खजल............

Submitted by वैवकु on 31 March, 2012 - 03:40

गजल करा रे गजल करा
दिसेल त्याची हजल करा

प्रवास थोडा कठिण असे
करा मजल-दर-मजल करा

चकाफिये घ्याच आणि त्यांची-
-च एक सुंदर "चजल" करा
(उदा.: उद्दिष्टच ,गप्पिष्टच, इत्यादीच!
च +गजल =चजल>>>> कॉलिंग प्राजु!! )

उगाच "भंकस" म्हणा कुणा
कमेंट नुसते "प्रजल!!" करा
(प्र+गजल =प्रजल >>>>>>कॉलिंग विदिपा!! )

तखल्लुसांचा नकाब फाडा
खाउन खुन्नस "खजल" करा
(ख +गजल =खजल >>>>>कॉलिंग वैवकु!! )

गजल करा रे गजल करा
दिसेल त्याची हजल करा

प्रवास थोडा कठिण असे
करा मजल-दर-मजल करा

झक्कास~!

मस्त जमलेय.

धन्यवाद निनाद जी आपण मला आधी अ‍ॅज ए प्रतिसादक म्हणून भेटला असतात तर असे चांगले प्रतिसाद पाहून मन हळवं झालं असतं............पण इथे लोकांनी(काही ठराविक) मला फक्त वेडा ठरवलंय !!! म्हणून मीही असे प्रयत्न अधूनमधून करत असतो जेणे करून माझ्याबाबातीतला त्यांचा ग्रह सार्थ ठरावा वगैरे वगैरे !!
असो..........
धन्यवाद !!
(वरील उतारा सखाराम गटणे स्टाईलने वाचावा ही विनंती!!)

तुम्ही लिहा हो! स्वतःसाठी लिहा बिन्धास्त लिहा. लोक गेले खड्यात! ते काय आज कौतुक करता तर उद्या शिव्या देतात. तुम्हाला लिखाणाची मजा आली ना? मग झाले तर!

ग्रेट निनाद्जी मला हा विचार कधी सुचलाच नाही कसा !!
मी लिहीन ते कुणाला नाही तरी विठ्ठलाला आवडावं असं मला फार वाटतं .............इतर प्रतीसादाकांच्या प्रतिसादातून मी त्याचेच रूप पाहीत असे पण ते त्याचीच निंदा करू लागले मग मी हझलांकडे वळलो माझ्या विठ्ठलावर हसणार्‍याना टार्गेट करू लागलो.
असो
आपण सांगितले तसे करीन आता
धन्यवाद !!

व्वा व्वा काय विनोदबुध्दीय!

खजल असावी तर अशीच!

प्रियातै : ही जरा सौम्य शब्दातलीय म्हणून आवडलीय तुम्हाला बहुधा !!

प्राजु : काय हे .. मला वाटलं कॉलिंग प्राजू म्हटल्यावर तू तुझा नंबर देशील वगैरे वगैरे. जसा मी दिला होता वगैरे वगैरे Wink

बेफी :गैर्समज असेल तर असुद्या माझा गोडगैर्समज वगैरे वगैरे

<<<<सुप्रिया आणि प्राजू,

तुम्ही दोघी थट्टा करताय का त्यांची?

तसे असेल तर स्पष्ट लिहा की?

गैरसमज न होवो>>>>

नाहीतर....

हे 'खजल' प्रकरण ज्जामआवडलय बुवा वैवकु दादाचं !

प्राजु : काय हे .. मला वाटलं कॉलिंग प्राजू म्हटल्यावर तू तुझा नंबर देशील वगैरे वगैरे. जसा मी दिला होता वगैरे वगैरे >>>>>>>>>>>>
दिला असता पण तुम्हाला परवडायचं नाही मला फोन करायला. सो राहुद्या!!

बेफी,
आम्ही कोण हो थट्टा करणार!! साक्षात माऊलींची थट्टा करण्याची गुस्ताखी करुच शकणार नाही आम्ही.

<<<<आम्ही कोण हो थट्टा करणार!! साक्षात माऊलींची थट्टा करण्याची गुस्ताखी करुच शकणार नाही आम्ही.>>>>

पाप लागेल की, नी वाळवंटातले चटके वेगळे.

बेफीजी/ प्रियाजी माऊलींची थट्टा काय............
अहो तुम्हाला नाही समजले तर विचारायचे तरी की याचा अर्थ काय होता म्हणून!!
मला विचारताना कमीपणा न घेता थेट माऊलीना विचरायचत की
तो विषय जरा जास्तच आध्यत्मिक !! तुम्हाला झेपणार नाही हे मला माहीतीय ................

तरीही : माऊली परमदयाळू आहे माझ्या चुकांना क्षमा करेलच आपणासही करावी ही प्रार्थना !!

सुप्रिया तै : तो विषय आध्यात्मिक होता त्याला शास्त्राधारही होता .........तो कुणालाच नसावा समजला पण मला समजला होता

आता त्या माऊलीन्च्या ओळी मी गझलेत आणल्या ते थट्टा म्हणून नव्हे तर त्यांत मला काफिया रदीफ व खयाल सापडले म्हणूनच (हाच विचार नेमका कुणाला रुचला नाही ;मला जाणीव आहे याची)
वृत्त जरा गरज म्हणून जुळवून घेतले गझलेत बसावे म्हणून
ती गझल आपणास आवडली असती जर आपण तीत सामानानुभूती शोधली असतीत तर ;पण तसा प्रयत्नही कुणी केला नसावा कारण त्या रचनेमागे माझे नाव जोडले गेले म्हणून..............
असो!! ती पुन्हां वाचा हवी तर न समजल्यास विचारा मी सांगेन ...........
मी डॉक कैलास यांना पूर्वकल्पना देवूनच ती सादर केली होती...त्याना विचारा हवं तर ..........

विदिपा :मला माहीत नाही............
ते डॉक्टर आहेत हे नक्की!!
साहित्याचे, माणसान्चे की जनवरान्चे हेही मला माहीत नाही............पण ते डॉक्टर आहेत हे नक्की!!

डॉ. कैलास म्हणजे काय ब्रम्हदेव आहेत काय?

>>>:फिदी: मग विदिपा तुम्ही विष्णु आणि बेफी शंकर का ??....:खोखो:

गुरुदेव....दत्त

पांडुरंगा , वाचव रे बिच्चार्‍या वैवकु ला Rofl

डॉ. कैलास म्हणजे काय ब्रम्हदेव आहेत काय?
मग विदिपा तुम्ही विष्णु आणि बेफी शंकर का ??..
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

गझलेची त्रिसुत्रीच म्हणा ना. Happy

मग वैवकु काय "शुक्राचार्य" म्हणावे काय प्रसादराव Wink