भादरून टाक नीट !

Submitted by राफा on 3 January, 2011 - 00:00

‘मालवून टाक दीप’ चे विडंबन :
(सुरेश भटांची क्षमा मागून)


(मूळ काव्य इथे बघू शकाल.)

(अमानूष केस व दाढी-मिशा वाढलेला इसम न्हाव्याला म्हणतो आहे…)

भादरून टाक नीट, कर्तनात हो तू दंग
नापिता किति दिसात, पाडला बळेच भांग

ह्या अशा जटा बटांत, चेहरा लपे तो आत
हाय तू हसू नकोस, दिसतो मी जरी भणंग

लांब लांब दोन हात, गेला हा संभार व्हात
सावकाश घे कापून, कठीण हा जरी प्रसंग

फार फार ह्या हवेत, उडूनी दाढी झोके घेत
मोकळी करून टाक, घेई वस्त-यास संग

हे तुला तेव्हा कळेल, दिसताच मी कोणी पळेल
काप ना केस हे बरेच, पालटू दे रुपरंग

काय हा तुझा मसाज, नाजूक का इतुका आज
बडव रे लावून तेल, मस्तकाचा कर मृदुंग

- राफा

गुलमोहर: 

म स्त

प्रकाशाच्या वेगाने दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार Happy !

@शरद, सूचनेबद्दल आभार. वृत्त सांभाळले आहे असे वाटते. 'दिसतो मी' हे 'दिसतो.मी' असे जलद म्हणून बघता का ? चूभूदेघे.


@मी_आर्या : नापित चा अर्थ सुद्ध न्हावी Happy (शेवटी 'कातरवेळी' कोण बरोबर असतो ते महत्वाचे Happy )

- राफा

राफा.. Rofl Rofl ज ब र द स्त!!!!!!!!!!!! हजामत केलीयेस्...( ओरिजिनल गाण्याची Wink )