शाकाहार आणि अध्यात्म

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 30 January, 2015 - 08:19

हिंदू धर्मानुसार मनुष्य जन्म हा दैवदुर्लभ असतो . कित्येक योनी फिरल्या नंतर मनुष्य जन्म लाभतो . मनुष्य जन्माचे सार्थक किंवा Aim हाच असतो कि आपण देवत्व प्राप्त करून घेण्याकडे वाटचाल करावी .
जन्म हा आपापल्या पाप पुण्यानुसार मिळतो . जो विचार आपण धारण करतो त्यानुसार आपण वागतो . देवत्व प्राप्त करणे हे नवविधा भक्तीने शक्य असते . नऊ पैकी कोणताही मार्ग अनुसरणे याचे स्वातंत्र्य हिंदू धर्मात दिलेले आहे . पण त्याच बरोबर आपले विहित कर्म करता करता कुठल्याही प्रकारची भक्ती करावी असेच सुचवले गेले आहे.

देवाकडे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नामस्मरण करणे . यासाठी जीभ हे इंद्रिय आपल्या ताब्यात येणे आवश्यक असते . कारण त्यातून प्रकट होणारी वाणी ही जात उलट मार्गाने अभ्यासता आली तर आई सरस्वती आपल्याला ईश्वरानाजीक घेवून जाते .

आपण ज्या वाणीने एकमेकांशी बोलतो त्याला वैखरी असे म्हणतात . हे वाणीचे प्रकट रूप आहे .
वैखरी वाणी तून बोलण्याआधी जीभे ची जी हालचाल होवून शब्द प्रकट होऊ लागतो त्याला मध्यमा वाणी असे म्हणतात .

मनातून एखादी गोष्ट जेव्हा सुचते आणी बोलण्यासाठी जिभेला आज्ञा देते ते वाणीचे स्वरूप म्हणजे पश्यंती वाणी होय .

ही वाणीची तीन रूपे पार करण्यासाठी नाम स्मरण प्रत्येक वाणीत विशिष्ट संख्ये पर्यंत जपावे लागते . ती संख्या आणी त्या त्याव्यक्तीसाठी योग्य ते नाम सद्गुरु देतात कारण ते "शाब्दे परे च निष्णात असतात" . यानंतर आपल्याला बुद्धीची एक विशिष्ट पातळी प्राप्त होते ज्याला ऋतंभरा प्रज्ञा असे म्हणतात .
म्हणजेच एखादा साधक मोठ्याने [ वैखरी ] नाम विशिष्ट संख्ये पर्यंत घेइल.
त्यानंतर जिभेला वळण लागले की तेच नाम तोंडातल्या तोंडात पुटपुटेल [ मध्यमा ] पण इथे वेग वाढलेला असतो .
फक्त मनात जप करणे म्हणजे [ पश्यंती ] वाणी मध्ये जप करणे .
यानंतर परा वाणी म्हणजे आपल्याला जे मनात सुचते त्याचे मूळ रूप . मनातले देवत्वाचे दार उघडायला या वाणीत म्हणजे मनातल्या मनात नाम घ्यावे लागत नाही तर आपले अंतरमन सतत नामच घेते . जसे झोपेतून उठणे, झोप लागणे , भूक लागणे इत्यादी कामे अंतर्मन सहज करत असते त्याप्रमाणे ते सहज आणि सतत नाम घेवू लागते . त्यानंतर देवत्व प्राप्त होते.

आता जर याहून जास्त प्रगती करावयाची असेल तर काय करणार ? भगवंताने त्याहीसाठी short cut दिलेले आहेत . त्यांना मंत्र म्हणतात . मंत्र हे भौतिक तसेच मानसिक लाभासाठी असतात . पण ते सिद्ध व्हायला विशिष्ट दिनचर्या पाळावी लागते जी साधकांना आवश्यक असते .

आपण वर पाहिले त्याप्रमाणे एका वाणीतून दुसर्या वाणीत प्रवेश करताना जे सामिष खाणारे असतात त्यांना खूप वेळ लागतो . त्यामुळे सर्व वारकरी माळकरी लोक सामिष [ nonveg ] खात नाहीत . कारण त्यामुळे आध्यात्मिक प्रगती उशिरा होते. तीच बाब मंत्रांची असते . योग्य उच्चार व्हायला आणि तोही पश्यंती आणी परा वाणीत - सामिष आहार अडथळे आणतो. याचे effects पिढ्यानुपिढ्या होतात . अध्यात्मिक साधकाने मंत्र, वेदोच्चारण करणे आवश्यक असते म्हणून सामिष (मांसाहारी पदार्थ )खायचे नसते .

सामिष खाणाऱ्यांचे गायत्री मन्त्राचेहि उच्चार चुकतात -द्वापार युगात तसेच कली युगात ब्राह्मणांच्या जिव्हेच्या शक्तीला मर्यादा आहेत . त्यामुळे ब्राह्मण या युगात मांसाशन करू शकत नाहीत असे सर्व ऋषींनी सांगितलेले आहे . [ संदर्भ : भागवत ]
-----------------------
शाकाहार करणार्याने रोज पंचामृत प्यावे म्हणजे B १२ ची कमतरता कधीही भासत नाही . तसेच वाटीभर मुग किंवा तूर ही अंड्या पेक्षा जास्त आणि सुपाच्य प्रथिने देते . त्यामुळे अंडी खाल्लीच पाहिजेत वगैरे प्रचार फारसा खरा नाही . [ डॉ बालाजी तांबे यांच्या मार्गदर्शनातून ]

आपला सगळ्या सर्वसामान्यपणे शाकाहारी आणि मांसाहारी यात चांगलाच गोंधळ उडालेला दिसतो. कृपया मी जे खाली लिहीत आहे ते ते लक्षात ठेवावे व त्याचा प्रसार करावा, ही विनंती .

[१] रस [ Glandular Secretions etc , ]
[2] रक्त [ Blood ]
[3] मेद [ Animal Fat ]
[4] मांस [ Muscles ]
[5] अस्थी [ Bones ]
[6] मज्जा [ Nerves, Bone Marrow ]
[7] शुक्र [ Reproductive and power Mgmt ]

हे ७ पैकी रस सोडून इतर एक जरी धातू जागृत किंवा सुप्त अवस्थेत असतात त्या सर्व वस्तू मांसाहारी .

वस्तू मध्ये फक्त रस असणे हे शाकाहारी.

साखर जर बोनअ‍ॅश वापरून तयार केली जात असेल तर ते योग्य नाही. भारतामध्ये अश्या प्रकारे साखर तयार करण्यावर बंदी आहे.

दुध पूर्णत: शाकाहारी आहे. हे वरील गोष्टीवरून लक्षात येईल.

संदर्भ- आचार्य मंदारशास्त्री संत ,पुणे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम माहिती . धन्यवाद महाराज...

शाकाहार करणार्याने रोज पंचामृत प्यावे म्हणजे B १२ ची कमतरता कधीही भासत नाही . तसेच वाटीभर मुग किंवा तूर ही अंड्या पेक्षा जास्त आणि सुपाच्य प्रथिने देते . त्यामुळे अंडी खाल्लीच पाहिजेत वगैरे प्रचार फारसा खरा नाही . >> याला काही शास्त्रीय पुरावा आहे का?

तसेच शाकाहारी व्यक्तीनी डाळीचा भरपूर वापर केल्यास आवश्यक ती प्रथिने मिळतात ,असे ऐकून आहे. ते खरे का?

रच्याकने - शाकाहारी व मांसाहारी यामध्ये शारीरिक आणि बौद्धिक सामर्थ्याच्या दॄष्टीने तुलना करता कोण अधिक बलवान ठरू शकेल ? यावर मार्गदर्शन करावे. मागे भारतीय मुष्टियोद्धे जे ऑलिंपिक मध्ये मेडल प्राप्त करते झाले, ते देखील पूर्ण शाकाहारी असल्याचे ऐकले होते . तसेच नुकत्याच सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया दौर्यात काही क्रिकेटपटूना शाकाहारी जेवण न मिळाल्याने त्यानी निषेध नोंदवल्याचे देखील वॄत्त आले होते . यावरून शाकाहारी मंडळी देखील सामर्थ्यवान असतात , असा निष्कर्ष निघू शकेल का? किंबहूना परिपूर्ण आहार कोणता ? यावर चर्चा करावी !

आदरणीय स्वामीजी,

मी स्वत: जरी मांसाहारी असलो तरी शाकाहारासंबंधी माझे मत अनुकूल आहे. मी प्रामुख्याने शाकाहारी असून कधीकधी मांसाहार करतो.

सांप्रत काळात म्हणजे कलियुगात देहवाचामन यांची शुद्धी पाळण्यासाठी तसेच अध्यात्मिक प्रगतीसाठी मांसाहार टाळणे वा सीमित करणे इष्ट आहे. पूर्वीच्या काळी तशी परिस्थिती नसावी असे वाटते. या निमित्ताने महाभारतातील एकदोन उल्लेख देईन म्हणतो.

१. वनपर्वातील दुसऱ्या अध्यायात फळे, मुळे व मांस यांचे ब्राह्मण सेवन करीत असल्याचे युधिष्ठिराने सूचित केले आहे.

brahman_maans_sevan.jpg

सेवन करणे म्हणजे खाणे नसूही शकते. कदाचित ब्राह्मणांना यज्ञाहुतीसाठी मांसाची गरज पडत असेल. मात्र तसा स्पष्ट उल्लेख नाही.

२. त्याच पर्वात पुढे तिसऱ्या अध्यायात युधिष्ठिराने सूर्याची आराधना करून त्याच्यापासून अक्षय्य थाळी मिळवल्याचा उल्लेख आहे. थाळी देतेवेळी सूर्याने जे पदार्थ अक्षय्यपणे शिजवता येतील त्यांत मांसाचाही उल्लेख केलेला आहे.

sooryathali_maans_paak.jpg

या दोन्ही उल्लेखांवरून ब्राह्मण मांस भक्षण करीत असावेसे दिसते. त्यावेळी द्वापारयुग असल्याने ब्राह्मणांचे मांसाशन वैध असावे. कलियुगात मात्र ते वर्ज्य आहे.

मात्र असे असले तरी त्यावेळीही तप करणारे तपी, मुनी हे कंदमुळांवर देहधारणा करीत. त्यांना मांसाशन अवैध होते. ब्राह्मण आणि तपी हे वेगवेगळे गणले जात.

आपला नम्र,
-गामा पैलवान

तळटीप :

वरील दोन्ही संदर्भांचा स्रोत इथे आहे : https://www.scribd.com/collections/3241910/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E...

पहिला संदर्भ पीडीएफ पान क्रमांक १७ तर दुसरा संदर्भ पीडीएफ पान क्रमांक ३१ वर आढळतो.

गामा पैलवान ,तुम्ही ब्राम्हण असुन मांसाहार करता मग तुमच्या मध्ये न मुस्लिम मध्ये काय फरक राहिला कशाला त्यांना नावे ठेवता ?

वीणा ताई,

>> गामा, इथे द्यायची काही गरज आहे का ? नाहक वादाला फोडणी.

ही माहिती द्वापारयुगातली आहे. ती कलियुगात लागू पडत नाही. त्यामुळे वाद निर्माण होऊ नये! Happy

आ.न.,
-गा.पै.

सुरेख,

>> गामा पैलवान ,तुम्ही ब्राम्हण असुन मांसाहार करता मग तुमच्या मध्ये न मुस्लिम मध्ये काय फरक राहिला
>> कशाला त्यांना नावे ठेवता ?

तुमचं म्हणणं कळलं नाही. ब्राह्मणाने मांसाहार केला तर तो मुस्लिमतुल्य कसा बनतो? आणि हो, मी ब्राह्मण आहे हे कोणी सांगितलं तुम्हाला?

आ.न.,
-गा.पै.

खूप छान माहिती.

पण काही शंका आहेत.

रोज पंचामृत पिऊ नये फक्त पुजाविधी घरात असेल तरच पंचामृत करावे हे खरे आहे का? पंचामृतामधे दुध दही असते त्यामुळे त्यात बी जीवनसत्त नक्की आहे. मधामधे प्रोटीन्स असतात.

आमची रिसेप्शनिस्ट रोज रात्री फक्त अर्धा लिटर दूध व दोन चार केळी खाते . अगदे स्लिम व हेल्दी आहे.

मीही मालदिवात असताना रोज रात्री फक्त शेवयाची खीर अर्धा लि. खायचो. अगदी मस्त हेल्दी होतो.

रॉज रात्री वाट्या दोन वाट्या पंचामृत खाल्ले ( नुसते , इतर जेवण नाही. ) तर चालेल का ?

दूध केळी तर खायचेच आहे. तीन पदार्थ जास्त.

पंचामृतात साखर घालतात ना ?

काउ,

तमिळ लोक पंचामृतात साखरेएवजी केळं घालतात. पण, महाराष्ट्रात साखर घालतात. इतकेच काय तमिळ लोकांमधे देखील ही नवीन प्रथा सुरु झाली आहे साखरे एवजी केळी घालण्याची. पारंपरिक पंचामृतात साखरच घातली जते. प्रश्न पउठतो, जुन्या प्राचीन काळात साखर होती का?

तुम्ही संस्कृत भाषेत लिहिणारे हा विचार करत नाही की हे लिहून किती लोकांना आपण लिहिले कळते Happy कंसात अर्थ नाही का लिहायचा!

हं

इक्षुदंड समुद्भुतम् = ऊसापासुन तयार झालेली
दिव्य शर्करया हरीम् = अशी दिव्य शर्करा म्हणजे साखर
यापुढे पण एक ओळ आहे त्याचा अर्थ आहे की अशी साखर मी हरीला अर्पण करत आहे.

काउ महाराज प्रतिसादात आधी एक अक्षर विसरलात को किंवा सो
बघा कोणते योग्य आहे ? Wink

>>दुध पूर्णत: शाकाहारी आहे. हे वरील गोष्टीवरून लक्षात येईल.
दुधामधे मेद (अ‍ॅनिमल फॅट) असतात ना ? मग दुध शाकाहारी कसे ?

मी हरीला केक अर्पण करत आहे असेही संस्कृतात लिहिता येईल की.. त्यावरुन तेंव्हा केक होता हे सिद्ध होते का ?

असो. साखर ऐच्चिक ठेवता येईल. चव व चार दोन क्यालरी इतकेच तिचे महत्व आहे

कृपया ब्राह्मण हा शब्द असा लिहावा म्हशीतला म्ह वापरून ब्राम्हण असा नव्हे. बाकी चालुद्या.

लेख रोचक दिसतो. सवडीने वाचेन.

.:)

माझे एक निरिक्षण आहे बर्‍याचदा डुप्लिकेट आयडी अशुद्ध लिहितात. किबंहुना इथे येताना त्यांची लिहिण्याची ती एक शैलीच असते. सर्वात सोप्पी शैली.

सुरेखजी, हे तुम्हाला उद्देशून नाही आहे. गैरसमज नको.

गामा, पहिल्या संदर्भातील "द्विज" व "ब्राह्मण" हे दोनही शब्द मला गोंधळात टाकत आहेत.
तुम्हीच सुचविल्याप्रमाणे, मांस यज्ञाहुतीकरताच असू शकते.
दुसर्‍या संदर्भातील कुंतीपुत्र वा पांडव हे "ब्राह्मण" नसून "क्षत्रीय" होते असे आठवत असल्याने ते देखिल गोंधळात पाडते आहे.
सबब खुलासा करावा ही विनंती.

इथे ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा वाद करण्यापेक्षा सगळ्यांनीच शाकाहाराचा अवलंब करणं चांगला नाही का ? अहिंसा अध्यात्मिक प्रगतीमध्ये फार मोठी मदत करते . बोकडाला , कोंबडीला माणसापेक्षा कमी वेदना होतात का कापताना ?
दुसरी गोष्ट म्हणजे वरती गा. मा ने जो मांसाचा उल्लेख केलाय त्यावरून ब्राह्मण मांस खात होते हे सिद्ध होत नाही . सूर्याने दिलेल्या थाळीतून मांस मिळत असले तरी ते दुसर्या कोणाला तरी देण्यासाठी असेल .
दत्त महात्म्य मध्ये विष्णू शर्मा ब्राह्मणाची गोष्ट आहे . तो स्वतः मांस खात नवता पण पिम्पालावारच्या त्या ब्रह्म राक्षसाला मात्र मांसाचा बळी देत होता . त्या बळीने तृप्त होवून राक्षसाने त्याला प्रभू दत्तात्र्येयाचं दर्शन घडवलं आणि पुढे बराच काही झालं असं लिहिलंय .

हे ७ पैकी रस सोडून इतर एक जरी धातू जागृत किंवा सुप्त अवस्थेत असतात त्या सर्व वस्तू मांसाहारी .>>
ह्याचा अर्थ मात्र कळला नाही .

>>हे ७ पैकी रस सोडून इतर एक जरी धातू जागृत किंवा सुप्त अवस्थेत असतात त्या सर्व वस्तू मांसाहारी .>>
आजवर ऐकलेल्या व्याख्यांमधे ही सर्वात भारी आणि निर्णायक व्याख्या दिसत आहे. Happy

Pages