हाकालपट्टी,...
कुणा-कुणाकडून काही गोष्टी
स्वत:पासुनच भटकू शकतात
कुणा-कुणाच्या काही गोष्टी
कुणा-कुणाला खटकू शकतात
मात्र भटकणारे अाणि खटकणारे
कधी गट्टीत,कधी कट्टीत असतात
अन् आपले वाटणारेही वेळेप्रसंगी
कधी-कधी हाकालपट्टीत असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
स्वभावी बाणे,..
मवाळवादी बाणा कधी
जहालपणे वागुन बघतो
तर कधी जहालपणाही
मवाळतेला भोगुन बघतो
जहाल आणि मवालसुध्दा
एकमेकांत ओघळू शकतात
जशी वेळ येईल तस-तसे
स्वभावी बाणे बदलु शकतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
पाठिंब्याच्या आशा,...
पाठिंबा देण्या-घेण्यासाठी
मना-मनामधुन गळ असतो
पाठिंब्यात मिळालेला आधार
जणू उम्मेदिचं बळ असतो
कधी इतिहासाच्या पाऊलखुणा
वर्तमानात पहूडलेल्या असतात
अन् पाठिंब्याच्या आशा मात्र
मना-मनात दडलेल्या असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
व्यक्तीची योग्यता,...
प्रत्येक-प्रत्येक व्यक्तीची
इथे योग्यता पाहिली जाते
योग्य व्यक्तींची अप्रत्यक्षही
कधी गाथा गायली जाते
विचार आणि कार्यावरून
व्यक्तीची योग्यता कळून जाते
अन् त्यांची यशस्वीता सुध्दा
जणू त्यांच्यासाठी चालुन येते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सन्मान,...
चांगले काम करण्याच्या
प्रत्येकाला संधी असतात
अन् प्रत्येकाच्या कार्याच्या
इथे सर्व नोंदी असतात
त्यांच्या सत्कार्याचा भाग
देशाचीही शान होतो
अन् प्रत्येकाच्या सत्कार्याचा
सन्मानानं सन्मान होतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
गेले चार महिने ऑस्ट्रेलियन संघासमोर जे भारताला जमलं नव्हतं, ते शेवटपर्यंत जमलंच नाही. सगळं स्टेडीयम निळ्या रंगात न्हाऊन निघालं, पण तरी विजयाचा रंग बदलला नाही. स्टेडीयमचा, लोकांचा रंग मैदानावर ओघळला नाही तरी अखेरीस सिडनी सिडनीच राहिलं, अहमदाबाद झालं नाही. भारतासाठी एक स्वप्नवत स्पर्धा, एका बोचऱ्या वास्तवाची जाणीव करून देऊन संपली.
भारत उपांत्य सामना हरला ह्याचं दु:ख राहिल, ऑस्ट्रेलियाशी हरला ह्याचंही दु:ख राहिल, पण ह्याहून जास्त दु:ख ह्याचं राहिल की न झुंजता हरला.
कटू सत्य
भारतीयांच्या पराभवानं
कुणी अश्रु ढाळतो आहे
तर खेळाडूंना दोष देत
कुणी शाब्दिक छळतो आहे
मात्र हार असो की जीत
संयमानं रूचवावं लागतं
अन् विजयाच्या आनंदापरी
हरल्याचं दु:खही पचवावं लागतं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
हार-जीत,...
जिंकण्याची आशा जरीही
मना-मनात हेरलेली असते
मात्र कुणाचीही हार-जीत
खेळामध्ये ठरलेली नसते
कधी न जिंकणाराची काया
कधी बदलली जाऊ शकते
तर जिंकणाराचीही खेळामध्ये
अवचकलीनं हार होऊ शकते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
हार-जीत,...
जिंकण्याची आशा जरीही
मना-मनात हेरलेली असते
मात्र कुणाचीही हार-जीत
खेळामध्ये ठरलेली नसते
कधी न जिंकणाराची काया
कधी बदलली जाऊ शकते
तर जिंकणाराचीही खेळामध्ये
अवचकलीनं हार होऊ शकते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
शेवटी आपण विश्वचषक परत देऊन टाकला. बाद फेरीत अजिंक्य राहिलेला आपला संघ उपउपांत्य सामन्यात तुलनेने फारच कच्च्या असलेल्या बांग्लादेशला हरवून विजेता ठरता. उपांत्य सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियासमोर आपल्या अनेक मर्यादा स्पष्ट झाल्या.
१. जडेजाचे योगदान - मोठे प्रश्नचिन्ह
२. युवराजचे नसणे - एक कमजोरी
३. रोहित शर्माचे योगदान - अपेक्षेप्रमाणे नाही
४. दबावामध्ये खेळणे - आपल्या पूर्ण संघाचेच कमी पडणे
५. ऑस्ट्रेलियाशी सामना करताना - एकुण ढेपाळणे
६. शेवटच्या दहा षटकात आपण प्रचंड धावा देणे