प्रकाशचित्रण

नवा मेंबर मनीमाऊ झोई (Zoe) उर्फ सगुणा - म्यांव म्यांव

Submitted by भोजराज on 30 August, 2018 - 23:07

मुलांच्या हट्टाला मान देऊन आम्ही एकदाची मनीमाऊ घरी आणली. मुलांनी तिचं नाव ठेवलं झोई आणि पत्नीनं सगुणा.

Zoe1.jpg

ती थोडीशी घाबरट आहे, पण गोड आहे. आमचा आवडता टाईमपास म्हणजे खिडकीत बसून बाहेर पक्षी वगैरे बघणे.
Zoe2.jpg

तिला मसाज करून घ्यायला फार आवडतो. अगदी ब्रह्मानंदी टाळीच लागते.
Zoe3.jpg

प्रांत/गाव: 

“पर्थी”ची वाट! भाग ३ – क्विनाना, लेक क्लिफ्टन, वार्नब्रो

Submitted by kulu on 21 August, 2018 - 23:28

“पर्थी”ची वाट! भाग २ - मुरो कट्टा

Submitted by kulu on 14 August, 2018 - 02:37

दुर्गा

Submitted by हरिहर. on 2 August, 2018 - 13:29

टेरेसमध्ये असलेल्या भिंतीवर टांगलेले हे टेराकोट्टाचे वॉल हँगीग पिस आहे. सहज फोटो काढला. जरा बरा वाटला. सगळ्यांबरोबर शेअर करावा वाटला. कॅमेरा आहे iPhone 7+
.
durga.jpg

तिरुपती दर्शन - कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी

Submitted by ferfatka on 17 July, 2018 - 05:40

तिरुपती बालाजी दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून भाविक जातात मात्र, दर्शन व राहण्याची सोय न केल्यास ही कुठलीही सहल त्रासदायक ठरते. एकतर तेथील भाषा वेगळी त्यात आपल्याला तेथील लोक सहकार्य करत नाहीत ही एक गोष्ट. मग लोकांना विचारत अथवा ट्रव्हल एजन्सीचे भरमसाठ पॅकेज घेत आपण ट्रिप करतो.यावेळी बालाजी दर्शनासाठी दर्शन, राहण्याची व जाण्या येण्याची सोय आधीच केल्याने दर्शन छान झाले. इतरांना तिरुपती बालाजी सहल सुलभ व्हावी यासाठी हा छोटा लेख....

DSCN1236.jpg

शब्दखुणा: 

धुम्रवलये

Submitted by हरिहर. on 27 May, 2018 - 11:27

आणि हे आहेत मागील वर्षीचे गणपतीतले फोटो. अर्थात यात बाप्पांचे फोटो नाहीएत. संध्याकाळची आरती झाली की सगळी बच्चे कंपनी प्रसाद घेवून 'मोरया’चा गजर करत दुसऱ्या फ्लॅटमध्ये आरतीसाठी धावतात. मग बायकोचे हलक्या आवाजात, अतिशय संथ आणि स्पष्ट ऊच्चारात अथर्वशिर्ष सुरु होते. माझे पाठ नसल्याने (या वर्षीही नाहीच झाले) बप्पाकडे पहात रहाण्यातला आनंद घेत असतो. हॉल मधल्या लाईट्स बंद असतात. समया आणि निरांजणांच्या ऊजेडासोबत किचनचा ऊजेड असतो फक्त. त्यामुळे भारीच वाटत रहाते. या वेळी ऊदबत्तीच्या धुराकडे पहाताना जाणवले की या आकृत्या कॅन्व्हासवर नुसत्या रेखाटल्या तरी मस्त पेंटीग्ज होतील. कॅमेरा काढला आणि शुट केले.

ताम्हीणी-२०१७

Submitted by हरिहर. on 27 May, 2018 - 07:29

पावसाळा येतोय. पावसाळी खरेदी अगोदर माझं पहिले काम असते 'गणपती' आणि 'पावसाळी सहलीचे' फोटो सॉर्ट करुन नको ते डिलीट करणे, बाकीचे वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह करणे. आज तेच काम करुन घेतले. त्यातलेच चार-पाच आपल्यासाठी येथे देतो आहे. या वेळेस नविन लेन्स घेतो आहे त्यामुळे पावसाची जरा जास्तच वाट पहातो आहे.
(कॅमेरा- Canon EOS 60D, लेन्स- 18-200mm.)

भुलेश्वर

Submitted by हरिहर. on 22 May, 2018 - 02:29

मला महिन्याच्या शेवटच्या सोमवारी-मंगळवारी घरी बसने जमत नाही. मी नकाशावर माझ्या घराचा केंद्रबिंदू धरुन १०० किलोमिटर त्रिज्येचे एक वर्तुळ आखून घेतले आहे. रविवारी रात्री झोपताना तासभर या वर्तुळात डोके घालून बसले की काही न काही सापडतेच. गेले दहा वर्षे मी हेच करतो आहे पण अजुन काही पुर्ण वर्तुळ भटकुन पुर्ण झाले नाही. पण कधी कधी अगोदर पाहीलेलेच परत परत पहावे वाटते. अशा वेळी माझी पावले (चाके म्हणूयात) हमखास वळतात अशी तिन ठिकाणे. पुण्याजवळ असलेले रामदरा, यवत जवळ असलेले भुलेश्वर आणि सिन्नर जवळचे गोंदेश्वर.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्रण