Submitted by अज्ञात on 27 March, 2011 - 02:57
चाहूल कुणाची घेई मन कानोसा
ऋतु चंदनमंडित येई घेउन वळसा
ओहटी फुटे माघारी खोल तळाशी
वादळ गाभारी अन भवती जानोसा
लय मंथन हृदयी थरथर नव उन्मेषा
रिपु मोहमयी माने ना निमिष निराशा
आशेत उजाडे जीवन मिथक उषेचे
ओघळे स्वप्नमय दंवबिंदूत जिगीषा
रोमात समन्वय अगणित कृतिबंधांचा
यातना प्रेममय झुळुक वेदना रेषा
रंगात रंग शतरंगित छटा प्रभेच्या
देखण्या रागिणी ऋचा श्रृती वेदांच्या
..........................अज्ञात
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर लय!
सुंदर लय!
:० आभारी आहे मनापासून :०
:० आभारी आहे मनापासून :०
खूपच मस्त लय चाहूल कुणाची घेई
खूपच मस्त लय
चाहूल कुणाची घेई मन कानोसा
ऋतु चंदनमंडित येई घेउन वळसा
ओहटी फुटे माघारी खोल तळाशी
वादळ गाभारी अन भवती जानोसा
धन्यवाद प्रकाश
धन्यवाद प्रकाश
खूप सुंदर .
खूप सुंदर .
"लय"भारी गुरुजी !!!
"लय"भारी गुरुजी !!!
ऋतु चंदनमंडित येई घेउन
ऋतु चंदनमंडित येई घेउन वळसा..... व्वा!
मनःपूर्वक
मनःपूर्वक
मस्तच
(No subject)
सुरेख, अगदी लयबद्ध कविता !
सुरेख, अगदी लयबद्ध कविता !
विशाल, आभार !!
विशाल,