योग
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर (६३ किमी)
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
एटलस सायकलीवर योग यात्रा १: प्रस्तावना
१: प्रस्तावना
नमस्कार!
नुकतीच मी एक सायकल मोहीम पूर्ण केली. योग प्रसारासाठी सायकल यात्रा अशा मोहीमेत सुमारे ५९५ किलोमीटर सायकल चालवली आणि ठरवल्याप्रमाणेच ही मोहीम पूर्ण झाली (फक्त काही कारणामुळे एक टप्पा कमी झाला). मध्य महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात कार्यरत 'निरामय योग प्रसार व संशोधन संस्था' तसेच तिच्या कामाचा झालेला विस्तार ह्या संदर्भात हा प्रवास होता. परभणी, जालना, औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काम करणारे योग साधक, योग शिक्षक ह्यांच्याशी ह्या प्रवासात भेटलो. आता त्याविषयी सविस्तर लिहिणार आहे.
योग प्रसारासाठी सायकल यात्रा- परभणी- जालना- औरंगाबाद- बुलढाणा जिल्ह्यामध्ये ६०० किमी सायकलिंग
सर्वांना नमस्कार!
एक नवीन सोलो सायकल मोहीम करणार आहे. त्यासंदर्भात आपल्याशी बोलेन. गेल्या वर्षी सातारा परिसरात योग- ध्यान हा विषय घेऊन एक छोटी मोहीम केली होती. ह्यावेळी सुद्धा 'योग प्रसारासाठी सायकल यात्रा' अशी एक मोहीम करतो आहे. मध्य महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये कार्यरत 'निरामय योग प्रसार व संशोधन संस्था' व त्या संस्थेच्या विस्तारलेल्या कार्यासंदर्भात हा प्रवास असेल. परभणी, जालना, औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काम करणारे योग कार्यकर्ते व योग शिक्षक ह्यांना ह्या प्रवासात भेटेन.
योग आणि व्यसनमुक्ती - सौ. जयश्री शुक्ल
मध्यंतरी ठाणे पाठपुराव्याला गेलो असताना सर्वप्रथम जयश्रीताईंची ओळख झाली. त्यांचं "योग आणि व्यसनमुक्ती" विषयावर भाषण ठेवलं होतं. विषयाचा आवाका प्रचंड होता आणि वेळ फारच थोडा. तेवढ्या वेळातही जयश्रीताई जे बोलल्या ते फार आवडलं आणि पटलं देखील. त्यांचे भाषण झाल्यावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेत त्यांचे विचार नीट समजून घेता आले. आणि त्याच वेळी वाटले की यांची मुलाखत आनंदयात्रीसाठी घेणे आवश्यक आहे. मुक्तांगणमध्ये योग हा व्यसनमुक्तीवरील उपचारांचा एक भाग म्हणून वापरला जातो. मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट म्हणजे मोठ्या मॅडम यादेखील योगाभ्यास करीत असत.
न न न-काव्य
काव्य काव्य म्हणजे नक्की काय असतं ?
मला विचाराल तर
उगीच शब्दांचा सव्य आणि अपसव्य असतं
वाचकांसाठी बरेचदा सर्वसाधारण
पण लिहीणार्या साठी मात्र नेहमीच भव्य असतं
यमक साधणे हेच काही वेळा गंतव्य असतं
कारण मुक्तछंदाला फारसं भवितव्य नसतं
पण नाविन्य सांभाळून गेयता
हे खरोखरच एक दिव्य असतं
असेल कवि जर गोड गळ्याचा
तर काव्य देखील सुश्राव्य असतं
पण कवि जर असेल "काका" चा बांधव
तर चांगल्या कवितेचं ही "काव्य" बनतं
काव्य म्हणजे अभिरुची,
काव्य म्हणजे अभिव्यक्ती
काव्य म्हणजे _प्रेम, विरह, त्याग आणि आसक्ती