ठरेन या जगात मी महान एकदा तरी (तरही)

Submitted by मिल्या on 25 February, 2011 - 00:02

तरही गझल लिहिण्याचा माझाही एक प्रयत्न.

लढेन षड् रिपुंसवे किमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

पहाड, जंगले, नद्या उदास सर्व भासती
वळून पाहशील का निदान एकदा तरी?

ढगांवरी जळून चंद्र, वायुला विचारतो
’मिळेल का मला तुझे विमान एकदा तरी?’

मदार केवढी तुझी उधार जिंदगी वरी
बघून यायचेस पण दुकान एकदा तरी

कळेच ना कशामुळे क्षणात बिनसते तुझे
करेन मी जगा तुझे निदान एकदा तरी

नकोस तू ! मला तुझा पुरेल फक्त भास ही
शमेल मृगजळामुळे तहान.... एकदा तरी

करायचाय एकदा असह्य छळ तुझा मना
बनेल काय देह अंदमान एकदा तरी?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कळेचना कशामुळे क्षणात बिनसते तुझे
करेन मी जगा तुझे निदान एकदा तरी>>> मस्त शेर!

नकोस तू ! मला तुझा पुरेल फक्त भास ही
शमेल मृगजळामुळे तहान.... एकदा तरी>> आशावादी विचार! सुरेख!

करायचाय एकदा असह्य छळ तुझा मना
बनेल काय देह अंदमान एकदा तरी>>> निराळा विचार, नावीन्यपूर्ण कल्पना!

बरेच दिवसांनी आलात?

अजून गझलांच्या प्रतीक्षेत!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

कळेच ना कशामुळे क्षणात बिनसते तुझे
करेन मी जगा तुझे निदान एकदा तरी

नकोस तू ! मला तुझा पुरेल फक्त भास ही
शमेल मृगजळामुळे तहान.... एकदा तरी

करायचाय एकदा असह्य छळ तुझा मना
बनेल काय देह अंदमान एकदा तरी?

हे तीन शेर अफाट आवडले!!! मुजरा Happy

अख्खी गझल आवडली!

धन्यवाद!

रामकुमार

वाह गुरू!!!!

पहाड, जंगले, नद्या उदास सर्व भासती
वळून पाहशील का निदान एकदा तरी?

मदार केवढी तुझी उधार जिंदगी वरी
बघून यायचेस पण दुकान एकदा तरी

करायचाय एकदा असह्य छळ तुझा मना
बनेल काय देह अंदमान एकदा तरी?

फार आवडले...

मिल्या सुंदरच गझल Happy

मी या प्रांतात अगदीच नवीन... (एक दिवसाचे बाळ Happy ) असल्यामुळे सगळ्या गझलींचे निरिक्षण चालू आहे... त्यामुळेच कदाचित तुमच्यासारख्या दिग्गजांकडून अनवधानाने झालेली छोटीशी चुक (?) माझ्या नजरेत पटकन दिसली असावी... ती खरंच चुक आहे, की इतर काही नियमांनुसार तसे लिहिलेय, हे मला माहिती नाही... तसे असल्यास आधीच क्षमा मागते.

करायचाय एकदा असह्य छळ तुझा मना>>> यात १६ ऐवजी १७ अक्षरे आहेत आणि लगा क्रमही ३ ठिकाणी चुकलाय...

सानी,

हे अक्षरगणवृत्त आहे. यात अक्षरांच्या संख्येला महत्व नाही. एकंदर मात्रा व लघु गुरू क्रम समान हवा. लगा क्रम वरील गझलेत कुठेही चुकलेला नाही. जोडक्षराच्या आधी लघु अक्षर आल्यास त्याच्या दोन मात्रा कशा होतात हे आपल्याला माझ्या लेखामध्ये समजू शकेल. 'गझल परिचय'!

पण आपण असेच संवाद करत राहिलात तर उत्तमच होईल कारण मोठेमोठे गझलकारही असेच शिकलेले दिसतात अनेकदा!

मिलिंद,

नाक खुपसल्याबद्दल दिलगीर आहे.

-'बेफिकीर'!

करायचा | यएकदा | असह्यछळ | तुझामना |
लगालगा | लगालगा | लगालगा | लगालगा |

सानी, चूक नाहीये ती. लघु-गुरू अक्षरांच्या संख्येवर ठरत नाहीत.

मी आधीच क्षमा मागितली हे बरे झाले! Happy

बेफिकीरजी, आनंदयात्री, तुमच्यामुळे मला आज दोन नवीन नियम समजले.... विस्तृत प्रतिसादाबद्दल तुमचे अनेक आभार Happy

बेफिकीरजी, मी तो लेख वाचला आहे, पण त्यात खुप माहिती असल्याने हा भाग वाचायचा सुटला असावा... आता पुन्हा नीट वाचते.

ढगांवरी जळून चंद्र, वायुला विचारतो
’मिळेल का मला तुझे विमान एकदा तरी?’ ...... वेगळा वाटला, मस्त.

कळेच ना कशामुळे क्षणात बिनसते तुझे
करेन मी जगा तुझे निदान एकदा तरी ..... मस्त.

नकोस तू ! मला तुझा पुरेल फक्त भास ही
शमेल मृगजळामुळे तहान.... एकदा तरी ......... व्वा....

करायचाय एकदा असह्य छळ तुझा मना
बनेल काय देह अंदमान एकदा तरी? ........ अफाट .

>>>

सही लिहिलय...... आवडेश Happy

मिल्या.... कसलं भन्नाट लिहीतोस रे भाऊ...
आता मला इथे सगळी गझल पुन्हा पेस्ट करायला लावू नका राव !!
अप्रतिम, प्रचंड आवडली Happy

अफाट गझल!

नकोस तू ! मला तुझा पुरेल फक्त भास ही
शमेल मृगजळामुळे तहान.... एकदा तरी

दंडवत!

करायचाय एकदा असह्य छळ तुझा मना
बनेल काय देह अंदमान एकदा तरी?


!!!!!!!!

प्रतिसाद दिल्याबद्दल खरेच खूप धन्यवाद...

बेफिकिर : हो बरेच दिवसांनी लिहिले... मधून मधून संकेतस्थळावर येउन वाचत होतो पण काही लिहायला जमत नव्हते Sad

आणि अहो दिलगिरी कसली.. उलट सानीला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद...

नकोस तू ! मला तुझा पुरेल फक्त भास ही
शमेल मृगजळामुळे तहान.... एकदा तरी

करायचाय एकदा असह्य छळ तुझा मना
बनेल काय देह अंदमान एकदा तरी?

खास 'मिल्या' टचचा शेर..! Happy

गझल आवडलीच..!
मिल्या, असाच येत जा आणि वारंवार लिहित जा ..!