सनी मोमेंट्स

Submitted by Sanjeev.B on 1 April, 2013 - 06:59

सुनील मनोहर गावस्कर, भारतीय क्रिकेट मधले एक वलयांकित नाव, जागतिक क्रिकेट मधले वलयांकित नाव असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हिंदुस्थानातच नव्हे तर जिथे कोठे क्रिकेट खेळले जाते, तेथे हे नाव फार आदराने घेतले जाते. आज जसे सचिन ने काहीही केले (नाही केले) तरी विक्रम होते, तसे एक काळ सनी चे होते, शतक केले तर विक्रम, झेल घेतले तरी विक्रम, कसोटी खेळले तरी विक्रम, म्हणुन त्यांच्या नावा आधी विक्रमवीर ही उपाधी त्यांना देण्यात आली. माझ्या पाहण्यामध्ये त्यांच्या एव्हढे तंत्रशुध्द फलंदाजी करणारा दुसरा कुणी फलंदाज पाहायला मिळाले नाही. त्यांच्या पुर्वी, संजय मांजरेकर यांचे तिर्थरुप विजय मांजरेकर यांच्या तंत्रशुध्द फलंदाजी बद्दल फार ऐकले होते, पण त्यांचे फलंदाजी पाहण्याचे भाग्य आम्हास लाभले नाही. सनी ची फलंदाजी चे तंत्रशुध्दता तो बॅट ला ग्रिप करण्याच्या स्टाईल व त्याच्या स्टांस इथपासुनच सुरु होई. त्याच्या एव्हढा लोभस स्केवर कट मारणारा दुसरा कोणताही फलंदाज आजमिती पर्यंत माझ्या पाहण्यात आले नाही.

सचिन ने शोएब ला सेंचुरीयन वर मारलेले षटकार हे सर्व क्रिकेटप्रेमी ना आठवतच असेलच, त्या शॉट चा जनक सनी आहे. मला आठवतं वेस्ट इंडिज च्या भारत दौर्‍यावर (साल आठवत नाही) बहुधा चेपॉक / इडन्स वर मॅलकम ला सनी ने असेच भिरकावुन दिले होते, त्या काळी मॅलकम चा जबरदस्त दरारा होता, पण सनी ची तंत्रशुध्दता एव्हढी भक्कम होती, त्याची नजर व रिफ्लेक्स एव्हढे जलद होते कि क्षणाधार्त सनी ने तो बॉल फार उशीरा खेळण्याचे ठरविले आणि तो बाऊंसर त्याने लेट कट मारुन जेफ दुजाँ व पहिल्या स्लिप च्या डोक्यावरुन मारुन चौकार वसुल केले. मॅलकम मार्शल हा फार वेगाने गोलंदाजी टाकत होता, त्याचे चेंडु फार झपकन आत येत होते, पण सनी ची तंत्रशुध्दता आणि संयम (बॉल ला शेवट पर्यंत बघुन व नंतर फटका मारणे) पण तेव्हढीच जबरदस्त होती. सनी चे विकेट मिळविणे हे गोलंदाजांना फार अभिमानाचे वाटायचे.

सनी जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा ते तो फार आत्म विश्वासाने करायचा, मॅच पाहणार्‍यांना सुध्दा त्याची फलंदाजी म्हणजे मेजवानी वाटायची, गोलंदाजाला अक्षरशः घाम गाळुन सनी ची विकेट कमवावी लागत, किती ही बाऊंसर्स टाका, ऑफ स्टंप च्या बाहेर चे बॉल टाका हा स्थितप्रज्ञ, गोलंदाज अक्षरशः मेटाकुटीला यायचे, सनी जरी बॉल सोडुन देत होता किंवा नुस्तं तटवत होता तरी आम्ही म्हणायचो, काय मस्त चेंडू तटवतोय यार, पण तेच जर अंशुमन गायकवाड किंवा रवि शास्त्री ने केले तर काय टुकुटुकु करुन बोर करत आहे ही लोकं असे आम्ही म्हणायचो. रवि शास्त्री तर षटकाच्या ५व्या बॉल वर १ धाव काढुन स्ट्राईक त्याच्या कडे ठेवण्यात पटाईत होता. सनी जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा असे बिलकुल वाटत नव्हते कि हा बाद होणार, फार क्वचित असे पाहायला मिळाले कि सनी ने बेजबाबदार फटका मारुन बाद झाला आहे.

सनी चे अजुन एक गुण म्हणजे निर्भीडपणा. सनी फारच निर्भीड होता, कांगारुं विरुध्द च्या १९८१ च्या दौर्या च्या एका सामन्यात डेनीस च्या पायचीत च्या अपील ला पंचाने होकर दिल्यानंतर, सनी ने खेळपट्टी न सोडता, डेनीस व पंचा बरोबर वाद विवाद केले होते हे सर्वांना स्मरत असेलच, पंचाने आपला निर्णय फिरवले नाही म्हणुन सनी ने चेतन चौहाण ह्या आपल्या साथीदाराबरोबर मैदानातुन वॉक आऊट केले होते, नंतर संघ प्रशासनाने मध्यस्ती करुन चेतन चौहाण ला परत फलंदाजी करावयास मैदानावर पाठविले होते.

Sunny  X Dennis.jpg

सनी च्या निर्भीडपणा च्या कथेत एक विनोदी किस्सा ( बहुधा दंतकथा) वाचकांना सांगावीशी वाटते. एम सी सी (मेलबर्न क्रिकेट क्लब) वर सनी ने लुंगी परिधान करुन एकदा त्याच्या सहकार्यांसोबत फेरफटका मारले होते. एम सी सी वर सुट बुट ड्रेस कोड आहे, हे माहित असुन ही सनी ने मुद्दाम लुंगी परिधान केले होते, जेव्हा सनी ला ह्या बद्दल एम सी सी पदाधिकार्यांकडुन विचारणा झाली तर सनी ने निर्भीडपणे उत्तर दिले, जसे सुट बुट तुमहे पारंपारिक वेषभुषा आहे तसेच लुंगी सुध्दा भारतात दक्षिणेत पारंपारिक वेषभुषा आहे असे उत्तर दिले.

सनी चे क्रिकेट बद्दल चे ज्ञान आणि त्याचे इंग्रजी भाषा वरचे प्रभुत्व वादातीत होते म्हणुन हा निर्भीडपणा त्याच्या अंगी आले असावे असे मला वाटते. आज ही क्रिकेट समालोचन करताना सनी ला पहा, इयान चॅपल असो किंवा जेफ्री बॉयकॉट असो, त्यांचा योग्य ते मान राखुनच त्यांच्याशी समालोचन मध्ये वाद विवाद घालतो.

सनी बद्दल अजुन एक विनोदी किस्सा म्हणजे कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी जर सामना अनिर्णीत अवस्थेत जात असेल तर शेवटच्या मँडेटरी ओव्हर्स मध्ये तो गोलंदाजी टाकायचा, त्यात कधी अंशुमन गायकवाड चा चश्मा घेऊन एक ओव्हर दिलीप दोशी च्या स्टाईल मध्ये टाकायचा, तर दुसरा ओव्हर अब्दुल कादिल ची नक्कल करत टाकायचा. सनी, अब्दुल कादिर ची नक्कल तर भन्नाट करायचा, पुष्कळ हसु यायचे.

सनी जेव्हा निवृत्त झाला तेव्हा असे वाटले, "We'll Miss Ya", पण नाही तो क्रिकेट समालोचक म्हणुन आला, आणि क्रिकेट समालोचक म्हणुन ही कारकिर्द गाजवली, व नेहमीच युवा क्रिकेटपटुना योग्य वेळी योग्य सल्ला दिले.

तर, मित्रहो, आम्हास माहित आहे, सनी हा सर्वांचाच लाडका आहे, तुमच्या कडे ही काही सनी मोमेंट्स असणार तर येथे जरुर share करावे.

धन्यवाद. Happy

- संजीव बुलबुले / २८.०३.२०१३

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<त्याची नजर व रिफ्लेक्स एव्हढे जलद होते कि >>
१००% सहमत. वेस्ट इंडिजच्या तोफखान्याला (रॉबर्टस, होल्डिंग, मार्शल, क्रॉफ्ट, गार्नर, अँब्रोज...) हेल्मेट न घालता सामोरं जाण्याची कुवत फक्त सुनीलकडे होती.

छान लिहिलय. मी क्रिकेट बघायला लागलो तेव्हा गावसकरची कारकिर्द संपलेली होती त्यामुळे त्याचे फक्त नाव ऐकून होतो आणि नंतर नंतर खुपच स्लो खेळतो आणि स्वतःच्या रेकॉर्ड करता खेळतो असही काही लोकांच्या तोंडून ऐकलं होतं. समालोचन करताना पहिलं तेव्हा मात्र खुपच प्रभावित झालो. खरच खेळाचे ज्ञान आणि इंग्रजी वरच्या प्रभुत्वामुळे बघायला, ऐकायला मजा यायची.
तेंडूलकरनी त्याला आदर्श मानतो असं म्हंटला तेव्हा जाऊन थोडी जास्त माहिती मिळवली सनीबाबत आणि जरा प्रकाश पडला.
इतर काही क्रिकेटप्रेमींकडून त्याच्याबद्द्ल आणखिन वाचायला आवडेल. Happy

क्यारेबीअन सॉनेट कार, लॉर्ड रीलेटर ने १९७१ सिरिज नंतर लिहिलेले सॉनेट ( सुनीत) -

A lovely day for cricket
Blue skies and gentle breeze
The Indians are awaiting now
To play the West Indies
A signal from the umpire
The match is going to start
The cricketers come on the field
They all look very smart ...

Erapalli Prasanna
Jeejeebhoy and Wadekar
Krishnamurthy and Vishnoo Mankad
Them boys could real play cricket
On any kinda wicket
They make the West Indies team look so bad
We was in all kinda trouble
Joey Carew pull a muscle
Clive Lloyd get 'bout three run out
We was in trouble without a doubt

(CHORUS)
It was Gavaskar
De real master
Just like a wall
We couldn't out Gavaskar at all, not at all
You know the West Indies couldn't out Gavaskar at all

Ven-kat-a-ra-ghavan
Bedi, in a turban
Vijay Jaisimha, Jayantilal
They help to win the series
Against the West Indies
At Sabina Park and Queen's Park Oval
A hundred and fifty-eight by Kanhai
Really sent our hopes up high
Noriega nine for ninety-five
The Indian team they still survive

(CHORUS)

Govindraj and Durani
Solkar, Abid Ali
Dilip Sardesai and Viswanath
They make West Indies bowlers
Look like second raters
When those fellas came out here to bat
West Indies tried Holder and Keith Boyce
They had no other choice
They even try with Uton Dowe
But ah sure that they sorry they bring him now

(CHORUS)

Little Desmond Lewis
Also Charlie Davis
Dey take a little shame from out we face
But Sobers as the captain
He want plenty coachin'
Before we cricket end up in a disgrace
Bedi hear that he became a father
So he catch out Holford in the covers
But when Sobers hear he too had a son
He make duck and went back in the pavilion

(CHORUS)
It was Gavaskar
De real master
Just like a wall
We couldn't out Gavaskar at all, not at all
You know the West Indies couldn't out Gavaskar at all

गावस्करची कप्तान म्हणून कामगिरि ह्या मह्त्वाच्या मुद्द्याला पण स्पर्श केला असता तर आढावा पूर्ण झाला असता.

१००% सहमत. वेस्ट इंडिजच्या तोफखान्याला (रॉबर्टस, होल्डिंग, मार्शल, क्रॉफ्ट, गार्नर, अँब्रोज...) हेल्मेट न घालता सामोरं जाण्याची कुवत फक्त सुनीलकडे होती. >> स्कल कॅप का घालयला लागला हे माहित आहे का ? सनी डेज मधे सुद्धा त्याचा reference सापडत नाही.

स्कलकॅप वयाप्रमाणे रिफ्लेक्सेस स्लो झाल्यामुळे वापरायला सुरुवात केली असं त्यानेच कुठेतरी लिहील्याचं वाचलं होतं. उशीवर डोकं ठेउन, झोपुन वाचायच्या सवयीमुळे थोडा स्पॉन्डिलायटीस होता, त्यामुळे हेल्मेट चा ताण मानेवर पडायचा ... हे सगळं कुठेतरी वाचलं आहे. 'मनाचे श्लोक' नाहीत.

सनीची विनोदबुद्धी पहा -- खूप जणांनी बघीतलं असण्याची शक्यता आहे, पण तरीसुद्धा...

http://www.youtube.com/watch?v=-cU3jufnvXw&feature=player_embedded

१३व्या मिनीटांपासून पुढे जाम धमाल बोललाय.

मला वाटतं मीं इथंच मागें सांगितलेला हा किस्सा आहे. चेंडूच्या शक्यतो जवळ जावून शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यावर नजर ठेवायची हा सुनीलच्या तंत्राचा गाभाच होता. माझे एक मित्र एका वर्तमानपत्रासाठी आपल्या इंग्लंडच्या दौर्‍याचं इतिवृत्त देण्यासाठी तिथं गेले होते. टेड डेक्स्टर [इंग्लंडचा माजी कर्णधार] प्रेस अटॅची म्हणून एमसीसीतर्फे प्रेसबॉक्समधे हजर राहून थट्टा मस्करी करत असे. सुनील खेळायला आल्यावर मात्र कठड्यावर मान टेकून तो एकाग्रतेने सुनीलचा खेळ पहात होता. कुणीतरी त्याला ' कां रे बाबा, अचानक गंभीर कां झालास', असं टोकलं. डेक्सटर मागे वळून म्हणाला ' चेंडूवर नजर शेवटपर्यंत खिळवून ठेवायची, हें मला शिकवलं होतं; पण अगदीं जवळ जावून चेंडूचा वासही घ्यायचा असतो, हें आतांपर्यंत माहितच नव्हतं मला !!'
<< तो बाऊंसर त्याने लेट कट मारुन जेफ दुजाँ व पहिल्या स्लिप च्या डोक्यावरुन मारुन चौकार वसुल केले.>><< त्या शॉट चा जनक सनी आहे. >> सुनीलचं श्रेय हिरावून न घेतां मला सांगावसं वाटतं कीं त्या शॉटचा जनक मात्र दिलीप सरदेसाई असावा. दिलीपने हा शॉट रणजी ट्रॉफी सामन्यात सफाईने वापरल्यावर विजय मर्चंट यानी कॉमेंट्री बॉक्समधून तीव्र नापसंति व्यक्त केल्याचंही मीं ऐकलंय.