Submitted by विदेश on 5 February, 2011 - 22:23
[चाल: राधा ही बावरी -]
गर्दीत वाहने-लांब रांग पाहता , नजर भिरभिरते
ऐकून हॉर्न,विसरून भान,ही वाट काढण्या बघते
त्या अतिक्रमणांच्या विळख्यामधुनी- हाक ईश्वरा देई
माता ही घाबरी पोरीची माता ही घाबरी !
इवल्या इवल्या पायांची त्रेधातिरपिट उडताना
थेंब थेंब वाहनातुनी पिचकारीचे पडताना
तो गणवेषाचा रंग पाहता पोर घाबरुन जाई
तो उशीर होता गेट शाळेचे बंद ! मारतील बाई ?
आज इथे तर उद्या तिथे - दूर निधन ते अपघाती
पोरीसोबत जाताना उगा पावले अडखळती
ते ऊन म्हणा पाऊस म्हणा , पालिकेस जाग न येई
ते खड्डा खणणे रस्त्यामधुनी , बंद कधी ना होई !
गुलमोहर:
शेअर करा
छान.........चालीत म्हणायला
छान.........चालीत म्हणायला आवडले........... :))
मस्त
मस्त
चांगली जमलिये चालीत म्हणायला
चांगली जमलिये
चालीत म्हणायला मजा आली 
लइच भारी..
लइच भारी..
चांगली जमलीय...
चांगली जमलीय...
छान जमलीय.
छान जमलीय.
छान
छान
आवडली.... :स्मितः
आवडली.... :स्मितः
मस्त
मस्त
छान.
छान.
भारी जमलिय
भारी जमलिय
सुंदर
सुंदर