. त्या चिमणीचा मला फ़ार राग यायचा.

किती बिचार्‍या ह्या प्राण्यावर माणसानीसुद्धा अन्याय केलाय. त्याला पार खालच स्थान दिलय.

कावळा म्हणे "मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा दिसतसे

गुलमोहर: 
Subscribe to RSS - आवडता पक्षी