विडंबन

असतेस घरी तू जेंव्हा..

Submitted by सत्यजित on 17 March, 2011 - 10:34

नसतेस घरी तू जेंव्हा ह्या अप्रतिम कलाकृतीची सहृदय क्षमा मागुन, संदीप आणि सलिल मला मोठ्या मनाने क्षमा करतील येवढीच इच्छा.

असतेस घरी तू जेंव्हा
जीव विटका विटका होतो
रागातून उठती त्रागे
बनियान फाटका होतो

छतं फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो,
मी जरा निद्राधीन होता
हा सांड घोरका होतो.

येतात मुली दाराशी
हिरमुसून जाती मागे,
खिडकीतून पाहुन त्यांना
मी असाच अगतिक होतो.

तव मिठीत म़ळमळणाऱ्या
मज स्मरती घामट वेळा,
भासाविन भूत दिसावे
मी तसाच स्तंभित होतो

तू सांग अरे मग काय
मी तोडू या घरदारा?
विटलेला जीव उदास
कलईसम भुर्रभूर्र उडतो.

ना अजुन झालो गोटा
ना भणंग अजुनी झालो,

गुलमोहर: 

उडेल बघ नशेत हे विमान एकदा तरी (हझल)

Submitted by अ. अ. जोशी on 5 March, 2011 - 13:34

मिल्या यांच्या http://www.maayboli.com/node/23892 या गझलेवरून...

उडेल बघ नशेत हे विमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

पहाड, जंगले, नद्या उगाच निर्मिल्यात का?
पिऊन पाहुया तिथे निदान एकदा तरी

ढगांवरी जळून चंद्र वायुला विचारतो
मिळेल ब्रँड का तुझा किमान एकदा तरी

उधार राहते तुझी; जगास माहिती असे
बघून यायचेस पण दुकान एकदा तरी

कळेचना कशामुळे क्षणात बिनसते तुझे
भरेन पेग मी असा निदान एकदा तरी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सारंच काही कॉन्फिडेन्शियल....

Submitted by सुनिल जोग on 25 February, 2011 - 22:54

कुणाला वेड गाण्याचे,कुणाला खाण्याचे,कुणाला पिण्याचे
पण याना?...
यांना वेड कॉन्फिडेन्शियालीटीचे
होय..कॉन्फिडेन्शियालीटीचे
मग यांचे आयुष्य तरी कसे असते?

यांची अंघोळ कॉन्फिडेन्शियल
दात घासणे,दाढी करणे,उठणे,झोपणे
नवरा-बायकोचॅ प्रेमही कॉन्फिडेन्शियल
यांच्या मुलांना ताप आला,कॉलेजला अ‍ॅडमिशन झाली,
परदेशी नोकरी लागली
सारं काही कॉन्फिडेन्शियल
एवढंच नव्हे तर आजारी पडले कॉन्फिडेन्शियल
तर डॉक्टरलाही लक्षणे सांगतात
माफकच हसतील्,माफकच बोलतील्,मोजकंच जेवतील
यांना पर्सनल आयुष्यात प्रेमपत्र लिहिण्याचा त्रास नाही
कारण सारंच काही कॉन्फिडेन्शियल

गुलमोहर: 

माता ही घाबरी ---

Submitted by विदेश on 5 February, 2011 - 22:23

[चाल: राधा ही बावरी -]

गर्दीत वाहने-लांब रांग पाहता , नजर भिरभिरते
ऐकून हॉर्न,विसरून भान,ही वाट काढण्या बघते
त्या अतिक्रमणांच्या विळख्यामधुनी- हाक ईश्वरा देई
माता ही घाबरी पोरीची माता ही घाबरी !

इवल्या इवल्या पायांची त्रेधातिरपिट उडताना
थेंब थेंब वाहनातुनी पिचकारीचे पडताना
तो गणवेषाचा रंग पाहता पोर घाबरुन जाई
तो उशीर होता गेट शाळेचे बंद ! मारतील बाई ?

आज इथे तर उद्या तिथे - दूर निधन ते अपघाती
पोरीसोबत जाताना उगा पावले अडखळती
ते ऊन म्हणा पाऊस म्हणा , पालिकेस जाग न येई
ते खड्डा खणणे रस्त्यामधुनी , बंद कधी ना होई !

गुलमोहर: 

झाले (गझल )

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 5 February, 2011 - 02:43

गोड होते
कडु झाले

गोठे होते
वाडे झाले

दोन होते
चार झाले

हिंदु होते
यवन झाले

कवि होते
गझलाकार झाले

बघितल्याने आताशा
कुणाचे लैंगिक शोषण झाले

जातो विसरुन सारं
आठवत नाही काय झाले?

जे द्यायला आले
दु:खच हताश झाले

गुलमोहर: 

विसरशील लोक'मता' निवडणूक होता......

Submitted by kalpana_053 on 4 February, 2011 - 18:23

"विसरशील खास मला...." या ज. के. उपाध्ये यांच्या कवितेवरील विडंबन काव्य .....

विसरशील लोक'मता' निवडणूक होता......

विसरशील लोक'मता' निवडणूक होता
महागाईने परी सीमा गाठल्या जरि आता

निवडूनि आल्यावर भेटही विरळी
हुजुरेही विविध, लाळघोटी तव भोवताली
गुंतता सत्तेत कुठे, मतदार आठवीता

स्वैर तू वचनभंगी, 'पक्षात' विहरणारा
कसलेही पापाचरण तुला सहज बंडखोरा
भरशील तुझा गोत संधी जशी हाता

खुर्चीची हाव तुझी थांबवू कशाने
सोसवे न मतदारच करतील तुज 'शहाणे'
याकरता मतदारा झोपू नको आता......

गुलमोहर: 

(अव)लक्षणे...

Submitted by मी मुक्ता.. on 25 January, 2011 - 07:07

विशाल कुलकर्णी यांची क्षमा मागुन... मुळ कविता फारच सुरेख आहे.. इथे वाचा.. पण विडंबन करयचा मोह आवरला नाही...
http://www.maayboli.com/node/22644

----------------------------------------------------------------------------
माझ्या वरणाच्या वाटीत
सापडायचं सोडलंय
हल्ली डाळीने...

ह्म्म्म..
फुगत नाहीत आताशा
तुझ्या पोळ्यासुद्धा
तेलाशिवाय..

निष्क्रिय होऊ लागलाय आजकाल
ओटा.. किचनचा..

अन
गायब होत चाललाय
भाजीतला कांदा..

गुलमोहर: 

भादरून टाक नीट !

Submitted by राफा on 3 January, 2011 - 00:00

‘मालवून टाक दीप’ चे विडंबन :
(सुरेश भटांची क्षमा मागून)


(मूळ काव्य इथे बघू शकाल.)

(अमानूष केस व दाढी-मिशा वाढलेला इसम न्हाव्याला म्हणतो आहे…)

भादरून टाक नीट, कर्तनात हो तू दंग
नापिता किति दिसात, पाडला बळेच भांग

ह्या अशा जटा बटांत, चेहरा लपे तो आत
हाय तू हसू नकोस, दिसतो मी जरी भणंग

लांब लांब दोन हात, गेला हा संभार व्हात
सावकाश घे कापून, कठीण हा जरी प्रसंग

फार फार ह्या हवेत, उडूनी दाढी झोके घेत

गुलमोहर: 

विचारू नका मला

Submitted by अलका_काटदरे on 30 December, 2010 - 11:19

सर्व माबो कराना नमस्कार आणि नूतन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचे स्वागत करताना
मनात आलेले विचार -

(पुछो ना कैसे मैने रैन बितायी च्या चालीवर)

विचारू नका मला वर्ष कसे गेले

इकडे आड तिकडे विहीर २
घेतली नाही तरी मी एक उडी
धडपडत धडपडत चालत आले
विचारू नका मला ..

अपघात झाले, रोगराई झाली
घोटाळ्याने सर्व पूर्तता केली
कशीबशी कशीबशी बंबई सावरली
विचारू नका मला ..

एक साठवण, एक पाठवण
लक्षात राहतील असे असंख्य क्षण
लगबग लगबग बाजू सारले
विचारू नका मला

हितगुज गाजले, कुजबुज झाली
संमेलनाने मस्त सांगता झाली
तरीपण अजून कुरघोडी नाही सरली
विचारू नका मला ..

गुलमोहर: 

खूप झालं!

Submitted by परीक्षित on 23 December, 2010 - 02:26

मी "शिवाज्", "JD" आणायच्या गोष्टी करत नाही,
एक बॅगपायपरचा खांब आणता आला, खूप झालं!
तू दिसतेस ऐश्वर्यासारखी! बरळलो काही,
एकदम मुस्काटात् मारलीस , खूप झालं!
टाचेची त्वचा घाण झाली, क्रॅक क्रिम लावला..
पावलापुरता सुवास येतोय,खूप झालं!
"पकवा" अन्न म्हणताच् बापाचा उद्धार केलास
भिक नको पण कुत्रा आवरलास तरी खूप झालं!
मला नाही जमणार गाडीचा emi द्यायला...
चप्पल न तोडता चालता आलं, खूप झालं!
तुला नाही समजली माझी कविता? चालेल!
परत करणार नाही..हे शेवट्चं "खूप झालं"

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विडंबन