२४ मार्च २०१५ चा दिवस ऑकलंडमध्ये नेहमीसारखा उगवला. पण नेहमीसारखा मावळला नाही. सूर्य मावळला खरा, पण कुठून तरी किलकिल्या डोळ्यांनी तोसुद्धा चोरून इडन पार्कवर नजर टिकवून राहिला असावा. एकदिवसीय क्रिकेटच्या अंबरात नेहमीच दिमाखात तळपणारे पण दर चार वर्षांनी विश्वचषकाच्या पश्चिम क्षितिजावर मावळून जीवाला हुरहूर लावणारे, कातर करणारे दोन प्रति-सूर्य आज त्या मैदानावर एकमेकांसमोर आमने सामने उभे राहिले होते. हे ठरवायला की आज कोण मावळणार ? तुंबळ लढत झाली आणि अखेरीस एकाने मान टाकली. चोरून बघणारा सूर्य एका डोळ्यांत आनंदाचे आणि दुसऱ्या डोळ्यांत दु:खाचे अश्रू घेऊन निघून गेला.
दक्षिण आफ्रिकेचे अश्रू पाहून रडू आले. खरे तर उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात क्रिकेट जिंकले असे म्हणावे लागेल. पाऊस पडला तरीही सामना खेळला गेला. भरभरून क्रिकेटचा आनंद लुटला गेला. पारडे प्रत्येक चेंडूला वरखाली होत राहिले. शेवटच्या चेंडूपर्यंत निकाल काय लागेल ह्या उत्सुकतेने रोमांच आले. आफ्रिकेने दबावाखाली येऊन दोन महत्वाचे झेल सोडले आणि एक धावबादची संधीही! ह्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड व्यतिरिक्त जवळपास सगळेच क्रिकेटरसिक मन गुंतवून बसलेले होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानने फलंदाजांनी पत्करलेल्या शरणागतीमुळे पराभव पत्करला. सर्व बाद पाकिस्तान झाला आणि ऑस्ट्रेलियाचे फक्त चारच गाडी बाद झाले पण सामना गाजला पाकिस्तानच्या वहाब रियाझच्या गोलंदाजीमुळे. त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना खास करून शेन वॉटसनला ज्याप्रकारे नाचवलं ते पाहून त्यांचं 'कांगारू' नाव सार्थ वाटावं. वॉटसनला आणि त्याच्या बॅटला वहाबचे अनेक चेंडू अगदी जवळून वारा घालून गेले. काहींनी तर त्याचं हेल्मेटच्या आतलं डोकंही हलवलं. सुदैव आणि पाकच्या राहत अलीच्या मदतीच्या जोरावर वॉटसन टिकला आणि कांगारूंना विजय मिळवता आला.
साखळी फेरीतील शेवटचा झिंबाब्वेविरुद्धचा सामना म्हणजे मॉकटेलच्या ग्लासाच्या कडेवर लावलेल्या लिंबू/ संत्र/ मोसंबीच्या चकतीसारखा निरर्थक होता. कुठल्याही निकालाने कुणालाही कसलाही फरक पडणार नव्हता. पण खादाड आणि महाकंजूष धोनीला ती चकतीसुद्धा चोखून खायची होती. त्यामुळे त्याने संघात कुठलाही बदल केला नाही. आत्तापर्यंत बेंचवर बसून राहिलेल्या भुवनेश्वर, बिन्नी आणि अक्षर पटेलच्या जागा 'थ्री इडीयट्स'च्या पोस्टरवरच्या आमिर, माधवन आणि शर्मनच्या जागांसारख्या झाल्या असल्यास नवल वाटू नये.

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
सदतिसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कोहलीने केव्हिन ओ'ब्रायनचा चेंडू सीमापार टोलवला आणि आयर्लंडविरुद्धचा सामना भारताने जिंकला. हा जो विजयी फटका होता, तो फटका संपूर्ण सामन्याचं सार सांगत होता. त्या षटकातील सगळे चेंडू ओ'ब्रायन ऑफ स्टंपबाहेर टाकले. फक्त सहा धावा विजयासाठी हव्या होत्या, पण ह्या सहा धावा सहजासहजी द्यायच्या नव्हत्या म्हणून. पण कोहलीने काय केलं ?
'वाका'वरील कालच्या सामन्याची नाणेफेक धोनी हरला आणि विंडीजचा कोवळा कर्णधार जेसन होल्डर मनातल्या मनात सुखावला कारण त्याला पहिली फलंदाजी करता येणार होती. ('विंडीजचा कोवळा कर्णधार' हे कदाचित उकळती बियर किंवा 'समाधानी नारायण राणे' सारखं असंबद्ध वाटू शकेल. पण मला खरोखर तो कोवळाच वाटतो. फक्त २३ वर्षे वय. केवळ ३० सामन्यांचा अनुभव. त्याच्या चेहऱ्यात एक प्रकारचा निरागस भाव दिसतो. त्यामुळे त्याच्यावर गेल, सॅम्युअल्स, स्मिथसारख्या धटिंगणांची जबाबदारी असणं म्हणजे अजूनही तीन आणि सहा लिहिताना गोंधळणाऱ्या लहानग्या बालकाला सत्तावीसचा पाढा विचारल्यासारखं वाटतं.