कपिलदेव यांना भारतरत्न देण्यात यावे.
भारताच्या क्रिकेटला ख-या अर्थाने नवं रूप देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते कपिलदेव यांनीच. कपिल भारतिय संघाय येण्यापूर्वी भारतीय संघ सपाटून मार खात असे. सीरीज ड्रॉ करणे म्हणजे मोठ काम समजलं जाई. बॅटसमन फक्त वैयक्तिक विक्रमांसाठी खेळत. संघ जिंकावा म्हणून कधीच कुणी प्रयत्न करीत नसायचं.
"लॉर्ड्स" शब्द उच्चारले की अनेक प्रतिमा डोळ्यासमोर उभ्या राहतात. शाळेत असताना ब्रिटिशांबद्दल ऐकलेल्या गोष्टी (ते साम्राज्यावर सूर्य न मावळणे वगैरे), तेव्हाचा बलाढ्य इंग्लिश संघ, परंपरा पाळण्याची त्यांची सवय यामुळे पूर्वी या सर्वाचा एक दरारा वाटायचा. त्यामुळे जेव्हा १९८३ मधे कपिल च्या संघाने तेथे वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्या समारंभाकडे व तेथील लोकांकडे बघताना एखाद्या हुशार विद्यार्थाला शाबासकी देणारे शिक्षक लोक असा आविर्भावच जाणवत होता. नंतर हळुहळू ते कमी झाले. भारताने ते दडपण झुगारून दिले - राजकीयदृष्ट्या आणि क्रिकेटमधे सुद्धा.
जुना धागा .
त्याचा हा दुसरा भाग.
फारेण्डच्या सूचनेनुसार नाव बदलले आहे.
क्रिकेटचा खेळ जसा अनेक रोमहर्षक घटना आणि प्रसंगांनी भरलेला आहे, तसाच तो अनेक विनोदी आणि दु:खद घटनांचाही साक्षीदार आहे. मानवाच्या आयुष्यातील सगळ्यात दु:खद घटना म्हणजे अर्थातच मृत्यू. क्रिकेटच नव्हे, तर अनेक क्षेत्रातील व्यावसायिकांना आपल्याला आपले काम करतानाच किंवा कार्यप्रवण असतानाच मृत्यू यावा अशी इच्छा असते. अर्थातच बिछान्याला खिळून राहणे कुणालाच पसंत नसतं, पण याचाच अर्थ असा की आपले हात पाय व्यवस्थित चालत असतानाच मृत्यू आला तर तो अधिक स्वीकारार्ह असतो, मग तो कामाच्या ठिकाणी आला तर तो एक वेगळाच योग.
मुकुंद - 31 March, 2011 - 15:24
२ एप्रिल शनिवारचा दिवस म्हणजे कार्यालयाला सुट्टी. त्यात आनंदाची भर म्हणजे विश्वकरंडक क्रिकेट सामन्यातील भारत विरुद्ध श्रीलंकेमधील अंतिम लढत.