दिस जातील दिस येतील...

Submitted by बागेश्री on 28 March, 2012 - 04:03

हिरानंदानी मधे घर घेण्याच्या माझ्या सखीच्या स्वप्नाची- कहाणी- थोड्डीशी मसाला मार्के!! Wink
--------------------------------------------------------------------------

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?
३ बेडरुमचं एक घर बघ नवं,
नव्या घरामंदी काय येगळं होईल?
स्टेटस काय असतं, त्ये समद्यांना कळील...

दिस जातील दिस येतील,
फ्लॅट जाईल, ड्युप्लेक्स येईल.... (२)

अवकळा समदी जाईल निघूनी,
मोठ्ठ्य्या घरामंदी राहू, राज्जा रानी वनी
मिळल का त्याला उन-वारा-पानी?
राहिल ते दिसल का ह्याच फ्लॅट वनी?
घर आपलच पण, होईल येगळं
फर्निचरानं छान दिसायचं देऊ त्याला बळं!

दिस जातील दिस येतील,
फ्लॅट जाईल, ड्युप्लेक्स येईल.... (२)

उडूनिया जाईल ही, आसवांची रातं
आपल्याच साठी उद्या फुटल पहाट
पहाटेच्या दवापरी इन्कम तुझं माझं
सोसल गं कसं त्याला ई एम आय चं ओझं?

इवल्याश्या पणतीचा, इवलासा जीव
रडून कसं चालंल राजा, इन्कम वाढीव!

दिस जातील दिस येतील,
फ्लॅट जाईल, ड्युप्लेक्स येईल.... (२)

डूनिया जाईल ही, आसवांची रातं
आपल्याच साठी उद्या फुटल पहाट
पहाटेच्या दवापरी इन्कम तुझं माझं
सोसल गं कसं त्याला ई एम आय चं ओझं?

इवल्याश्या पणतीचा, इवलासा जीव
रडून कसं चालंल राजा, इन्कम वाढीव!>>

वा वा

मस्त

गुड वर्क........!!!! Happy

फर्निचरानं छान दिसायचं देऊ त्याला बळं!
ही ओळ चालीत म्हणताना खटकतेय Proud बाकी झ्याक झालया. Happy

व्वा, व्वा! मस्त! हिरानंदानीकी बातही और है!
घर आपलच पण, होईल येगळं
लोनसंगे झुंजायाला देऊ त्याला बळं!

विषयात वेगळेपण आहे, आशयही चांगला मांडलाय.

थोडेसे बदल केलेस तर छान ठेक्यात वाचता येईल.
रंगत वाढेल.

"पहाटेच्या दवापरी इन्कम तुझं माझं
सोसल गं कसं त्याला ई एम आय चं ओझं?"
हे अगदी छान, प्रॅक्टिकल वाटलं.
विशेषत: दंवाची उपमा भावली.
ऊन पडल्यावर दंव बघता बघता उडून जातं त्यानुसार हां हां म्हणता पैसा संपतो ही वस्तुस्थिती आहे.
(महागाईच्या उन्हाच्या झळा इनकम ला एक्स्पेंडिचर मध्ये बदलतात.)

"उडूनिया जाईल ही, आसवांची रातं
आपल्याच साठी उद्या फुटल पहाट" >>>> हा आशावाद देखील आवडला.

ऊन पडल्यावर दंव बघता बघता उडून जातं त्यानुसार हां हां म्हणता पैसा संपतो ही वस्तुस्थिती आहे.
(महागाईच्या उन्हाच्या झळा इनकम ला एक्स्पेंडिचर मध्ये बदलतात.)>>

यावरून गालिबचा हा शेर आठवला

पर्तवे खुरसे है शबनमको फना की तालीम
मै भी हूं एक इनायतकी नजर होने तक

मस्त मस्त! Happy उपरोध दर्शवणं छान जमलंय....

फक्त-
मोठ्ठ्य्या घरामंदी राहू, राज्जा रानी वनी
मिळल का त्याला उन-वारा-पानी?
राहिल ते दिसल का ह्याच फ्लॅट वनी?

म्हणजे काय ते नाही समजलं. वानी(=सारखं) म्हणायचंय का?

वानी(=सारखं) म्हणायचंय का?
>>>
मलाही तेच म्हणाय्चंय. वानी हवंय ना तिथे?

छान आहे काकाक Happy

पण 'दिस जातील, दिस येतील- बदलून' असं नको वाट्टय,
>>>>>>>>>>>>>

थोडक्यात दिस गेलेले चालतात, दिस आलेले चालतात... पण बदललेले नाय चालत बहुतेक Biggrin Proud Light 1