मायबोलीवर एखाद्या नव्या सभासदाने थेट देवनागरीत काही लिहिले कि मनात प्रश्नांचे काहूर उठते. त्यामूळे ही प्रश्नावली भरून घ्यावी काय ? पडीक सभासदांनी भर घालावी.. हि विनंति ( नम्र वगैरे नाही, थेट विनंतिच )
१) तूम्ही मराठी टायपायला कुठे शिकलात ?
२) तूमचे वय इतके तास, इतके दिवस, इतके आठवडे आहे, ते का ?
३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती ?
३) जूना ( रेग्यूलर ) आय डी कुठला होता ?
४) त्या वेळचे डू. आय. कुठले होते ?
५) कुठल्या कंपूत होता ?
६) गेल्या वर्षाविहाराला आला होतात का ? का आला होतात ?
७) तूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) ?
कॅल्शियम कोणकोणत्या अन्नपदार्थातून मिळते? फक्त दुध आणि दुग्धजन्य पदार्थातून मिळते का? जे दुधाचे पदार्थ खात नाहित त्यंच्यासाठी काय पर्याय आहेत?
हिंदू धर्मानुसार मनुष्य जन्म हा दैवदुर्लभ असतो . कित्येक योनी फिरल्या नंतर मनुष्य जन्म लाभतो . मनुष्य जन्माचे सार्थक किंवा Aim हाच असतो कि आपण देवत्व प्राप्त करून घेण्याकडे वाटचाल करावी .
जन्म हा आपापल्या पाप पुण्यानुसार मिळतो . जो विचार आपण धारण करतो त्यानुसार आपण वागतो . देवत्व प्राप्त करणे हे नवविधा भक्तीने शक्य असते . नऊ पैकी कोणताही मार्ग अनुसरणे याचे स्वातंत्र्य हिंदू धर्मात दिलेले आहे . पण त्याच बरोबर आपले विहित कर्म करता करता कुठल्याही प्रकारची भक्ती करावी असेच सुचवले गेले आहे.
मागच्या काही काळात एका संस्थळावर आरोग्यासाठी योग या विषयावर यावर स्नेहांकीता यांचे लेख वाचले आणि आवडले , योगाने मानसिक आणी शारीरीक आरोग्य सुधारण्याची ही पद्धत मला सोपी वाटली व यात रस असणार्या इच्छुकांनाही लाभ मीळावा म्हणुन मायबोली वरही ते प्रकाशित व्हावे या इच्छेने मी स्नेहांकीता कडुन अशी परवानही मागितली आणि स्नेहांकीता बरोबर झालेल्या भेटीत त्यांनी मला हे लेख प्रकाशित करण्याची परवानगी दिलीही. (पुढील लेखन हे स्नेहांकीता यांनी केले आहे).
आरोग्यासाठी योग - १
१ ले चर्चा सत्र :
विषयः मोदींना पर्याय काय, मोदींना पर्याय का नाही, मोदींना पर्याय निर्माण होणे आवश्यक आहे की नाही!
दिवसः ७ जानेवारी २०१५
१. मोदींसारख्या नेत्यांना पक्षांतर्गत व पक्षबाह्य असे दोन्ही ठिकाणी समर्थ पर्याय निर्माण होणे एका देशासाठी आवश्यक आहे.
२. काँग्रेसने तूर्त नवीन चेहर्यांचा विचार करावा व पक्षबांधणीवर फोकस ठेवावा. ज्योतिरादित्य शिंदे हे नांव दोन सदस्यांनी सुचवले.
१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
गुजरानवाला इथल्या छावणीतील निर्वासितांमध्ये आता हिंदुस्तानात जाण्याच्या उमेदीने चैतन्यं आलं होतं. हिंदुस्तानात पोहोचल्यावर पुढे काय हा प्रश्न सर्वांपुढे आSS वासून उभा राहणार होता! छावणीत आलेला प्रत्येकजण आपलं घरदार, नोकरी किंवा व्यवसाय पाकीस्तानात सोडून कायमचा हिंदुस्तानात जाण्यासाठी निघणार होता. प्रत्येकाला पुनश्च हरी ॐ म्हणूनच पुन्हा सुरवात करावी लागणार होती. परंतु हिंदुस्तानात पोहोचल्यावर निदान जीवाची सुरक्षीतता तरी लाभणार होती! कोणत्याही क्षणी एखादा धर्मांध माथेफिरू आपल्यावर चाल करुन येईल आणि आपला जीव घेईल ही तरी भीती नव्हती.