ता. २७ फेब्रुवारी २०११, स्थळ चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु ! मला वाटते भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशातील क्रिकेटचे चाहते हा दिवस कधीही विसरणार नाहीत. कालच्या दिवशी साहेबांनी पुन्हा एक नवीन विक्रम नोंदवला. साहेबांचे विश्व चषक स्पर्धेतले पाचवे शतक ! या शतकानेसह आपल्या लाडक्या तेंडल्याने विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटपटू या नव्या विक्रमाची नोंद केली . त्याच्या नावावर जमा झालीत पाच शतकं. वनडेमधील हे साहेबांचं ४७वं शतक.
गेली दहा वर्षे अनेक वेळेस दिसलेले चित्र: ऑसीज नी लावलेली टाईट फिल्डींग, च्युईंग गम चघळत मैदानावरचे आणि बाहेरचे सगळे डावपेच कोळून प्यालेला कप्तान आणि दुसर्या टीम ला कोणत्याही परिस्थितीत हरवायचे या एकाच विचाराने खेळणारा "बॅगी ग्रीन" घातलेला आक्रमक संघ. बॅट्समन च्या सर्व त्रुटी हेरून त्याप्रमाणे बोलिंग चालू असते. एकापाठोपाठ एक बॅट्समन परततात. ऑस्ट्रेलियाला विजय समोर दिसू लागतो. "आता फक्त समोरचे दोन उडवले की मग शेपूट..." वगैरे विचार त्यांच्या डोक्यात चालू असताना त्या दोघांपैकी एकाला एकदम आपली कला सादर करायची हुक्की येते. आणि मग चौफेर फटकेबाजी चालू होते.
एक नवा विक्रम होतोय.
कारण, मास्टरब्लास्टर 'ट्विटर'वर आलाय.
यंदाचा आयसीसी टि२० विश्वचषक वेस्ट इंडिज मध्ये ३० एप्रिल ते १६ मे दरम्यान खेळला जाणार आहे.
भारतासोबत क ग्रूप मध्ये अफगाणीस्थान व साउथ अफ्रिका हे देश आहेत.
टीम मध्ये दुखापतीमुळे सेहवाग नसणार अशी बातमी वाचली. त्याऐवजी मुरली विजय खेळत आहे.
वर्ल्डकप विषयीचे मत व त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
आजपासून तिसर्या IPL स्पर्धेला सुरूवात होतेय. पुढले ६ आठवडे आता रोज २०/२० सामने. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
यंदा सर्वाना (USA वगळ्ता
) हे सामने युट्युबवर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवैध दुवे शोधत बसायची गरज नाही 
इथे पहा http://www.youtube.com/ipl
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे क्रिकइन्फो च्या एका सदरात प्रत्येक तारखेला आधीच्या काही वर्षात काय झाले याची अत्यंत वाचनीय माहिती येते - त्यात या सिरीज बद्दल वाचले आणि क्रिकेट (टीव्हीवर दाखवू लागले आणि) पाहू लागलो तेव्हा अगदी सुरूवातीला पाहिलेल्या या सिरीज बद्दल च्या बर्याच गोष्टी आठवल्या.
१९८३ च्या वर्ल्ड कप मधे भारताकडून वेस्ट इंडिज चा संघ हरला. लॉईड ने राजीनामा दिला होता, पण तो बहुधा स्वीकारला गेला नाही. हा संघ एकूणच प्रचंड डिवचला गेला होता. त्यात चार महिन्यांनतर त्यांचा भारत दौरा आला...