खऱ्या-खोट्याच्या मध्ये असणारी
अंधुकशी रेषा
बिंब प्रतिबिंबाची एक सुंदर भाषा.
झाडे, पाने,घरं, एक मुलगी
स्वच्छ सोनेरी उन्हात…
आणि,
…निळे आभाळ
वाकून पाहतेय पाण्याच्या आरशात.
फोटो-प्रकाशचित्रे हा स्वतंत्र, स्वयंपूर्ण कलाअविष्कार आहे. एखादा फोटो इतका अर्थपूर्ण असतो की शब्दांची साथ त्यांना लागत नाही. तरीही, कधी कधी फोटो काढला की, (उगीचच) असे वाटते की यावर आपल्याला अजुन काही म्हणायचय. एक प्रयोग म्हणून हे मायबोलीवर सादर करावेसे वाटले.
रूपकुंड, शेकडो प्राचीन सांगाड्याने भरलेला विलक्षण तलाव
भव्य हिमालयातील उंच, बर्फाच्छादित शिखरे आणि चित्तथरारक खोऱ्यांमध्ये वसलेले, एक थंडगार रहस्य असलेले सरोवर आहे: रूपकुंड, ज्याला स्केलेटन लेक देखील म्हटले जाते. 16,500 फूट उंचीवर असलेल्या या पाण्याच्या शरीरात एक भयंकर रहस्य आहे - त्याचे किनारे शेकडो प्राचीन सांगाड्यांनी भरलेले आहेत, त्यांचे मूळ एका वेधक गूढतेने झाकलेले आहे ज्याने इतिहासकार आणि शास्त्रज्ञांना अनेक दशकांपासून चकित केले आहे.
सांगाड्याचा शोध
पुणे सर्जिकल सोसायटीतर्फे 'अर्ली डिटेक्शन सेव्हज लाईव्हज' या ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून गेल्या रविवारी सकाळी पुणे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते.
ओंकारेश्वर मंदिरापासून शनिवार पेठेतून कसबा पेठेकडे या हेरिटेज वॉकमध्ये गेल्या १००+ वर्षांपासून असलेल्या पुण्यातल्या ऐतिहासिक वास्तु बघताना केवळ ऐतिहासिक पैलूच नाही तर स्थापत्यशास्त्र, पुरातत्त्वीय बाजू, सांस्कृतिक संक्रमण वगैरे माहिती देखील तज्ञांकडून जाणून घेता आली.
लहानपणी रात्री टेरेस वर झोपून तारे बघताना त्या अनंत अवकाशाची आवड निर्माण झाली. जयंत नारळीकरांची पुस्तक,लेख वाचायला अवडायचे.
चंद्राच्या कला, मंगळ, गुरू, शुक्र, शनी, सप्तर्षि, मृग नक्षत्र अगदी शहरातील झगमगाटातही उठून दिसतात. ही रोजची मंडळी बघायला कधीही बर वाटत. पण ग्रहण हा काही औरच नजारा असतो.
ही कधीतरी घडणारी किमया नेहमीच मला भुरळ घालते. खग्रास चंद्रग्रहणात दिसणारा तो लालसर नारंगी रंगाचा Blood Moon किती मोहक वाटतो. आजपर्यंत दोनदा ते मोहक दृश्य बघण्याचा योग आला, रात्र जगवली त्यासाठी पण सार्थक झालं.
प्रचि०१-अ - चंद्र -शुक्र-मंगळ
सिएटल आणि “Pike Place Market” हे नाव जोडीनं मी बऱ्याच वेळेला ऐकलं होत.
आमचं हॉटेल डाऊनटाऊन मध्ये, मार्केट पासून अक्षरश: सातेक मिनिटे चालत होत. त्यामुळे चेक इन केलं, बॅगा टाकल्या, आणि आम्ही बाहेर पडलो.
सिएटल सिटी म्हणजे सॅन फ्रान्सिस्को चा बाप आहे असच वाटलं. अरुंद आणि भयंकर चढ/उतार असलेले रस्ते. चौथ्या ऍव्हेन्यू वरून नजर टाकली की खाली उतरत जाणारा रस्ता, बऱ्यापैकी अरुंद, दुतर्फा उंचच्या उंच बिल्डींग्स, त्या उतरत्या रस्त्यांच्या टोकाला सुरू होणार समुद्र.
नियमित दिसणाऱ्या बसेस, बस स्टॉप वरची माणसं , रस्त्याने चाललेले माणसांचे घोळके, तशीच लगबग.
सिएटलच्या साधारण दक्षिणेला माऊंट रेनिअर ही साधारण १४,४७० फूट उंच पर्वत रांग आहे. ती माऊंट रेनिअर नॅशनल पार्क मध्ये आहे. आम्ही फक्त एकच दिवस हाताशी असल्याने पॅराडाईज पॉईंट जवळची काही स्थळे बघितली, जस Myrtle फॉल्स, Reflection लेक, आणि थोडंफार हायकिंग केलं.
मांजरांखालोखाल मला काय प्रिय असेल तर ते पक्षी.
सहजच नेहेमीच्या रस्त्यात ही सुंदर फुल टिपायला मिळाली.
**"

***

***

***

उन्हाची काहीली वाढते आहे आणि तापमान दिवसागणिक चढते आहे..
आपली घरे बाहेरून तापल्यानंतर आपल्याला नको असणारी ‘ती’ घरात कुठल्या ना कुठल्या फटीतून शिरकाव करतेच..
‘तिला’ पाहिले रे पाहिले की,
“इss .. नको, शी !”
असा आवाज कुटुंबातून येणारच !
तर ही आपली पाहुणी ! बघा इथे कशी तिची शिकार करते आहे आणि आपल्याला नको असलेल्या एका जीवाचा खात्मा करणार आहे…..
..
..
सरपटणारी 'ती' आवडत नसेल तर इथेच थांबा !
..
..