लोकमान्य

द्वादशैतानि नामानि

Submitted by अनन्त्_यात्री on 8 September, 2017 - 01:57

अगा वक्रतुण्डा, ध्यान जरा द्यावे
भक्त्तांसी करावे, थोडे सूज्ञ II १ II

अगा एकदंता, ध्वनी प्रदूषण
वाढविती जन, ऐकवेना II २ II

कृष्ण-पिंग-अक्षा, ऊर्जेची नासाडी
करिती आवडी, अज्ञ जन II ३ II

अगा गजवक्त्रा, बाजारू संगीत
पिडे दिनरात, धाव आता II ४ II

अगा लंबोदरा, वर्गणीची सक्ती
जुलूमाची भक्ती, थांबवावी II ५ II

अगा हे विकटा, साथ नवसाची
करी जनतेची, बुद्धी भ्रष्ट II ६ II

विघ्नराजेंद्रा रे, जल आणि वात
दोन्ही प्रदूषित, कैसे झाले II ७ II

अगा धूम्रवर्णा, पर्यावरणाची
जाणीव भक्तांची, वाढवावी II ८ II

शब्दखुणा: 

चित्रपटात न मावलेले लोकमान्य - (Movie Review - Lokmanya Ek Yugpurush)

Submitted by रसप on 6 January, 2015 - 02:39

चहा हा 'चहा' समजूनच प्यायला पाहिजे. जर कुणी म्हटलं की, 'साखरेचा पाक समजुन पी' किंवा 'काढा समजुन पी' तर कसं चालेल ? 'सूप' म्हणून 'बाउल'मध्ये काही तरी आणून द्यायचं आणि म्हणायचं की, 'कोशिंबीर समजुन खा' तर कसं चालेल ? तसंच, एक शौकीन माणूस चित्रपट हा 'चित्रपट' म्हणूनच पाहतो. 'हा चरित्रपट आहे, ह्याला वेगळ्या नजरेने पहा.. ह्याचं बजेट कमी आहे, ह्याला सहानुभूतीने पहा..' वगैरे गोष्टी मनावर दगड ठेवायला लावतात, दुसरं काही नाही. कुठे तरी आत काही तरी अतृप्त राहतंच, अपूर्ण राहतंच. वेगळ्या नजरेने, सहानुभूतीने पाहूनही मग प्रतिक्रिया सावधच असते. 'कसा होता?' विचारलं की 'बरा होता... ठीकच होता... वाईट नाही..

विषय: 
शब्दखुणा: 

लोकमान्य - एक युगपुरुष

Submitted by कोकणस्थ on 4 January, 2015 - 07:31

लोकमान्य बाळगंगाधर टिळक. काही भारतीयांची नावे घेतली की माझे मस्तक आपोआप आदराने झुकते, त्यातलं हे महत्त्वाचं नाव. लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.

Lokmanya Profile.jpg
विषय: 

मी वाचलेले पुस्तक : दुर्दम्य : लोकमान्य टिळकान्चा जीवनपट ( लेखक गन्गाधर गाडगीळ )

Submitted by पशुपत on 16 October, 2013 - 00:35

एका धाडसी आणी कणखर व्यक्तीमत्वाचे प्रखर बुध्धी , देशप्रेम , मित्रप्रेम , समाजप्रेम , साहस , निर्धार असे विविध पैलू दखवणारी कदम्बरी. खरे तर ही परीपूर्ण "पटकथा" आहे. प्रसन्गान्ची उत्तम निवड आणी बारकाव्यान्सहित वर्णन यामुळे नाट्यमयता अखेर पर्यन्त टिकून राहते.
टिळकान्च्या व्यक्तीमत्वाची छाप दीर्घकाळ मनावर रहाते.

विषय: 

'लोकमान्य' सचिन तेंडुलकर

Submitted by आशयगुणे on 25 December, 2012 - 06:41

ह्या देशाने शेवटी एक कडू बातमी पचवलीच! ही बातमी बऱ्याच लोकांना निरनिराळ्या अर्थाने कडू आहे! कुणाला 'तो' ह्या विषयावर बोलता येणार नाही म्हणून तर कुणाला 'त्याच्या 'वर कीस काढता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'तो' खेळला की आपण हरतो हे ठासवता येणार नाही तर कुणाला 'तो' अंतिम सामन्यात खेळतच नाही हा तर्क लावता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'आता कुणाच्या श्रीमंती वर बोलावे' म्हणून तर कुणाला ' त्याच्याकडे इतका पैसा आहे ना .. की पुढच्या अमुक इतक्या पिढ्या ऐत्या बसून खातील' असं आता कुणाबद्दल बोलावे म्हणून कडू!

मंडालेचा राजबंदी-१

Submitted by अमितसांगली on 22 June, 2012 - 23:56

नुकतेच अरविंद गोखले यांचे 'मंडालेचा राजबंदी ' हे लोकमान्य टिळक यांच्यावरील राजद्रोहाच्या तिन्ही खटल्यांची माहिती देणारे पुस्तक वाचनात आले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - लोकमान्य