कुणाला वेड गाण्याचे,कुणाला खाण्याचे,कुणाला पिण्याचे
पण याना?...
यांना वेड कॉन्फिडेन्शियालीटीचे
होय..कॉन्फिडेन्शियालीटीचे
मग यांचे आयुष्य तरी कसे असते?
यांची अंघोळ कॉन्फिडेन्शियल
दात घासणे,दाढी करणे,उठणे,झोपणे
नवरा-बायकोचॅ प्रेमही कॉन्फिडेन्शियल
यांच्या मुलांना ताप आला,कॉलेजला अॅडमिशन झाली,
परदेशी नोकरी लागली
सारं काही कॉन्फिडेन्शियल
एवढंच नव्हे तर आजारी पडले कॉन्फिडेन्शियल
तर डॉक्टरलाही लक्षणे सांगतात
माफकच हसतील्,माफकच बोलतील्,मोजकंच जेवतील
यांना पर्सनल आयुष्यात प्रेमपत्र लिहिण्याचा त्रास नाही
कारण सारंच काही कॉन्फिडेन्शियल
यांचं दु:ख्,आनंद्,प्रेम आणि मनही..कॉन्फिडेनशियल
एक सुस्कारा = दु:ख
दोन सुस्कारे = जादा दु:ख
तीन सुस्कारे = अति दु:ख
यांची कॉन्फिडेन्शियालीटी देखील किती कोडीफाईड आहे बघा
हल्ली हल्ली हे मनातल्या मनात प्रेम करतात
आणि मनातल्या मनात संभोग करतात
आणि मनातल्या मनातच मुले प्रसवतात
कारण बायकोला कळेल ना यांच्या मनात काय आहे ?
त्यांनी तर म्हणे देवाला साकडे घातलंय
देवा बायकोचं गर्भारपण कॉन्फिडेन्शियल दे
त्यांना सुर्योदय्,चंद्रोदय कॉन्फिडेन्शियल हवा असतो
पाउस्,वारा,थंडी हे सारं
सार्वजनिक का ही त्यांची तक्रार आहे.
नाटक्,सिनेमा,गायन्,वादन हा सारा जाहीर तमाशा आहे
जगाला अक्कल कुठाय?
कॉन्फिडीन्शियालिटीच यांचं जनन्-मरण
अवघी चार माणसे आणि फक्त सरण..
कॉन्फिडेन्शियल
सारं... काही
मस्त आहे. माझी बाकीची कमेंट
मस्त आहे. माझी बाकीची कमेंट कॉन्फिडेन्शियल!
यांना वेड
यांना वेड कॉन्फिडेन्शियालीटीचे
होय..कॉन्फिडेन्शियालीटीचे
मग यांचे आयुष्य तरी कसे असते?सगळं नाटकीच असते अस म्हणता येईल.
सुनीलजी,
वाह ! भन्नाट आणि सत्यवचन
सणसणीत षटकारच लगावणारे तुम्ही आहात, त्यामुळे १-२ धावांची अपेक्षा करुच नका.
कुणीतरी म्हंटलयच ना, 'शिक्षणाने जर लोक संकुचित होत असतील तर त्यांच्यापेक्षा अडणी लोक चांगले.

कशाचं विडंबन आहे?
कशाचं विडंबन आहे?
कशाचं विडंबन आहे?>>>> ते
कशाचं विडंबन आहे?>>>>
ते कॉन्फीडेन्शीयल आहे.
बाकी कविता मस्त.