कवयित्री मी झाली जी.......(उ ला ला च्या धर्तीवर)

Submitted by पुणेकर आजोबा on 27 March, 2012 - 04:07

चाल- उ ला ला, उ ला ला, उ ला ला, उ ला ला

गा ला ला; गा गा ला; गा गा गा, ला गा गा
मी (बे)वडा, तू बशी
गुरूजी, गुरूजी; गुरूजी, गुरूजी...कवयित्री मी झाली जी
आ हाSSSSSSS, आ हाSSSSSSSS आ हाSSSSSSSSS

हाडकुळ्या प्रतिभेला, कशी मी मारू मिठी?
दारूमध्ये विरघळते, साखर जैसी पिठी
गा ला ला; गा गा ला; गा गा गा, ला गा गा
मी (बे)वडा, तू बशी
आ हाSSSSSSS, आ हाSSSSSSSS आ हाSSSSSSSSS

नवे पाखरू, कविता शिकण्यासाठी; सावज आले
गोण्यांनी हे लिखाण पाहून; 'तुझे' नि मी घाबरले
गा ला ला; गा गा ला; गा गा गा, ला गा गा
मी (बे)वडा, तू बशी
आ हाSSSSSSS, आ हाSSSSSSSS आ हाSSSSSSSSS

दादा,भाई, नवरोजी, फोटो पाहून चळले
वृत्तामधले किडे कसे, गा ला वर वळवळले
गा ला ला; गा गा ला; गा गा गा, ला गा गा
मी (बे)वडा, तू बशी
आ हाSSSSSSS, आ हाSSSSSSSS आ हाSSSSSSSSS

अपघाताने आधीच माझे, कुठे काय हारपले
उरले सुरले टक्कुरे, बायकोने ओरपले
गा ला ला; गा गा ला; गा गा गा, ला गा गा
मी (बे)वडा, तू बशी
आ हाSSSSSSS, आ हाSSSSSSSS आ हाSSSSSSSSS

'लघु' माझा 'गुरू' जाहला, कितीतरी दिवसांत
तुझा इरादा कळला मेल्या, जा रे तू मसणात
गा ला ला; गा गा ला; गा गा गा, ला गा गा
मी (बे)वडा, तू बशी
आ हाSSSSSSS, आ हाSSSSSSSS आ हाSSSSSSS

वृत्तांच्या समुद्रातूनी, तुला मी देईन पर्ल
कामापुरता मामा तू, मी 'मा बो नेक्स्ट गर्ल'
गा ला ला; गा गा ला; गा गा गा, ला गा गा
मी (बे)वडा, तू बशी
आ हाSSSSSSS, आ हाSSSSSSSS आ हाSSSSSSS

अजोबा ग्रेट आहात तुम्ही!!
______/\________ !!
अजोबा तुमचे खरे नाव काय ? की आड्नाव खोटे आहे तुमचे ?

कळावे (च)
तुमचा पन्ढर्पूर्कर नातू
वैभव

आडनाव काय काहीही असते हो. शिंदे असेल नाही तर कुलकर्णी (किंवा देशपांडे, पवार, वगैरे)? काय फरक पडतो? Wink Light 1 Proud Biggrin