लपंडाव

Submitted by चिमुरी on 27 February, 2012 - 23:00

जाणतेपण आल्यापासुन
चालु होतो एकच खेळ
एकाविरुद्ध अनेक
असाच घालावा लागतो मेळ

एकीला पकडलं
तर दुसरी रुसुन बसते
तिला पकडायला जावं
तर ती वाकुल्या दाखवुन पळते

कधी कधी एखादी
अजिबात हाती लागत नाही
सांदीकोपरे हुडकुनही
पुसटसं दर्शनही देत नाही

बेसावध क्षणी कधी
अलगद सापडते
एखादी अल्लड,
अव्यक्त मात्रा

टाईम प्लीज म्हणुन
ब्रेक घ्यायला गेलो
तर ठरलेलंच असतं
खेळाचं बदलणं

पळायचं, लपायचं सोडुन
एकापाठी एक करतात गर्दी
पाठशिवणीचा खेळ सोडुन
डाव झब्बुचा करतात चालु

कधी कधी झब्बुचा खेळ
सप्तरंगी होत जातो
एका हळव्या क्षणी मात्र
रंगाचा बेरंग होतो

मग पुन्हा चालु होतात
नेहमीच्याच खेळ-गप्पा
एकीला पकडावं
तर दुसरी देते धप्पा

अश्या या लपंडावाच्या खेळात
आठवणींचंच असतं राज्य
मन विरुद्ध आठवणी, अश्या खेळात
एकट्या मनावर कायमचंच राज्य

pradyumnasantu, सांजसंध्या, योगुली धन्यवाद... Happy

काही च्या काही मध्ये नको होती>>>>> इथेच बरीय ती Wink

चिमु, सुपर्ब ! फारच सुंदर कविता आहे ही. तु लिहितेस माहितच नव्हतं. आता तुझ्या पाऊलखुणांमधे तुझं अजुन काही लेखन आहे का शोधुन येते. Happy