बाबू

Submitted by चाऊ on 19 February, 2012 - 04:29

चालवून कलम, करती
कत्ले आम, बाबू
नाडली, रडली जनता
म्हणते त्यांना खाबू

लेखणीची एक हरकत
करते रंकाचा राव
फिरली उलटी तर
होई जिंदगी बेकाबू

नाही इच्छा तिची तर
काहीच होत नाही इथे
नुसतेच कगद जुने
त्याची सडकी बदबू

झाली लक्ष्मीची बटिक
सरस्वतीची अक्षरे
सही, शिक्का, प्रमाणपत्र
हीच आजची अब्रू