सर्व माबो कराना नमस्कार आणि नूतन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचे स्वागत करताना
मनात आलेले विचार -
(पुछो ना कैसे मैने रैन बितायी च्या चालीवर)
विचारू नका मला वर्ष कसे गेले
इकडे आड तिकडे विहीर २
घेतली नाही तरी मी एक उडी
धडपडत धडपडत चालत आले
विचारू नका मला ..
अपघात झाले, रोगराई झाली
घोटाळ्याने सर्व पूर्तता केली
कशीबशी कशीबशी बंबई सावरली
विचारू नका मला ..
एक साठवण, एक पाठवण
लक्षात राहतील असे असंख्य क्षण
लगबग लगबग बाजू सारले
विचारू नका मला
हितगुज गाजले, कुजबुज झाली
संमेलनाने मस्त सांगता झाली
तरीपण अजून कुरघोडी नाही सरली
विचारू नका मला ..
एकामागून एक वर्षे जाती
थोडेफार काही येई हाती
हळूहळू एकेक पा,न गळून जाई
विचारू नका मला ..
थोडे गोड, जास्त कडू
तिखट सुद्धा अपवाद नाही
मळमळून वर कधी आंबट येई
विचारू नका मला
छान स्वप्ने, भव्य भेटी
भरपूर येऊ दे नव वर्षी
मग पहा कसे सारे उल्हासित होईल
विचारा मला तुम्ही
स्वागत कसे केले
म्हणेन मग मी जोरदार केले !!
(No subject)
मस्त जमली.
मस्त जमली.
धन्यवाद मुकु आणि मुटेजी.
धन्यवाद मुकु आणि मुटेजी.