विडंबन

भटक्या विमुक्त जाती - एन्टी फोर

Submitted by तुषार इंगळे on 22 December, 2010 - 02:36

सन २०११ ची जनगणना जातींवर आधारीत असणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जातींचा आढावा घेण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीच्या बैठकीचा तपशील आणि निष्कर्ष याबाबतचे हे इतिवृत्त.

बैठक पहिली
अध्यक्ष : आपल्या महाराष्ट्रात आज बर्याच संख्येने ह्या भटक्या विमुक्त जाती आहेत, ज्यांना कायद्याच्या अंतर्गत आणुन त्यांना सांवैधानीक संरक्षण द्यावे आणि पुढिल वर्षी जनगणना करताना मोजायला सोपं व्हावे ह्यासाठी आपण इथे जमलो आहोत.

गुलमोहर: 

तन !

Submitted by वर्षा_म on 20 December, 2010 - 04:54

आमची प्रेरणा
http://www.maayboli.com/node/21972
======================

तन अथांग फार
त्यात भुखही लहरी,
पोटभर खाउनी
पुन्हा भुकेने बावरी !

तन उत्तुंग हिमाद्री
प्रतिबिंब आळशांचे,
व्यायामानेही ना वितळे
अंग चरबीच्या थरांचे !

तन झाले वटवृक्ष
जणू फोफावल्या पारंब्या,
झाले हे विशाल
जमा पोटावर लाद्या !

तना या काय म्हणावे
खुप झाल्या उपमा,
बेढब कुरुपतेला
नाही कशाचीच तमा !

गुलमोहर: 

निष्ठूर

Submitted by कौतुक शिरोडकर on 19 December, 2010 - 05:28

(डॉक्टरांच्या http://www.maayboli.com/node/21999 या गझलेला झब्बू (?))

कागदी घोडे... तया ना खूर आहे
योजना हाती नवी मंजूर आहे

लाभ पॅकेजी.... किती जाहीर झाले
कालचा राजा.... 'बळी' आतूर आहे

कामगारांना कळेना.. काय चुकले ?
बंद गिरण्या अन धुमसता धूर आहे

आज ते 'आदर्श' सारे फोल झाले
ती पहा, दिल्ली.. जवाना दूर आहे

आग लावू मी कसा या जीवनाला ?
आसवांची पाणथळ भरपूर आहे

रे तुक्या, इतुके कसे तुजला गमेना ?
आंधळा दळतोय.... कुत्रा चूर आहे

गुलमोहर: 

आम्ही कोण म्हणुनी काय पुसता थोबाड वेंगाडुनी....

Submitted by मी_आर्या on 16 December, 2010 - 02:41

हे कशाचे विडंबन हे सांगुन 'लहान तोंडी मोठा घास' मी घेत नाही!
एक पहिलाच, छोटासा प्रयत्न म्हणुन रसिक जनांनी स्विकारावे ही अपेक्षा !!

आम्ही कोण म्हणुनी काय पुसता थोबाड वेंगाडुनी
आम्ही असु नावडती मायबोलीकर बाले
आम्ही असु ड्यु आयडी आपल्यातीलच सोकावलेले
चाले ज्यावरती अखंड शिव्यांचा वर्षाव बीबीतुनी

ते आम्ही, करु बेमालूम वस्त्ररुपांतरे
ते आम्ही, धमकावु बदलवून आयपी अ‍ॅड्रेस परी
डोळ्यादेखत घालुनपाडुन बोलु भल्याभल्यावरी
करु त्यांसी पळता भुई थोडी आम्ही, तदनंतरे

स्क्रॅपसची भरगच्च घेउन सदा काखोटीला पोतडी
घालु आमच्याच मागण्यांसाठी साकडे अ‍ॅडमिनला विपुमधे

गुलमोहर: 

लग्न-घटीका

Submitted by वर्षा_म on 15 December, 2010 - 04:35

उल्हासजींच्या अनुमतीने Happy

http://www.maayboli.com/node/21903

===================================

लग्न लग्न ते काय असे हे, झाल्यावाचुन कळेच ना
म्हणती जैसे स्वर्ग कधीही, मेल्यावाचुन दिसेच ना

करुया आता लग्न म्हणूनी, मुलगी काही मिळत नसे
तिच्याच शोधात होतो आणिक, मलाच ती स्वप्नी दिसे

लग्न स्वप्न जागेपणी पडते, झोप उडवते, मना ग्रासते
लग्न -ध्यास अन लग्न -पूर्ति मग, आयुष्याचे ईप्सित होते

लग्न या विषयावरी, सल्ले नुसतेच एकायचे
जगाने कितीही समजावले, करुन असते पहायाचे

लग्न हे जणू उदीष्ट की, ज्यावर ना काही पर्याय
विघ्न विघ्न अन विघ्न आहेत, सुचवा मला काही उपाय

गुलमोहर: 

व्यथा सासुची

Submitted by वर्षा_म on 14 December, 2010 - 03:57

मुक्तेश्वर यांची माफी मागुन Happy
http://www.maayboli.com/node/21876

==============================

लाडक्या लेकाच्या संसाराला
आणली घरा सून, आणली घरा सून
शिकली सवरली आणली शोधुन शोधुन,
पण तिने काढले मलाच घरातुन...

आल्या आल्या धरला लेकाशी अबोला
होता तिचा फक्त पैशावर डोळा
कमवायच्या नावानी होती भोपळा
लेकाला आता दिसती माझेच अवगुण...
दिसती माझेच अवगुण...
संसाराला सुरुवात ...

सुनेने रचला हाकलायचा कट
लेकाला घातलीय अवघड अट
म्हणे आता संपवा ही कटकट
आहे बिचारा आता तिला भिउन..
तिला भिउन..
संसाराला सुरुवात ...

लेकाने आणली मला नवी साडी
कधी नव्हे ती माझ्यासाठी गाडी

गुलमोहर: 

कतरीनाचा सलमान बाई कधी अ‍ॅशचा हा सलमान

Submitted by स्वप्ना_तुषार on 10 December, 2010 - 05:20

कवीवर्य ग.दि.मांची माफी मागून

कतरीनाचा सलमान बाई कधी अ‍ॅशचा हा सलमान
कपडे काढून दावी डोले शोले
कतरीनाचा सलमान बाई कधी अ‍ॅशचा हा सलमान
बिगबॉसच्या ह्या सिज़न साठी किती गाळे घाम॥ध्रु॥

एक एक बाई नवी , फॅन गाई गीत
एक एक लफ़डी जोडी कुणी न धरे ह्याचा हात, बिचारा हा नाथ॥1॥

कधी अ‍ॅश तर कधी कतरीना संगे, हाच होई त्यांचा दास
एक एक प्रकरणी गुंते, फ़ेस येई तोंडास, खानांचा हा खान॥2॥

चाळीशीच्या उंबरठ्यावरती एकच आहे आस
आतातरी कुणी यावे कुणी घ्यावे पास, व्हावे कुणाचातरी नाथ ॥3॥

गुलमोहर: 

जिथे डास डासास बोलावती

Submitted by shashank pratapwar on 8 December, 2010 - 10:52

ह बा यांची मुळ गझल

http://www.maayboli.com/node/21288

मला माहीती अन तुला माहीती
कुणाच्या गल्लीला गटारे किती?

सुटावी कशी कोण सांगेल का
जुन्या डेंग्युची जी वाटे भिती

नका फसफसु रे नाल्यांनो तिथे
जिथे डास डासास बोलावती

अंडे देउनी जन्मतो जीव जेथे
उद्याच्या उद्याला फवारा बुटी

नगरसेवका,लेका इथलाच का?
कशी रोगमुक्त होईल सिटी.

- शशांक प्रतापवार

गुलमोहर: 

विडंबन - कॅटरिनाचा सलमान

Submitted by शुभांगी. on 8 December, 2010 - 07:21

आमची प्रेरणा - http://www.maayboli.com/node/21719

आमची एक मैत्रीण (:हाहा:) कॅटरिना हिला कुणी पसंतच पडेना
पण लग्न तर करायचे होते कसेबसे ठरले एकदाचे.
लग्नात मजा यावी म्हणुन तिने मला कविता करुन मागीतली
ती पूढील प्रमाणे

गुलमोहर: 

...तू (विड्म्बन)

Submitted by मी मुक्ता.. on 8 December, 2010 - 03:34

कौतुक शिरोडकर यांची क्षमा मागून...
मूळ गझल इथे वाचा...
http://www.maayboli.com/node/15178

बोलशी खोटे जरी तू
मागचीपेक्षा बरी तू...

तू न मुन्नी, तू न शीला..
साक्षात मल्लेश्वरी तू...

स्वप्न बघतो नित्य सुंदर..
ती खोटी, का खरी तू?

चिंतीशी वाईट माझे..
भार्या न, वैरी तू...

समजलो मी डाळखिचडी,
मिसळीवरची तर्री तू....

बघ नको, बागेत भेटू
सरळ ये ना घरी तू...

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विडंबन