अल्लखकरण

Submitted by निनाद on 2 April, 2012 - 05:56

छ्या! माझ्या मराठी कविताही कळू नयेत?

मी इतकी भव्य कविता केली त्याला - कळत नाही असा रिस्पॉन्स? च्छ्या! एका अकादमी विजेत्या कवीला मराठी जगत मुकले याचे मला मनस्वी वाईट वाटते आहे.
माझा एक मित्र या कवितांना दुर्बोधिका म्हणतो.
नाही हो! सुबोध आहेत त्या.

असो पहिला डोस जरा कडक बसल्यामुळे ही जरा पाणी घालून केली आहे.
आशा आहे ही तरी आवडेल ; )

ए! कोण तिकडे म्हण्तोय रे, शब्दांपुढे शब्द रचले की कविता होत नाही ते?

असो तुम्ही नका लक्ष देउ... वाचा वाचा आणि प्रतिसाद द्या बर्का!

अल्लखकरण

मी तुला पाहताच
मनोमन बद्धरुपांतरण|
रोजच ते अनुभववावे
तव धन्यमरण||

ती आज आली
घेऊन गुलमोहतरण|
मला देतेसे चषक
तेच अल्लखकरण||

अजूनी ते येतातच
पाहताच झल्लकसरण|
तसे पाहता नजरेचे
हे विक्षेपसंक्रमण||

शब्दांचे असे कसे
सदैव कर्षित्रचर्वण|
एकटाभयाण विचार
ते बिंबाणुश्रवण||

अल्लखकरण

मी तुला पाहताच
मनोमन बद्धरुपांतरण|
रोजच ते अनुभववावे
तव धन्यमरण||

ती आज आली
घेऊन गुलमोहतरण|
मला देतेसे चषक
तेच अल्लखकरण||

अजूनी ते येतातच
पाहताच झल्लकसरण|
तसे पाहता नजरेचे
हे विक्षेपसंक्रमण||

शब्दांचे असे कसे
सदैव कर्षित्रचर्वण|
एकटाभयाण विचार
ते बिंबाणुश्रवण||

शब्दखुणा: