गझलेला कंटाळलेले.....

Submitted by बागेश्री on 12 March, 2012 - 08:40

माझ्या गझलकार मित्र मैत्रिणींनो,
सदर रचना अगदी गम्मत- जम्मत आहे, कुणालाही उद्देशून काहीही नाही त्यांत... हघे प्लीज Happy

गझलांमध्ये वारंवार वाचण्यात आलेल्या काही विशिष्ट शब्दांचे हे इवलेसे मनोगत... येन्जॉय्य Happy

_____________________________________________

एके दिवशी गझलांना
'सरण' गेले कंटाळून,
नको म्हणाले जन्म हा
गझलकार घेतो नुस्ता वापरून!!

त्याच दिवशी 'पैंजण'ही
गझलांवर रुसून बसले,
शब्दांमध्ये अडकून बिचारे
तुटले, फसले, धुसमूसले!

'भास- आभासांना' हवी
गझलांतून जरा मुक्ती,
पकडा इतरही शब्दांना
आमच्यावर नकोय सक्ती!!

राहिलच मागे कसा
वैतागलेला 'श्वास'..
आहे सहज उपलब्ध मी,
म्हणून गझलांनी वापरावे सर्रास??

'अश्रू' आले तत्परतेने
म्हणाले कळवळून मैफिलीला,
दु:ख, हुंदके, नि:श्वास, उमाळे
बांधवांना नेऊ का जरा फिरायला?

'हे शब्द' एकसुरात गाती..

द्या तुम्ही मुक्ती आम्हां,
येतो जरा बागडून!
अडकून पडलोत वृत्त कैदेत
घेतो स्वैर जगून
जरासे
घेतो रे स्वैर जगून..... Wink

हे काय?????

चांदणे, हाय, गडे, निखारे, खंजीर, आसवे, विजा, ओठ, झिम्मा, सूर्य, कंस, फुले, कळ्या, तारुण्य

यातले काहीच नाही????

Lol

शाम Lol

शाम Lol
येऊ द्या अजून...

बादवे, सर्व गझलकारांच्या वतीने हे जाहीर आश्वासन देतो की वर लेखामध्ये आलेले सर्व शब्द यापुढे प्रत्येक गझलेत वापरले जातील! Proud

असा 'श्वास'च काढून घेतला तर (समकालीन, नव्या दमाच्या, शब्दाशयसंपन्न इ इ इ) मराठी गझलेचे कसे होणार? Wink
(शाम, काफिया दिला बघा :P)

Proud आया Proud

नवे शब्द सुचवतो ना

लिंगनिरपेक्षता, जेंडरलेस, इन द अ‍ॅब्सेन्स ऑफ जेण्डर, प्रजोत्पादन, कामेच्छा ... शोध घ्या आजूबाजूला !! Lol

मला वाटलं ' गझलेला कंटाळलेले................... माबोकर ! Happy खरंच शब्द विटले असतील नै?
मजेदार कल्पना आहे. कैच्याकै असलं तरी आवडलं मला. Wink

बागेश्रीने गंमत म्हणून लिहिलेली ‘काकाक’ सर्व गझलकारांनी गंमत म्हणूनच स्वीकारली.
त्यांच्या खिलाडू वृत्तीला सलाम.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
बागेश्री,
शब्दांना ’चेतनागुणोक्ती’ने अंलंकृत करून त्यांची कैफियत मांडणे, तसेच त्यांना मुक्त करण्याची कल्पना देखील काहीशी वेगळीच आहे….. कल्पना आवडली.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
या शब्दांबरोबरच ’ते’ नांवाच्या अदृश्य कॅरॅक्टरला देखील मुक्ती मिळायला नको का ?

हे जे कोणी विश्वासघात, अन्याय, फसवणूक, अत्याचार करणारे ’ते’ असतात ते धुमकेतूप्रमाणे अचानक कधीतरी, कुठूनसे उगवून साधारणत: तिसर्‍या चौथ्या शेरांमधे वर्णी लावून जाताना आढळतात.
उदा.
(१) चरण ज्यांचे पूजिले ते सरण माझे रचुन गेले
किंवा
(२) वाट ही मी चालताना, वाट ते लावून गेले
किंवा
(३) पाहिले त्यांना कधी ना, ते कधी दिसलेच नव्हते

बागेश्री, गझलांच्या हातभर लांब शीर्षकांबद्दल काहीच नाही लिहिलंस? Proud अपवाद म्हणून मगाशी एक दोन अक्षरी शीर्षक वाचल.

असा 'श्वास'च काढून घेतला तर (समकालीन, नव्या दमाच्या, शब्दाशयसंपन्न इ इ इ) मराठी गझलेचे कसे होणार?>>>

हे म्हणणारे तुम्ही कोण? Proud

=====================================

गझलांच्या हातभर लांब शीर्षकांबद्दल काहीच नाही लिहिलंस?>>>

Proud

अश्विनी नेहमीच विनोदी लिहितात

सगळेच Lol

तरीही मी (तरही नव्हे Wink )
पत्र, मायना, मजकूर, डोह, पालवी, मानव, मद्य, विष, शिल्प (इथे अनेक इतर विविध कलाही Wink ) यांचा व बुडालेले, उठलेले, निजलेले, गोंधळलेले इ. इ. इ. समावेश केला नाहीय्ये (कैच्याकै असली तरी कवितेच्या लांबीची जबाबदारी ह्या इवल्या खांद्यांवर होतीच ना राव Proud )
आणि त्याचमुळे झब्बू देण्यास सार्‍यांना धाग्यावर आमंत्रण आहे Biggrin

पेशल नोटः युरी तू आख्या परिवारासकट ये हो Lol

चित्तरंजन भट ह्यांचा अलिकडचा खूप पटलेला मतला ह्या निमित्ताने आठवला,

इथे प्रत्येक जण धुंदीत आहे फरक कळल्यास इतकासाच कळतो
कुणाला लागते दारू इथे तर कुणी शुद्धीतही कोरा बरळतो

बागेश्री
छान कल्पना आहे

मी एक गझल लिहिली होती आहे इथेच

गझलां मधून सार्‍या धक्के चिकार झाले
पृथ्वी वरी म्हणूनच भूकंप फार झाले

http://www.maayboli.com/node/7394

मी गंमत करीत नाहीये
हो.. ते जाणवलं... जाऊद्या विदिपा.. गंमतच सुरू आहे... अजून काय बोलू? झब्बू द्यायचा का? शामने सुरूवात केली आहेच Happy

असा 'श्वास'च काढून घेतला तर (समकालीन, नव्या दमाच्या, शब्दाशयसंपन्न इ इ इ) मराठी गझलेचे कसे होणार?>>>
हे म्हणणारे तुम्ही कोण?

असं निदान तुम्ही तरी विचारू नका! Proud

विदिपा,
प्लीज लाईटली घ्या, गझलेत येणार्‍या "परवलीच्या" शब्दांची ही जम्मत आहे, ती तशीच तितक्याच लाईटली घ्या.

सहमत आहे, लाईटली घेणे शक्य आहे Happy

पण गंभीर व्हायचेच म्हंटले तर गझलेत विशिष्ट शब्दांचा वापर जास्त होतो असे वाटणे साहजिक असले तरी प्रत्यक्षात तसे नसते हे पटावे.

गंमत गंमत म्हणून या धाग्याकडे पाहिले जावे अशी विनंती

Pages