निषेध

Submitted by चाऊ on 11 March, 2012 - 04:10

सगळं असुन, नसल्यासारख, सगळ नासल्यासारख तोंड करुन, उजेडाकडे पाठ करुन बसणार्‍या, सदा कसली तरी तक्रार करणार्‍या ( माझ्याच सारख्या ? Happy ) मंडळींच्या वरुन सुचलेले हे शब्द.......

पुर्वी ल्यायचो फाटके कपडे त्यांचा निषेध असो
आज अंगावरच्या महागड्या कपड्यांचा ही निषेध असो

वडा-पाव खाऊन दिवस घालवले त्यांचा निषेध असो
पंचतारांकीत खाणे खातो आहे, त्याचा निषेध असो

कधी कष्ट करुन पोट भरले त्याचा निषेध असो
गडगंज कमावणार्‍या आजच्या ह्या नोकरीचा निषेध असो

होत्या चार गोड मैत्रीणी त्यांचा निषेध असो
सुरेख समजुतदार बायको आहे, तिचाही निषेध असो

मरता मरता वाचलो कधी त्याचा निषेध असो
जगतो आज, का? कुणास ठाऊक? त्याचाही निषेध असो

खरडतो ह्या ओळी, खुळा चाऊ, त्यांचा निषेध असो
रिकामपणी केलेल्या ह्या निषेधांचा, त्यांचा ही निषेध असो

हे वाचुन प्रतिसाद न देणार्‍यांचा निषेध असो! Happy
मजेदार आणि तरीही अंतर्मुख करणारं आहे हे लिखाण /कविता / गझल. यातला फरक कळत नाही, पण आशय पोचला.