२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा सामना
भारत वि. न्यूझीलंड
मंगळवार १५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता

<< ऑस्ट्रेलिया जिंकणार..>> जिंको बापडी, पहिली मॅच तरी न्युझीलंड विरुद्ध ! आपण काय बोलणार, गट क्र. २ मधे आहे ना ऑस्ट्रेलिया !! Wink

बरोबरीनेच महिलांचा पण टी२० विश्वचषक सुरु झाला आहे.. आणि त्यातली पहिली मॅच भारत विरुद्ध बांगलादेश आहे...

ऑस्ट्रेलिया फेव्हरिट्स आहेत. पण सध्या भारतीय महिलांचा खेळ बघता त्या डार्क हॉर्स आहे ह्या स्पर्धेत..

महिलांनी भारतीय महिलांतर्फे टी-२० मधला आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त स्कोर करुन मॅच जिंकलेली आहे...

आणि मेन मॅचला सुरुवात झालेली आहे. पण अश्विनला पहिल्याच ओव्हर मध्ये धुतला आहे.. आणि मग न्यूझीलंडच्या दोन विकेट्स पण पडल्या आहेत..

१२ ला ३ .. जय हरी विठ्ठल.. आता पुन्हा सारी मदार कोहलीवर !
रनरेट वाढला तरी चालेल. मागे पांड्या धोनी आहेत. पण ते मागेच आले तर अर्थ आहे.. आताच नका आणू त्यांना

बरं झाल .. जिमिनीवर येतील.. आणि फिरकीला मदत करणार्या खेळपट्ट्या बनवणे आपण सोडायला हवे.. आपलेच फलंदाज गंडतात त्याला.. जिथे बॉल बॅटवर व्यवस्थित येतो तिथले शेर आहोत आपण.. पाटा बनवा

धोनि तसंही काही करत नाही. आज नाबाद राहण्यापुरता खेळणार.
>>>
बॉल कसला वळत होता पाहिले का.. त्याच्या ३० चेंडूत ३० धावा सुद्धा मोल राखून आहेत. कमी मार्जिनने हरलो तेवढेच. पुढे रनरेट बघायची वेळ आली की कामात येईल हेच. २०-२० मध्ये ३० धावा म्हणजे दिडचा नेट रनरेट डिफरन्स होतो. आता जे मायनस २.३५ आहे ते मायनस ३.८५ झाले असते.

किवी स्पिनर्स भारतात आपल्याविरूद्ध खतर्नाक? 'वेक अप कॉल' असेल हा. पुढच्या मॅच पासून जागे होतील सगळे.

बांग्लादेश आणि पाकिस्तानला आपण हरवूच. ऑस्ट्रेलियालाही हरवावे लागणार आता. मग सेमी आणि फायनल .. सलग ५ सामने जिंकलो तर च विश्व चषक आपला

Pages