Submitted by अ. अ. जोशी on 5 March, 2011 - 13:34
मिल्या यांच्या http://www.maayboli.com/node/23892 या गझलेवरून...
उडेल बघ नशेत हे विमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी
पहाड, जंगले, नद्या उगाच निर्मिल्यात का?
पिऊन पाहुया तिथे निदान एकदा तरी
ढगांवरी जळून चंद्र वायुला विचारतो
मिळेल ब्रँड का तुझा किमान एकदा तरी
उधार राहते तुझी; जगास माहिती असे
बघून यायचेस पण दुकान एकदा तरी
कळेचना कशामुळे क्षणात बिनसते तुझे
भरेन पेग मी असा निदान एकदा तरी
नको बघूस बाटली पुरेल एक पेगही
तिच्यासमोर राख लाज, भान एकदा तरी
कधी नशेत लक्षद्वीप, मालदीव पाहतो
तसेच पाहुयात अंदमान एकदा तरी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अफ्फाट! सलाम प्रतिभे! की
अफ्फाट!
सलाम प्रतिभे!
की मदिराक्षे?
रामकुमार
मस्तच!!!
मस्तच!!!
अफाट हझल.... ______/\_______
अफाट हझल.... ______/\_______
वाह..! सुरेख
वाह..! सुरेख
मस्त.
मस्त.
मस्तच हजल सर्व शेर आवडले
सर्व शेर आवडले
...हझल स्वीकरल्याबद्दल
...हझल स्वीकरल्याबद्दल सर्वांना धन्यवाद!
विशेषतः मिल्याला....
कधी नशेत लक्षद्वीप, मालदीव
कधी नशेत लक्षद्वीप, मालदीव पाहतो
छान हझल 
तसेच पाहुयात अंदमान एकदा तरी>>>:हाहा: अंदमान? एकदम काळ्या पाण्याची शिक्षाच आठवली