काहीच्या काही बालकविता: आजोबाच्या काळातली जादूची छप्पी

Submitted by pradyumnasantu on 1 March, 2012 - 19:06

आजोबाच्या काळातली जादूची छप्पी
शनिवारचा दिवस
सकाळची शाळा
कडक चव्हाणमास्तर आणतात
पोटात माझ्या गोळा

कारे बाळा असा
हात धरलायस मित्राचा
उभा रहा तू बघू
आणि म्हण पाढा सत्राचा

स..स...स्स.सर सर
नको मला ते सर सर
म्...म..
नको म म मास्तर
म्हण पाढा सत्राचा भराभर

सांग सत्रा दुणी किती
प प प प पस्तीस
सत्रा पंचे, सत्रा सक्खं
प पन्नास, अ अ अडतिस

शाब्बास, आता दप्तरातून
आण बारा इंची पट्टी काढून
सर पट्टी नाही आणलो
घरी आलो विसरून

मार जरा बागेत उडी
आण जाड मेंदीची फांदी
सट सटासट सट सटासट
नको सर, सत्रा चोक अडुसष्ट

दुस-या दिवशी पाढा मी अगदी पाठ म्हणतो
शाब्बास, आता कधी विसरतो?
न न नाही
सत्रा सक्खं...
दुग्गोदरसे
विसरलास तर
मेंदीचा रंग बरसे....

विशाल, श्रुष्टी, अनिलः आभार
पण जादूची छप्पी? नाही समजलं>>>>>>>>>>>
साधारण १९५५-६५ या काळात आम्ही शाळा शिकलो. विशेषतः प्राथमिक शिक्षक फूटपट्टीने मुलांच्या तळहातावर 'हळु, जोरात' मारत असत. त्याला छप्पी असे नाव होते.

भारी कविता. आमच्या वेळचे पानवलकर मास्तर डाव्या हाताने कान धरायचे आणि उजव्याने छप्पी मारायचे तीही पालथ्या हातावर, बोटांच्या हाडांवर. अजून आठवते ती असंख्य वेळा खाल्लेली छप्पी.