प्रिय सचिन देवा.....................

Submitted by Mandar Katre on 14 December, 2012 - 07:29

देवा तुला शोधू कुठं ....................
नाही टिकत तू क्रीज वर ..............
नाही चुकवत तू योर्कर.................
नाही चालत बॅट तुझी आता............
निराश होती भक्त!
देवा तुला शोधू कुठं?
pavilian मध्ये तू सदाच दिसतोस
फार कमी क्रीज वर टिकतोस
क्रिकेट सोडून जाहिरातीत दिसतोस जास्त
परम देवभक्त ही झाला निस्तब्ध ...............
देवा तुला शोधू कुठं................................?
व्हावे रिटायर आता तरी देवा
सकल भक्तजन करीती धावा
होत नाहीत पूर्वीसारख्या धावा
थकलास आता तू चालली थकत ही बॅट.......
देवा तुला शोधू कुठं?

tendulkar-out.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृपया शिर्षका शेजारी असे स्पष्ट लिहावे

(हे विनोदी लेखन आहे हसल्यास १०० रुपये बक्षीस मिळेल)

किमान १०० रुपयासाठी तरी हसतील लोक

खरतर हि कविता चालू घडामोडी मध्ये पाहिजे. सचिनची अवस्था हि नख गेलेल्या नि दात पडलेल्या वाघासारखी झालीय.त्याचे वर्णन कवितेत मस्त जमून आलेय . ह्या ओळी त्याची सध्याची अवस्था बरोबर वर्णन करतात.

नाही टिकत तू क्रीज वर ..............
नाही चुकवत तू योर्कर.................
नाही चालत बॅट तुझी आता

एक असामान्य प्रतिभावान खेळाडू जो जगभर एक मर्यादाशील, नम्र व प्रामाणिक माणूस म्हणूनही ओळखला जातो त्या सचिनबद्दल कुणी भारतीयाने उपहासात्मक लिहीलं/ बोललं कीं मला नेहमीं कवितेच्या [बहुधा केशवसुतांच्या] या दोन ओळी आठवतात -
नदी सुदूर जनां पवित्र
विटाळती तीर्थ तिचेच पुत्र II Sad

सचिनच का
खडतर परिस्थितीत भारताकडून जलदगती गोलंदाजीचा पाया घालणा-या कपिलदेव बद्दल काही लोक अत्यंत कुत्सित शेरेबाजी करतात, कपिलला चांगली साथ देणा-या श्रीनाथच्या इनकटरच्या ऐवजी त्याच्या खांदे पाडण्याबद्दल चर्चा करणा-यांनाही या ओळी समर्पक आहेत. धन्यवाद भाऊ !

भाऊ, तुमच्या या नेमकी तीव्रता पोचवणार्‍या तरीपण संयमी प्रतिक्रिया आवडतात Happy
तुमच्यासारख्या आयडींकडून बाकीच्या अतिरेकी आयड्यांनी जरा पब्लीक फोरमची सभ्यता शिकुन घेतली पाहिजे!

सचिनला हि दोष देवून काय फायदा हल्ली ह्या खेळात पैसाच इतका आलाय कि त्याचा मोह सूटता सुटत नाही.तसेच जाहिरातदारांचाही बोर्डावर दबाव असावा.शेवटी कुठे थांबायचे हे ज्याचे त्यालाच कळायला हवे. स्टीव वॉ सारखे खेळाडू आता निवृत्त होवून भारतात समाजकार्य करत आहेत. परंतु आपल्या खेळाडूना निवृत्तीनंतर काय करावे हा प्रश्न पडत असावा.