झाले (गझल )

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 5 February, 2011 - 02:43

गोड होते
कडु झाले

गोठे होते
वाडे झाले

दोन होते
चार झाले

हिंदु होते
यवन झाले

कवि होते
गझलाकार झाले

बघितल्याने आताशा
कुणाचे लैंगिक शोषण झाले

जातो विसरुन सारं
आठवत नाही काय झाले?

जे द्यायला आले
दु:खच हताश झाले

गुलमोहर: 

वाह वाह १ मुकु कडुन पुन्हा एक अप्रतिम गजल !!

वृत्त वाढते आहे किती नाविन्य पुर्ण प्रयोग अहाहा !

गोड होते
कंडु झाले >>> यात वृत्त पुर्ती साठी वापरलेला अनुस्वार फारच भावला ! मागे मीही एका गजलेत वापरल्याचे स्मरते Proud

पंत Rofl

मुकु Rofl Rofl Rofl

बाम होते
झंडू झाले

ठीक होते
फंडू झाले

लाख होते
राख झाले

शब्द होते
टिंब झाले

नळ्यांचे मग
मझल झाले

गझल का ही?
हे पझल झाले