पण पाठ सोडेल तर शपथ.....

Submitted by सुप्रिया जाधव. on 10 April, 2012 - 06:06

सक्काळपासूनचं मनात माझ्या
घालतोय हा थैमान खुळा !
दिनचर्येवर माझ्या नेहमीच
खुश्शाल फ़िरवतो अस्साचं बोळा !

पण पाठ सोडेल तर शपथ.....
...........मेला...हा..हा...हा कंटाळा !!!

सुट्टी-बिट्टीचे ज्यादा काम ?
अहो नाही लवकर उघड्त डोळा !
डोकंही होतं जड-जड
अकलेवरही लागतो टाळा !

पण पाठ सोडेल तर शपथ.....
...........मेला...हा...हा...हा कंटाळा !!!

दुपार मोठी...उत्साहाची खोटी,
बाहेर रिप-रिप पावसाळा !
संध्या दाटे...पै- पाहुणे....
चहा अन कॉफ़ीचं सतरावेळा !

पण पाठ सोडेल तर शपथ.....
...........मेला...हा...हा...हा कंटाळा !!!

-सुप्रिया.

<<<याला तुम्ही काकाक म्हणताय हा तुमचा मोठेपणा, नाहीतर अशा कवितांना साठच्या खाली प्रतिसाद येत नाहीत>>>>

<<<हा तुमचा मोठेपणा>>>

हे हे हे सर भापो....:-)

-सुप्रिया.

छान आहे नी खरंही आहे:-) कंटाळा आला ह्या कंटाळ्याचा. Happy

मेला...हा..हा...हा कंटाळा !!!>> हे वाचताना शिंक आल्याचा फील आला>>>>>>> बागे, मला जांभई चा फील आला Happy

<<<<मेला...हा..हा...हा कंटाळा !!!>> हे वाचताना शिंक आल्याचा फील आला>>>>>>> बागे, मला जांभई चा फील आला >>>>

चला म्हणजे कवितेचा उद्देश सफल झाला म्हणायचा तर!!! माझा कंटाळा तुम्ही घेतलात...:-)

धन्यवाद मंडळी.

-सुप्रिया.

व्वा! छान जमल्ये सुप्रिया ताई! तुम्हि ही कविता पोस्टायचा कंटाळा केला नहीत हे एक बरं केलत! Happy

मला विचाराल तर "मेला...हा..हा...हा कंटाळा" इथे "हा हा हा" चा उपयोग हास्यदर्शक म्हणुनही घेता येईल!

फक्त अर्थ बदलेल! Lol

कसा घ्यायचाय तसा घ्या नानुभाऊ.....:-)

अर्थावर तर वाचणा-याचीच मक्तेदारी असते शेवटी...:-(

नाहीतर अशा कवितांना साठच्या खाली प्रतिसाद येत नाहीत>>>>>>>>>>>>>>>>>>>.........:अओ:

अच्छा ही खरी ट्रीक( मन्त्र ) आहे तर !! धन्यवाद बेफीजी................

पण पाठ सोडेल तर शपथ.....
...........मेला...हा..हा...हा कंटाळा !!!

व्वा कंटाळा न करता इथे पोष्ट केलेस हे मात्र लई बेस केलेस सुप्रिया Happy
छान लिहीलेस हे मनापासुन सांगतांना आम्ही पण कंटाळा नाही केला Happy

न कंटाळता (आलेली शिंक, जांभई दाबून Happy ) दिलेल्या मजेशीर अभिप्रायांबद्दल मनःपुर्वक आभार.

-सुप्रिया.

Happy