प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक १० - खेळ मांडला.
प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक १० - खेळ मांडला.
बालपणीचा काळ सुखाचा. शाळा सुटली आणि गृहपाठ झाला रे झाला की बाहेर खेळायला जायची कोण घाई. विटी -दांडू, लगोरी, कबड्डी, खो-खो, आंधळी कोशिंबीर ,गोट्या,लपाछपी, भोवरा या खेळांत तासनतास कसे जायचे कळायचं नाही.
घरात खेळा म्हणलं तरी उत्साह तोच असायचा.
भातुकली, पत्ते, बुद्धिबळ, सापशिडी, नवा व्यापार,बाहुलाबाहुली लग्न, साबणाचे फुगे ... खेळ काही संपायचेच नाहीत. वर्गात सुद्धा बाकावर बसल्या बसल्या फुल्ली-गोळा खेळायला धमाल यायची. मंडळी,
आजचा विषय हाच आहे. खेळ.
