से ह वा ग!
वीरेंदर सेहवाग! खराखुरा वीरोत्तम! क्रिकेटशी परिचित असलेल्यांना सेहवागबद्दल काहीही सांगायची गरज नाही. पण इथे सेहवाग एक क्रिकेटर म्हणून नव्हे तर एक अभिव्यक्ती म्हणून विचार करूया. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून त्रिशतक करणारा एकमेव फलंदाज (तेही दोन त्रिशतके!); अत्यंत जलद गतीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी करणारा आणि आश्चर्यकारक प्रकारे सातत्य दाखवणारा (२००९- १० मध्ये शिखरावर असताना ५४ ही कसोटी सरासरी सलामीवीर म्हणून) आणि सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गांगुली, लक्ष्मण अशा ता-यांच्या समोरही स्वत:चा वेगळा प्रभाव निर्माण करणारा असा हा वीरू!