लहानपणापासून मला प्रश्न पडायचा की बीसीसीआय या क्रिकेटच्या मंडळाचा अध्यक्ष एखादा क्रिकेटपटू का होत नाही ?
आज उत्तर मिळाले.
त्यासाठी खेळाडू दादा असावा लागतो !
सेहवाग म्हणतो देर है पर अंधेर नही
सचिन म्हणतो दादाने जी भारतीय क्रिकेटची सेवा केलीय त्याला तोड नाही.
तोच ती ईथेही करणार.
लक्ष्मण म्हणतो दादा तू आम्हाला जिंकायला शिकवलेस तुझ्यापेक्षा योग्य व्यक्ती आणखी कोण..
आजी माझी सर्वच खेळाडूंना आनंद झाला आहे.
ते दिवस अनेकांना आठवत असतील. भारताच्या संघाचा बकरा करण्याच्या ठराविक पद्धती होत्या - परदेशातील विकेट्स, स्पीड, स्विंग, बाउन्स, स्लेजिंग, माइंड गेम्स. विशेषतः परदेशातील दौर्यांमध्ये, पण कधीकधी भारतातही. कधी नुसत्या वेगावर, कधी बाउन्सर्सनी जखमी करून, तर अनेकदा पत्रकार, जुने खेळाडू यांच्यापासून ते संघाचे मॅनेजर, कोच यांच्यापर्यंत अनेकांनी संघाला कमी लेखणारी विधाने करून खेळलेल्या माइंड गेम्स.
विश्वकप आता 'करो या मरो' फेरीत येऊ ठेपला आहे. अपेक्षेप्रमाणे बाद फेरीचे चारही संघ निश्चित झाले आहेत.
अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला पुन्हा एकदा ईंग्लंडशी लॉर्ड्स मैदानावर होण्याची बरीच शक्यता आहे.
साखळी फेरीतल्या आपल्या संघाच्या सगळ्या डिपार्टमेंटमधल्या कामगिरीवरून आणि खासकरून ईंग्लंड विरूद्धच्या पराभवावरून धडा घ्यायचा झाल्यास आगामी सामन्यासाठी भारतासमोर नक्कीच बरीच आव्हाने ऊभी आहेत. त्यातल्या काहींचा ऊहापोह मी ईथे करू ईच्छितो.
आमची क्रिकेट पाहायला सुरुवात 1993 मधली... याच वर्षी भारताने वेस्ट इंडिजला हीरो कप च्या अंतिम सामन्यात हरवलं होतं. त्यानंतर थेट 1996 च्या विश्वचषकात क्रिकेटची आणि आमची गाठ पडली. हा विश्वचषक आहे तसा आठवणीतलाच. श्रीलंकेचा क्रिकेटमधली एक नवी शक्ती म्हणून याच वर्षी उगम झाला. शिवाय केनियाची एन्ट्री ह्याच विश्वचषकातली. उपांत्य सामन्यामध्ये श्रीलंकेकडून झालेली आपली हार कायम लक्षात राहील अशीच होती. भारतीय क्रिकेट विश्वामध्ये सचिन तेंडुलकर नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झालेली होती आणि या विश्वचषकाच्या पराभवानंतर खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेट संघ बांधायला सुरुवात झाली.
आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे.
.... अखेर विराट कोहलीच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवून टेस्ट सिरीज जिंकली.
या सिरीजपूर्वी १९४७ - ४८ सालच्या पहिल्या ऑस्ट्रेलियन टूरपासून तब्बल ११ वेळा भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात टेस्ट सिरीज खेळली. यापैकी १९८० - ८१, १९८५ - ८६ आणि २००३ - ०४ या तीन सिरीज ड्रॉ झाल्या तर ८ वेळा भारताच्या नशिबी पराभव आला. या वेळेस मात्र अखेर आपण ऑस्ट्रेलियाला नमवले.
ए सेंच्युरी इज नॉट इनफ

मुलगी वय 5
आई - अनोळखी लोकांशी बोलू नकोस.
मुलगी वय 15
आई - अनोळखी लोकांशी बोलू नकोस.
मुलगी वय 18 - आई मला हा फोन हवाय.
आई - नुसता फोटो बघून तू फोन ऑर्डर करणार? काय guarantee चांगला असेल??नुसता फोटो आवडला म्हणजे चांगला का??
मुलगी वय 21-
आई - तुझ्यासाठी हा मुलगा फायनल केला आहे. खूप चांगला आहे. हा बघ त्याचा फोटो. खुश ठेवेल तुला.
मुलगी ( मनातल्या मनात) - अनोळखी लोकांशी बोलू नये, पण अनोळखी माणसाशी लग्न करा, शय्या सोबत करा, मुले जन्माला घाला???)
हिपोक्रसी 3 !!!!!!