हझल

दोस्त दोघे एक मी अन एक तू

Submitted by वैभव फाटक on 21 May, 2016 - 05:45

दोस्त दोघे एक मी अन एक तू
सातवी नापास मी, बीटेक तू

माहिती आहे तुझ्याबद्दल तिला
काळजी घेऊन थोडी, फेक तू

घे जरा वाटून कामे आजही
मी चपाती लाटतो अन शेक तू

ती भले 'मिस वर्ल्ड' तुझ्यासाठी, तिला
वाटतो आहेस का अभिषेक तू ?

पाहिजे असतील जर श्रोते तुला
सूर सांभाळून थोडे, रेक तू

वैभव फाटक ( २१-०५-२०१६)

हझल

Submitted by विदेश on 20 November, 2013 - 20:05

ते वार लाटण्याचे चुकवू कितीक आता
हा पोळपाट हाती तोही फुटेल आता

पाठीस ढाल केले त्या लाटण्यासमोरी
डोक्यावरी निशाणा धरणार हाय आता

तो संपला 'पुरुषदिन' कळता तिला अखेरी
लोटांगणाविना ना पर्याय काय आता

प्राविण्य नेमबाजी कौतूक फार झाले
का भोगणे तडाखे मज ह्या वयात आता

ती सात जन्म नशिबी हिटलर म्हणून आली
आज्ञा किती झुगारू उरले न त्राण आता . .

शब्दखुणा: 

बहर गझलेचा उचलला, अन् हझल झाली!

Submitted by चैत रे चैत on 3 December, 2012 - 13:58

सतीश देवपूरकरांच्या गझलेतले काव्य आम्ही रिचवले, अन् हझल झाली...

हझल

बहर गझलेचा उचलला, अन् हझल झाली!
अर्थ शेरांचा बिघडला, अन् हझल झाली!!

केवढ्या सहजीच आली चाल हाताशी;
काफिया नुसता मिळवला, अन् हझल झाली!

चिंतनाची बात नाही, मौत प्रतिभेची!
कळफलक नुसता बडवला, अन् हझल झाली!!

दाद देण्या येत नाही कोणिही दर्दी!
मीच मग डंका पिटवला, अन् हझल झाली!!

ते गझलसम्राट अन् मी एक हा कवडा!
प्रत्येक शेरा फाडला, अन् हझल झाली!!

खर्चिली मी खेचण्यासाठीच ही शाई

टुकारघोडे! (हझल)

Submitted by अभय आर्वीकर on 10 March, 2012 - 09:16

टुकारघोडे! (हझल)

 उगाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे टुकारघोडे हजार आहे

कशी बघा चालते कचेरी, अशी जशी की दुकानदारी
अनाथ सोडून कायद्याला, विधानमंडळ फ़रार आहे

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला
मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे

गमावतो ना कधीच संधी हपापलेला विचित्र प्राणी
डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे

गुलमोहर: 

... सांगून जोक गेले (हझल)

Submitted by अ. अ. जोशी on 20 January, 2012 - 22:02

''जोक' या गझलेचे हे विडंबन नाही. मात्र त्यातील जोक शब्दामुळे त्याच लयीत सुचलेली हझल.तिथे गझलेत न वापरलेला काफिया घेतला आहे.

गावात दांडग्यांचे हसण्यात झोक गेले
जेथे खट्याळ जोशी, साने नि ओक गेले

हसणे बघा मलाही क्रमप्राप्त आज होते
लिहिली गझल नि वरती सांगून जोक गेले

त्यांचा घसा कधीचा बघ कोरडा असावा
समजून त्यास मदिरा गटवून कोक गेले

बदनाम होत आहे मुन्नी बघा अजुनही
इतकी कि नाव सारा भरुनी त्रिलोक गेले

सांभाळ पृथ्विराजा आता जरा स्वतःला
पाहून ठेव कैसे सहजी अशोक गेले

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नुसता [(तरीही) पझल]

Submitted by मंदार-जोशी on 9 August, 2011 - 07:53

झोप लागे ज्यावर तो पलंग द्याना
का देत मजला तो खाट नुसता?

जाहली ढेकणे तयावरी उदंड
चावणे तयांचे हा त्रास नुसता

मारण्या तयांना बेगॉन मारले
भयानक तयाचा येई वास नुसता

सूक्ष्मजीव ते येती कष्टानेच हाती
तोपर्यंत गादीत आपुला नाच नुसता

होत सुटका शेवटी रामप्रहरी जरी
भूक त्यांची मिटे आपुला भास नुसता

का दिली तरही ही तुम्ही मला
ही रचना गझल? हा पझल नुसता.

शब्दखुणा: 

काय सांगू सासवांना हासण्याची कारणे (तरीही)

Submitted by मंदार-जोशी on 29 July, 2011 - 10:41

गझल विभागात एक तरही वाचली आणि सहज गंमत म्हणून हे सुचलेलं टाकतोय........
संबंधितांनी कृपया हलके घेणे.
याला काहीच्या काहीच्या काहीच्या काही कविता म्हणण्यासही आक्षेप नाही.

------------------------------------------------------------------------------------

काय सांगू सासवांना हासण्याची कारणे
जाणार गावी आनंदून मग बांधेन मी तोरणे

जीन्स घालता सुनेने बोलती कुजके जरी
मुलीने करता फ्याशन तिला मॉडर्न संबोधणे

देखणे ते नाक मुलीचे अन् सुनेचे ते वाकडे
मुलगी आणि सुनेला का वेगवेगळे जोखणे?

सून करता विचारपूस यांना वाटते "फॉर्म्यालिटी"
मुलीचे टोमणेही भासती मायाळू ते बोलणे

शब्दखुणा: 

पिवून घ्यावी..! (हझल)

Submitted by विशाल कुलकर्णी on 23 March, 2011 - 01:38

पुन्हा नव्याने जुन्याच जागी तसेच सारे जमूत मित्रा
परमिटरुमच्या चविष्ट गप्पा पुन्हा जरा आठवूत मित्रा...

मनात खळखळ, उरात धडधड, हळूच येइल शिपायदादा
परमिट नाही खिशात आता पचवुन दारू नडूत मित्रा....

मुखात व्हिस्की, करात चखणा.., झणी बिपाशा दिसेल आता
नवथर कोर्‍या, नव्या भिडूला पुन्हा अता आवरूत मित्रा...

उगाच तूम्ही मला चिडवता, तशात दारू पुन्हा उतरते
भरून प्याले अबोल होणे, स्मरून खळखळ हसूत मित्रा...

तुडुंब भरता उदर सुरेने पुन्हा स्मरे मग सखी नशीली
अखेरची ती सिगार होती, स्मरून तिजला रडूत मित्रा...

चटावलेल्या जिभेस लहरी, हवी विदेशी मधूमदीरा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

उडेल बघ नशेत हे विमान एकदा तरी (हझल)

Submitted by अ. अ. जोशी on 5 March, 2011 - 13:34

मिल्या यांच्या http://www.maayboli.com/node/23892 या गझलेवरून...

उडेल बघ नशेत हे विमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

पहाड, जंगले, नद्या उगाच निर्मिल्यात का?
पिऊन पाहुया तिथे निदान एकदा तरी

ढगांवरी जळून चंद्र वायुला विचारतो
मिळेल ब्रँड का तुझा किमान एकदा तरी

उधार राहते तुझी; जगास माहिती असे
बघून यायचेस पण दुकान एकदा तरी

कळेचना कशामुळे क्षणात बिनसते तुझे
भरेन पेग मी असा निदान एकदा तरी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ठरेन या जगात मी महान एकदा तरी.. हझल

Submitted by मी अभिजीत on 28 February, 2011 - 10:29

करेन वादग्रस्तसे विधान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

सदैव भालदार चोपदार का रहायचे
बनेन नाटकात या प्रधान एकदा तरी

तुला बघून रोज काव्य पाडले नि धाडले
बघायचेस कागदी विमान एकदा तरी

हजार अल्टरेशने, कितीक बेल्ट घातले
मला बसेल का तुझी तुमान एकदा तरी

किती भकार अन किती फुल्या फुल्या लिहायच्या
जपून वापरायची जबान एकदा तरी

चुना,लवंग, कात टाकुनी तयार जाहले
खुशाल पिंक मार खाच पान एकदा तरी

कशास नेहमीच बाँड, बॅटमॅन पाहिजे
बघायचा उगीच शक्तिमान एकदा तरी

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - हझल