लई दिस बिचार्याची झाली ओढा-तान
देवा माझा देश आता झालाया महान...
ऑलंपिकासाठी कोटी, कोटी खर्च झाले
नवे नवे विक्रम आम्ही डोपिंग मध्ये केले
चार-दोन पदकांची आमची तहान
देवा माझा देश आता झालाया महान...
सानिया सानिया हरली तरी छान
लांडा फ्रॉक घालून नुस्ती फिरली तरी छान
टेनीस नाही कळलं तरी आम्ही तिचे फॅन
देवा माझा देश आता झालाया महान...
आदर्श लोकांचा इथे आदर्श घोटाळा
एक आण्णा कित्तीकांना घालीन तरी आळा
वाळू चोरणारा इथे बनतोया डॉन
देवा माझा देश आता झालाया महान...
घरामध्ये टिव्ही आला टिव्ही मध्ये घर
करपून जाते रोज रोटी तव्यावर
सासू-सुना बसत्याती मांडुनी दुकान
( चाल : शूर आम्ही सरदार आम्हाला )
दूर नाही घरदार , आम्हाला नाही कुणाची भीती !
लाज-बीज अन् शरमहि नाही , प्याले घेतले हाती |धृ|
मस्तीच्या दर्पात उधळली, उच्च कुलाची रीत
दोस्तीशी ईमान राखलं , घडलं जरि ईपरीत
लाख झेंगटं झेलुन घेईल , अशी झिंग ती राती |१|
धिंगाणा वा गोंधळ करणं , हेच आम्हाला ठावं
सोसायटीमध्ये कसं जगावं , हे न आम्हाला ठावं
आईबाबांची सारी अब्रू - टांगू वेशीवरती |२|
(चाल : शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले - )
चष्मा असुनी दिसले नाही -
रस्त्याच्या पलीकडले ,
प्रथम तुला पाहियले ; पाउल
खड्ड्यात कसे पडले ?
शर्ट नवा मी खास घातला -
पँट नवी, अन् चष्माहि नवा !
त्या दिवशी का प्रथमच माझे
बूट सांग अडखळले ?
आवडते कपडे त्या रात्री ;
खड्ड्यातच फाटले किति तरी ...
परीटघडीच्या त्या कपड्यांचे
रफू न मज परवडले !
(चाल : देहाची तिजोरी - भक्तीचाच ठेवा )
फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा
पकडणार चोरांना त्या - पकडणार केव्हा ?
नसे दूर चौकी इथुनी फार पोलिसांची ,
तरी चोरटयांच्या नाही भीती मुळी त्यांची -
सरावल्या चोरांनी का दंड थोपटावा ?
उजेडात होते पहाणी - अंधारात साsssफ
चोरट्यांच्या हाती लागे द्रव्य ते अमाप -
दक्ष पोलिसांची कैसी नसते गस्त तेव्हां ?
फार्स जणू जप्तीकरता - कायदा कचेरी
आपुलीच वर्दी होते आपुलीच वैरी -
मुळ गझल
गावठीही हाय जोवर लागते रिचवायला
थांबणे सोसेल तोवर लागते ढोसायला...
वारुणीचे ग्लास पाहुन धुंद होती माणसे
भोवताली अप्सरा मग लागती भासायला...
त्या रिकाम्या बाटलीचे हासणे खोटारडे
लागलेला वेळ थोडा ग्लासही फ़ोडायला...
बेवड्यांना सांगतो मी थांबणे आता नको
वेटरांचा धीर आता लागला संपायला...
बारची या रीत न्यारी शिकवते पचवायला
लागते मग सवय वेड्या.., ओकण्याची व्हायला!
इरसाल म्हमईकर ....
(चाल : नाच नाचुनी अति मी दमले -)
वाच वाचुनी अति मी दमले -
विटले रे कवितेला !
कविता-लेखन तुज न झेपले ,
निमुटपणा ना कसला !
आजच कचरा-कुंडी-स्थानी
सफाईवाला आला !
निरुपयोगी कविता-कागद
रद्दी घातली त्याला !
विषय आज ना काही सुचेना ,
अती ताप तो झाला !
अजब तुझ्या त्या छंदापायी ,
सुसंवाद ना घडला !
रोख मानधन... नाही काही -
मजवर राग का धरला ?
(चाल : एक धागा सुखाचा -)
एक त्रागा सुनेचा , शंभर त्रागे सासूचे -
घरोघरी हे चित्र माणसा , तुझिया संसाराचे !
तू असशी जरी कर्ता तगडा ,
सासू सुनेचा बघशी झगडा -
सुटकेसाठी करशी नाटक - तूच आजारांचे !
उचलबांगडी बालपणाची ,
धुळीत स्वप्ने तारुण्याची -
जीर्ण माय मग उरे शेवटी - अजीर्ण अर्धांगीचे !
सासू सुनातें बघतो कोणी ,
एक सारखी बसती फुगोनी -
कुणा न दिसले , भांडणात त्या - हाल बिचाऱ्याचे !
कालच्या सामन्याच्या मानकर्यांसाठी आणि अर्थात आमच्या लाडक्या सचिनदेवासाठी हे कवन...
गदीमांचे गीतरामायणातील मूळ काव्य इथे मिळेल. काल रात्रभर नाचुन विजयाच्या उन्मादातच लिवलं गडबडीत आहे, मीटर तपासू नये. काही कडव्यांचा क्रम बदलला आहे, पण मुळ चालीवरच म्हणता येइल.
लीलया उडुनी वानखेडेत
पेटवी लंका हनुमंत
डॉक्टरांच्या वाटत आहे वरुन सुचलेले
http://www.maayboli.com/node/24599
डॉक्टर माफ करा 
===========================================
न मज नयन उघडावेसे वाटत आहे
रोज नवे विदुशी मज भेटत आहे
वस्त्र नावाला अंगावरी म्हणे फॅशन आहे
नको तेव्हडे जवळ जाउन खेटत आहे
खुले राहण्यात नाही मजा लोक हो !!
बंधनात यांना जखडावेसे वाटत आहे
( चाल: आज गोकुळात रंग खेळतो हरी - )
रोज कौतुकात दंग बायको जरी ,
लाटणे जरा जपून आज बघ करी |धृ |
तोच मित्र रोज सिगारेट ओढतो
थेट खिशातून तुझ्या नोट काढतो ,
गुंतवुनी बोलण्यात चहा उकळतो -
सावध केले मी तुला कितीदा तरी |१|
सांग मित्रमंडळास काय जाहले ?
कुणी गंडविल्याविना कुणा न सोडले !
ज्यास त्यास लुटण्याचे चंग बांधले -
एकटाच वाचशील काय तू तरी |२|
तू कधीच रंगढंग नाही उधळला !
मित्रमंडळात तरी कसा गुंगला ?
तो पहा - चंडिकेस पत्ता लागला ...
हाय, धावली धरून लाटणे करी |३|