असेल करायची कविता तर

Submitted by आशुचँप on 17 April, 2012 - 08:30

असेल करायची कविता तर
मनात हवे एक हळुवार स्वप्न
अगदी साखरझोपेत पडलेलं
हिरव्या तृणांवरच्या दवबिंदूंसारखे
अलगद शिंपडावेत थोडे शब्द
पडतील तसे द्यावेत पडू
शोधू जाऊ नये त्यात अर्थ

असेल करायचीच कविता तर
मनात हवा एक धगधगता अंगार
करपून ठिक्कर झालेल्या हातात
घ्यावी शब्दांची माती अन
प्रयत्न करावा इमले उभारण्याचा

असेल करायचीच कविता तर
मनात हवी एक हुरहुर अनोखी
ओझरत्या भेटीगाठी अन्
उमलणार्‍या भावना व्हाव्यात व्यक्त
सागरकिनारी पसरलेल्या वाळूत

अरेच्चा ...ही कैच्याकै मधे टाकली आहे हे पाहिलेच नव्हते !!

तर मग लय ब्येस कैच्याकै आहे ,,,,अप्रतिम ...फारच सुरेख Rofl

हा आत्ता कसं....कैच्याकै कवितेला पण तुम्ही लोकं बरं म्हणायला लागल्यावर आमच्यासारख्या नवोदित कवींनी काय करावे सांगा बरं Happy

आशुभरी ये जीवन की राहें
कोई उनसे केहे दे की ये "कैच्याकै" है Proud

काय फडणीस बर्‍याच दिवसांनी कवितेच्या प्रांगणात Happy दुसरा काव्यसंग्रह येणार नक्की Biggrin

होय नक्कीच मंदार..
आणि काही जणांना याची नक्कीच चिंता वाटत असेल कारण त्यात माझे काका हा लघुनिबंध देखील आहे...
तो लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे....:)

पडतील तसे द्यावेत पडू
>>

उत्कृष्ट ओळ

कवितेतील भावना मस्त

अभिनंदन चॅम्प

तुझ्या काकांची शप्पथ

का बिचार्‍यांना त्रास देते. केशरी झब्बा खुंटीवर टांगून सुखात घोरत असतील छान आत्ता Happy