नंद्या यांचे रंगीबेरंगी पान

सचिनीझम

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

सचिनने नुकतीच एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती जाहिर केली. क्रिकेटचा एक अनभिषिक्त सम्राट आता आपल्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये परत दिसणार नाही. त्याच्या खेळाने, वागण्याने जो आनंद त्याने वाटला आहे तो फार फार अमूल्य ठेवा आहे. एक दिवसीय सामन्यांमधल्या माझ्या आठवणीत राहिलेल्या या काही खेळ्या.

१. शारजा स्टॉर्म : भारताला अंतिम फेरीत पोचवायला आणि अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेले शतक.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

तुला पाहिले मी...

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

ग्रेसच्या ओळींवर लिहीले गेलेले अजून काही, त्यालाच अर्पण ...
........................

बाबांचं नुकतंच मोतीबिंदूचं ऑपरेशन पार पडलं होतं. हॉस्पिटलमध्ये एक दिवस रहावं लागलं होतं. मी आणि बहीण दोघेही परदेशात होतो. त्यामुळे आईबाबांना ते दोन्ही बघावं लागलं होतं, याचा सल मनात होताच. अंतरांचे अवगुण अगदी प्रकर्षाने अंगावर आले. त्यातच बाबांनी हॉस्पिटलमधून घरी येताना चालत यायचा पराक्रम केला. कुठलाही रिक्षेवाला सोडायला तयार नव्हता म्हणून. मग तर तो सल अगदी चक्रवाढ पद्धतीने द.ता.द.से. वाढत होता.

प्रकार: 
शब्दखुणा: 

गणगोत ..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

ग्रेसच्या कविता ही अनुभवायची गोष्ट. आज असाच एक अनुभव समोर मांडतो आहे.
'झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया' ग्रेस म्हणतो ते काही खोटे नाही.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मनाला भावलेले काही.

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

सध्या नाचाचे, गाण्याचे अनेक रीअ‍ॅलिटी शोज सुरू झालेले आहेत. लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंतचे.
त्यातच अंदाज घुसवून 'आप गायकही नही , महाग्आयक हो' म्हणायला महाअंतिम फेर्‍या असतात. पण अशांमध्ये काही काही गाणी, नाच अगदी आवडून जातात. मला आवडलेले असेच काही.

काळ देहासि आला खाउ हे प्रथमेशने गायलेले गाणे. सुरूवातीची निलेशची ढोलकी वाजवतानाची दाद, तो अभंग, ताना आणि लय, आणि हृदयनाथांनी "आभारी आहे मी तुमचा. आनंद दिलात तुम्ही मला" असं म्ह्टल्यावर, भरून आलेले डोळे आणि आपोआप जोडलेले हात. चांगलेच लक्षात आहेत.

प्रकार: 

प्रसंगावधान

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

अँजेलो मॅथ्यूज आणि जयवर्धने यांच्या संयुक्त विद्यमाने/उद्यमाने वॉर्नर आउट झाला.
केवढे ते प्रसंगावधान! स्वत:च बघा

या आधीचे अशाच स्वरूपाचे काही झेल.

ICL ,

अँड्रू बिशेल ,

हरभजन ,

Doug Bollinger,

सचिन १ ,

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

वेग

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

समोरून निघालेली प्रकाशाची एक प्रदीर्घ शलाका त्याच्या अंतराळ पोशाखाच्या सुरक्षा काचेवर आदळली. काचेचे अनेक लंबगोलाकृती तुकडे तिच्या वाटेतून बाजूला झाले, शलाकेमधली काही किरणे त्यावर पडून परावर्ती किरणांनी ते लखलखले. ती लखलख ईतकी प्रखर होती की दोन क्षण त्याला कळलेच नाही, पण रिफ्लेक्स अ‍ॅक्शनने त्याने उजवा हात वेगाने डोळ्यापुढे नेण्यासाठी उचलला.

**

प्रकार: 

सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

२४ एप्रिल - तेंडल्याचा वाढदिवस

त्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - नंद्या यांचे रंगीबेरंगी पान